Nojoto: Largest Storytelling Platform
trishilasalve2772
  • 24Stories
  • 67Followers
  • 157Love
    210Views

Trishila Salve

जीवन लिहावे कधीतरी...

  • Popular
  • Latest
  • Video
eb5898ed59760a26f3accd6a05f0e406

Trishila Salve

*नाही आठवत आता*

नाही आठवत आता
सांजवेळ चर्या भेटी

निस्तेज होत जाणाऱ्या तेजोनिधीसह
दुसरं झालेल्या सांजवेळच्या आठवणी...
उगाच नको आता
संवेदनेची ती शिरशिरी
थंडावत चालली
सांजवेळच्या प्रितीची कहाणी...

नकोच आता सख्या
सांजवेळच्या प्रवासाची पर्वणी
ओझरत्या स्पर्शातूनही भळभळेल
विरहाची जखम पुराणी..

 प्रा.त्रिशिला साळवे
९९२२३६३६२८/९११२८५९६६९ जीवनाची कविता#

जीवनाची कविता#

eb5898ed59760a26f3accd6a05f0e406

Trishila Salve

*रडणाऱ्या माझ्या मनाला*

रडणाऱ्या माझ्या मनात,तुझ्या भावनेची साथ दे
अंधारमय माझ्या जीवनाला,तुझ्या संगतीचा आधार दे    
दे एक श्वास मलाही,तुझ्या श्वासात गुंफलेला
गंध मलाही मिसळू दे ,त्यात जरासा भांबावलेला    

होवू दे मला एक थेंब रक्ताचा,ह्रदयातून शरीरभर वाहणारा
फिरु दे तुझ्या भावनेतून ,कधी हळूच अश्रू बनून
तुझ्या सुंदर डोळ्यात राहणारा

दे ना एक अबोल अनुभूती, तुझ्या बोलक्या पवित्र स्पर्शातली
वचन दे एक आज मजला, निर्मिण्या कल्पनेतील नवस्त्रुष्टी
होवू दे मजला शब्द तुझ्या ओठीचे
भावना व्यक्त करणारे कधी हळूच कविता बनून
तुझ्या सुंदर लेखणीतून पाझरणारे
तुझ्या माझ्या प्रीतीचे गीत फुलवणारे 

त्रिशिला साळवे
९९२२३६३६२८/९११२८५९६६९ कविता जीवनाची...
रडणाऱ्या माझ्या मनाला
कवयित्री त्रिशिला साळवे#

कविता जीवनाची... रडणाऱ्या माझ्या मनाला कवयित्री त्रिशिला साळवे#

eb5898ed59760a26f3accd6a05f0e406

Trishila Salve

 चारोळी
त्रिशिला साळवे#

चारोळी त्रिशिला साळवे# #nojotophoto

eb5898ed59760a26f3accd6a05f0e406

Trishila Salve

 चारोळी
त्रिशिला साळवे#

चारोळी त्रिशिला साळवे# #nojotophoto

eb5898ed59760a26f3accd6a05f0e406

Trishila Salve

 कविता जीवनाची#
कवयित्री त्रिशिला साळवे

कविता जीवनाची# कवयित्री त्रिशिला साळवे #nojotophoto

eb5898ed59760a26f3accd6a05f0e406

Trishila Salve

 चारोळी
त्रिशिला साळवे#

चारोळी त्रिशिला साळवे# #Shayari #nojotophoto

eb5898ed59760a26f3accd6a05f0e406

Trishila Salve

 कविता जीवनाची
कवयित्री त्रिशिला साळवे#

कविता जीवनाची कवयित्री त्रिशिला साळवे# #poem #nojotophoto

eb5898ed59760a26f3accd6a05f0e406

Trishila Salve

तुझ्या झोळीत दान द्यावे
इतकी मी महान नाही
अश्रू आहेत देण्यासारखे
पण झोळी तितकी तलम नाही...

त्रिशिला चारोळी
त्रिशिला साळवे#

चारोळी त्रिशिला साळवे# #Shayari

eb5898ed59760a26f3accd6a05f0e406

Trishila Salve

*रेषा*
माझ्या तळ हातावरील
रेषा न्याहाळताना
मनात काहूर उठलं विचारांचं...
रेषा काय अगदी रेषांचे जाळेच म्हणायचं...
एकही रेषा नाही पुसट... रेषेत गुंतलेली रेष...
वाकडीतिकडी रेष... वळण घेणारी रेष...
फाटे फुटलेली रेष... असंख्य रेषा... 
पण एकही रेष नाहीच, मला जगण्यासाठी...
प्रत्येक रेष फक्त दुसऱ्याला जगवण्यासाठी...
माझं जीवन तळहातावरच्या रेषेत बंदिस्त...
आणि तुझ्या हातावरील फक्त
ठळक चार रेषा... तुझी प्रत्येक रेष 
तुझ जीवन सांगणारी...
तुझ्यासह दुसऱ्यासाठी जगणारी...
तुझ्यासह दुसऱ्यासाठी खपणारी...
रेषेचं जीवन तुझ्या तळहातात बंदिस्त...
कसं ना...
रेषा सारखी असली तरी
ती कोणाच्या हातावर यावर
रेषेचं जीवन...!

त्रिशिला साळवे
९९२२३६३६२८ कविता जीवनाची  *रेषा*
कवयित्री त्रिशिला साळवे#

कविता जीवनाची *रेषा* कवयित्री त्रिशिला साळवे# #poem

eb5898ed59760a26f3accd6a05f0e406

Trishila Salve

*आयुष्याची एक संध्याकाळ अशी असावी*

आयुष्याची एक संध्याकाळ, अशीही असावी... 
पुनः पहिल्याच रात्रीसारखी, तुझी मिठी मला पडावी...

तुझ्या हळूवार पवित्र स्पर्शाने ,माझा रोम रोम खुलावा...
 तुझ्याच हाताने  माझा ,श्रुंगार पुनः सजावा...

सर्वांसमक्ष तू माझ्यावर, चुंबने वर्षावी...
बेभान होवून मजला, उरी कवटाळून धरावी...

आवेग ओसरल्यावर तुझा, मिठी तू सैल करावी...
विस्कटलेली माझी टिकली, तू अश्रूभरीत नयनांनी पुनः लावावी...

मोठ्या हिमतीने मला,नवरीसारखी सजवून...
तुझ्याच हाताने  ,सरणावर ठेवावी...

आयुष्यात एक,संध्याकाळ अशीच यावी... 
माझी प्राणज्योत तुझ्या, अंतरीच सामावून जावी...

त्रिशिला साळवे
९९२२३६३६२८ कविता जीवनाची
कवयित्री त्रिशिला साळवे#

कविता जीवनाची कवयित्री त्रिशिला साळवे# #poem

loader
Home
Explore
Events
Notification
Profile