Nojoto: Largest Storytelling Platform
shubhangikolte1603
  • 7Stories
  • 78Followers
  • 56Love
    0Views

Shubhangi Kolte

  • Popular
  • Latest
  • Video
edb7703c8b49266fee23007817c133a3

Shubhangi Kolte

संघर्ष

हरले जरी मी शर्यत आता
पावलांनी थांबणे शक्य नाही
छाटले जरी पंख माझे
नाशवंत इतके माझे सामर्थ्य नाही

पेटेन मी इतके सोसूनही
अजूनही अशी आग ज्वलंत नाही
होणार नाही सार्थक जगण्याचे
तोवर देहास माझ्या अंत नाही

मी वाट शोधली सुखाची
दुःखाचे गाऱ्हाणे गाण्यास मला उसंत नाही
मी ध्यास घेतला ध्येयप्राप्तीचा
थांबणे आता मला पसंत नाही

सुटणार नाही कोडे जीवनाचे
इतके दुर्बल माझे ध्यासच नाही
जावे लागेल परतून माघारी
अजूनही असे वादळ सुटलेच नाही

कळणार कशी परिस्थिती मला
जोवर काटे मला बोचणारच नाही
मिळणार कशी उत्तरे
जोवर आयुष्य मी चाळलेच नाही

झाले जरी रक्तबंबाळ
मोडेन मी पण वाकणार नाही
होतील यातना जनांना
असे मी कधी वागणार नाही

सोसेन मी विषण्ण अन्याय
इतके सोशिक माझे हृदयच नाही
भारले कितीही मंत्रमुग्धांनी 
माझ्यावर चालेल अशी कोणती विद्याच नाही

होईल शहानिशा माझ्या अस्तित्वाचा
असे कथानक कधी घडणारच नाही
कळणार तरी कसे तुम्हाला
जोवर मी मन माझे लिहिणारच नाही

                        शुभांगी कोलते #संघर्ष
edb7703c8b49266fee23007817c133a3

Shubhangi Kolte

वेगळे आभाळ वेगळ्या वळणावरी
रूप निराळे प्रत्येकाचे या जिवन किनारी
विशाल मन दाखवतात तरी
मुखवटा फासलेली माणसे ना खरी

                ✍️ शुभांगी कोलते

4 Love

edb7703c8b49266fee23007817c133a3

Shubhangi Kolte

बहुत मुद्दत बाद मिली रिश्तों से दिल को तसल्ली...
वरना सच्चें रिश्तें आजकल बिकते कहां है 
दुनिया की बाजार में...
 
              ✍️ शुभांगी कोलते

4 Love

edb7703c8b49266fee23007817c133a3

Shubhangi Kolte

आयुष्याच्या या रित्या पानावर
नाव तुझं कोरायचंय....
मग झोका करून संसाराचा
खुप खुप झुलायचंय....
सर सुखाच्या या वेलीवर
खुप खुप फुलायचंय....
मंतरलेल्या या प्रियाला
फक्त तुझ्याचसाठी जगायचंय.... #love

5 Love

edb7703c8b49266fee23007817c133a3

Shubhangi Kolte

जीवन खूप सुंदर असते
ते सुंदरतेनी जगायचं असते
वाईट गोष्टींना दुर सारून
सुखाची वाट शोधायची असते

जीवन खूप सुंदर असते
अपयशानी खचायचं नसते
सु:खदुख:च्या वाटेवर चालून
यशाची वाट शोधायची असते

जीवन खूप सुंदर असते
पावलोपावली जग बदलणारं असते
भाग्यावर‌ अवलंबून न राहता
भविष्याची वाट शोधायची असते

जीवन खूप सुंदर असते
ते एका न सुटणार्या गणिताचं कोडं असते
त्याला एका रितीने सोडवून
आनंदाची वाट शोधायची असते

जीवन खूप सुंदर असते
अपमानानं कधी हरायचं नसते
जिद्दीने बळ वाढवून
जगण्याची वाट शोधायची असते
                                  - $hubh@ngi #जिवन
edb7703c8b49266fee23007817c133a3

Shubhangi Kolte

किती आटवावे आसवांची किनारे
किती हसावे आसवांनीच
कसा तोल जावा मनाचा
आसवांनी आसवांशीच का रूसावे? #आसवांची_किनारे
edb7703c8b49266fee23007817c133a3

Shubhangi Kolte

मन पाऊस पाऊस
ओल्या मातीचा सुवास
चिंब भिजलेले अंग
प्रितीची त्यात आस

मन पाऊस पाऊस
थेंबथेंबांची आरास
कसे रुजलेत मनी
जुने शब्द तुझे खास

मन पाऊस पाऊस
चिंब दाटला मनात 
जणू भिनला मस्तकी
गारव्याला त्याचा ध्यास

मन पाऊस पाऊस
मृग निर्मल सुवास
दाटलेले ढग नभी
दूर पाझरे प्रवास #मन_पाऊस_पाऊस


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile