Nojoto: Largest Storytelling Platform
prakash7911
  • 122Stories
  • 8Followers
  • 1Love
    0Views

प्रकाश साळवी

कवि, गझल लिहायला आवडते, गज़ल वाचायला आवडते

  • Popular
  • Latest
  • Video
f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

मन का अंधेरा या धुंदलापन
अक्सर मन को बहकाता है
न चाहे कोई भी गलत सोचता हैं।
ईसे भगवान कि ओर लगा दो शुभरात्रि लेखकों।😊 

हमारे #rzhindi पोस्ट पर Collab करें और अपने शब्दों से अपने विचार व्यक्त करें । 

इस पोस्ट को हाईलाईट और शेयर करना न भूलें!😍 

हमारे पिन किये गए पोस्ट को ज़रूर पढ़ें🥳

शुभरात्रि लेखकों।😊 हमारे #rzhindi पोस्ट पर Collab करें और अपने शब्दों से अपने विचार व्यक्त करें । इस पोस्ट को हाईलाईट और शेयर करना न भूलें!😍 हमारे पिन किये गए पोस्ट को ज़रूर पढ़ें🥳 #yqdidi #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #rzअंधेरेमेंअक्सर #restzone_yqrz

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

खडतर प्रवास असला
तरी तो आपल्याला करावयाचा आहे
जीवन संघर्षमय असेल
तरच जिवन जगण्यात
खरी मौज आहे
**
मिठ खारट आहे
पण त्याच्या शिवाय
पदार्थ बेचव आहे
खरे कि खोटे तुम्हीच सांगा शुभ संध्या मित्रहो

शुभ संध्या मित्रहो

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

कशा सांगु त्या ...
पहिल्या भेटीच्या आठवणी
एकच क्षण !
तुझ्या नजरेनं घायाळ केलं !
छिन्न विछिन्न झालं
हृदयाचं बंधन
आणि पुरतं बांधुन
घेतलस कायमचे ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट...
#पहिलीभेट२

चला तर मग लिहूया.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट... #पहिलीभेट२ चला तर मग लिहूया.

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

आठवांच्या झेलल्या सरीवर सरी
त्यातच माझी कविता झाली बावरी
चिंब भिजून त्या पावसात रमलो
अन् आठवणींची चादर माझी लाजरी आठवांच्या सरी

आठवांच्या सरी

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

मला साथ हवी तुमची
साथ हवी शब्दांची
आणि माझ्या देशाची मला साथ हवी ...

मला साथ हवी ...

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

*आजही अभिमान आहे !*

तसाही मला तुझा आजही अभिमान आहे
तरीही नकळे तू अजूनही का परेशान आहे
**
तसे पाहता आजही माझा जन्म वाया गेला
आता वाटते शेवटी राहीले ते स्मशान आहे
**
सोडून वृद्धाश्रमात तुजला गेला सुत असूनी
ना अंत्यसंस्कारास आला तो बेईमान आहे
**
जगलो जीवन खरेपणाने ना दुस्वास केला
आता उरलो श्वासापरी बेगडी सामान आहे
**
पाहिलेस एकदा मागे वळूनी हसलिस तु
ईतकेच वाटले मज हा माझा सन्मान आहे
**
घेतला का शोध तू त्या रमानायकाचा कधी
नुसते श्वास " प्रकाशा " हा त्याचा अपमान आहे
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
१७-११-२०२०
वेळ : १९:२५ आजही अभिमान आहे !

आजही अभिमान आहे !

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

अजून समजलेच नाही ...!

वाचले संवाद हजारदा कृष्ण अर्जुनाचे
मर्म जगण्याचे अजून समजलेच नाही
**
काय ते मारावे आपल्याच माणसांना
हे तत्वज्ञान पार्थास पटलेच नाही
**
ना मारणारा ना कोण मरणारा येथे
या साऱ्याचा दोष तुजला मुळीच नाही
**
तु एव्हढेच कर जे तुझे कर्म आहे
नको फळाची अपेक्षा कसलिच नाही
**
गीता हे सार जीवनाचे जगण्याचे
आणि जगणे याहून दुसरेच नाही
**
जे आहे त्यात समाधान माझे आहे
अहित दुसऱ्याचे मला अपेक्षितच नाही
**
नको फुल ना पान; घे नाम माझे मुखाने
अखंड नामाने माझ्या पुनर्जन्मच नाही
**
उगा शोधतो तु मजला राऊळा देऊळात
तुझ्या भवतीच आहे अन्य कोठेच नाही
**
राज्य होते अधर्माचे जेंव्हा "प्रकाशा"
मीच जन्म घेतो अन्य कोणीच नाही
**
प्रकाश साळवी
बदलापूर  - ठाणे जगणे अजून समजलेच नाही ...!

जगणे अजून समजलेच नाही ...!

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

*तळमळून रात्र गेली !

ऐकून थरार सारे गळफळून गात्र गेली
वेदनेचे करार सारे तळमळून रात्र गेली
**
तू असा निर्दयी का कसा रे नियंत्या !
जीवाची जीव माझे उगळून रात्र गेली
**
आता तरी सांग ना संपेल कधी महामारी
दर्शनाची आस मळमळून रात्र गेली
**
भेट नाही सुखाने ना मुख न्याहाळले
आठवांच्या नभाने कळवळून रात्र गेली
**
मान्य केले माझीच चुक आहे तरीही..
ईतकी कठोर शिक्षा ढळढळून रात्र गेली
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
१८/०९/२०२०
दुपारी १४:४४* कोरोना च्या या भयाण कालावधीत ईतके जवळचे लोक सोडून गेले विश्वास बसत नाही. अगदी नियतीचा राग आला. पण पुन्हा मनाला सावरले आणि कळले हि आपलीच चूक आहे. नियती काहिच करत नाही. ती तुम्ही जे पेराल तेच तुम्हांला परत देते आणि भरभरून. मग आपण अमृत पेरले तर अमृत आणि विष पेरले तर विष तेही भरभरून.

कोरोना च्या या भयाण कालावधीत ईतके जवळचे लोक सोडून गेले विश्वास बसत नाही. अगदी नियतीचा राग आला. पण पुन्हा मनाला सावरले आणि कळले हि आपलीच चूक आहे. नियती काहिच करत नाही. ती तुम्ही जे पेराल तेच तुम्हांला परत देते आणि भरभरून. मग आपण अमृत पेरले तर अमृत आणि विष पेरले तर विष तेही भरभरून.

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

काल माझ्या जगात मीच हरवलो
आज स्वत:ला शोधण्या निघालो
**
हेच माझे जग हिच माझी नाती
माय बाप कुणी भाऊ आवडती
सगे सोगरे मित्र आणि मैत्रीणी
शेजार- शेजारी माणूसकी गाती
या नात्यांना हाकारत निघालो.... १.
**
या विश्वावर प्रेम करावे मनाजोगे
कधी हसावे कधी रुसावे मनाजोगे
विसरून सारे भेदभाव कधी कधी
प्रेम करावे साऱ्यावर मनाजोगे
या प्रेमाला सावरीत निघालो.... २.
**
Prakash Salvi
 सुप्रभात मित्र आणि मित्रानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आज स्वतःला शोधण्या निघालो...
#शोधण्यानिघालो
हा विषय

सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

... मला ना आले !

माझेच शब्द असले पाळता मला ना आले
करार आपले सहज जाळता मला ना आले
**
लाखात अशी देखणी तू चंद्राची चांदणी
नजरेत भाव दिसता भाळता मला ना आले
**
बजावून सांगितले मनाला तरीही जरी
अखेर सत्य काय ते टाळता मला ना आले
**
विसरू कसा मी त्या धुंद मैफिलीला
ते सूर अंतरी सांभाळता मला ना आले
**
केस काळे कुरळे जणू नागिणी त्या
फुल मोगऱ्याचे ही माळता मला ना आले
**
जणू शब्द माझे जरी वाटल्या धुंद वाटा
तरी ग्रंथ जीवनाचे चाळता मला ना आले
**
करी आठवण त्या वीरांची कधी "प्रकाशा"
जयांसाठी कधी आसवे ढाळता मला ना आले
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
२४/०८/२०२०
संध्या : १७:१८ ... मला ना आले !

... मला ना आले !

loader
Home
Explore
Events
Notification
Profile