Nojoto: Largest Storytelling Platform
saurabhskore6411
  • 59Stories
  • 30Followers
  • 636Love
    3.5KViews

saurabh s kore

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
f4e86abf2197766df238e604dd6d1da6

saurabh s kore

राग मनात ठेवला म्हणून कोणाचं भलं झालं का ? 
बिन फुलाच्या झाडा जवळ. पाखरू कधी आलं का ? 
 समोरची व्यक्ती चुकली तरी 
प्रेम करता आलं पाहिजे. झालं गेलं विसरून जाऊन 
गच्च मिठी मारली पाहिजे,
स्वागत होईल न होईल.  जाणं येणं चालू ठेवल पाहिजे.
समोरचा जरी चुकला तरी त्याला माफ करता आले पाहिजे.
आयुष्य खूप छोटं आहे. हां हां म्हणता संपुन जाईल.
 प्रेम करायचं राहिलं म्हणून. शेवटी खूप पश्चात्ताप होईल.
लक्षात ठेवा नात्या पेक्षा. दुसरं काहीही मोठं नाही.
 आपलं माणूस आपल्या जवळ या सारखी श्रीमंती नाही!
काही गोष्टी नाही पटल्या तरी.गाडी मात्र हाकायची असते.  अबोला धरून विभक्त होऊन सार गणितं चुकायचे नसते.
काही धरायचं असतं.तर काही सोडायचं असतं.एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून एकमेकाला सोडायचं नसतं 
चुकल्यावर बोलावं बोलल्यावर ऐकून घ्यावं.
एकांतात बसल्यावर. अंतरंगात डोकवावं..

©saurabh s kore
f4e86abf2197766df238e604dd6d1da6

saurabh s kore

माझ्याच माणसांनी

केली शिकार माझी, माझ्याच सदगुणानी, काटे कुठेच नव्हते, केला दगा फुलानी, गाफील राहीलो मी, त्या नेमक्या क्षणाला मागून वार केले माझ्याच माणसांनी

©saurabh s kore #smog
f4e86abf2197766df238e604dd6d1da6

saurabh s kore

वास्तव 

पोट तुझं भरलं असेल तर,देवा माझ्यासाठी घेऊ का तुझं राहिलेलं उष्ट,माझ्या घरी मी नेऊ का.?
देवा इथे मात्र तुमची,मस्त अंगत पंगत रंगलीय,घरात पीठ नाही म्हणून,
सकाळीच आई बाबासोबत भांडलीय.
मूठ भर पिठासाठी,आई सगळ्या गल्लीत हिंडली सगळ्या शेजारच्यांनी,
तुझ्या निवदाची सबब सांगितली देवा आज सकाळी मला,सडकून भूक लागली अचानक तुला आठवून तुझ्या मंदिराकडे धूम ठोकली.

      देवा मला तुझा ,कधी कधी हेवा वाटतो,एका जाग्यावर बसून,मस्त निवदाचा मलिदा लाटतो.
दर्शनासाठी आलेल्या लोकांनी,नारळाचा तुकडा हातावर ठेवला, तुला मात्र देवा त्यांनी,अर्धा नारळचं वाहिला. माफ कर देवा मला,
तुझा घास हिसकावतोय,अर्ध्या कोर तुकड्यासाठी,भाऊ माझा घरात रडतोय.
 देवा मी आता ठरवलंय,तुझ्यासोबत बंड करायचं,माझ्या भाकरीच्या प्रश्नासाठी,
स्वतःच पेटून उठायचं!"

©saurabh s kore
f4e86abf2197766df238e604dd6d1da6

saurabh s kore

आताच्या पोरी मुळीच लाजत नाहीत

आताच्या पोरी "इश्श..." म्हणून खाली मान घालतच नाहीत. हल्लीच्या पोरी मुळीच लाजतच नाहीत 

"नवीन ड्रेस का ग ?" विचारले तर ह्यांना येतो संशय !! "नाही रे. जुनाच आहे", म्हणून बदलतात लगेच विषय नकट्या नाकावर लटका राग दिसतच नाही. आताच्या पोरी मुळीच लाजतच नाहीत 

मी घा-या डोळ्यांचे कौतुक करावे. मग तिनेही गालात खुदकन हसावे.
कसचे काय.... आजकाल गालांना खळ्या कश्या त्या पडतच नाहीत, आताच्या पोरी मुळीच लाजतच नाहीत 

उद्या घोड्यावर होउन स्वार येईल एक उमदा तरुण. "होशील का माझी राणी" विचारील हातात हात घेऊन, गोड गोड स्वप्ने यांना आता पडतच नाहीत. आताच्या पोरी मुळीच लाजतच नाहीत 

पोर लग्नाची झाली म्हणून. घरी आई- बाप काळजीत. "माझा नवरा मी केव्हाच शोधलाय". त्या डीक्लेअर करतात ऐटीत. घरून होकारासाठी थांबतच नाहीत.आताच्या पोरी मुळीच लाजतच नाहीत..

©saurabh s kore
f4e86abf2197766df238e604dd6d1da6

saurabh s kore

प्रॉमिस डे

प्रॉमिस डे म्हणजे राजं तुम्ही विशाळगड गाठा एक भी गनीम पुढे सरकू देत नाही - बाजीप्रभू देशपांडे

प्रॉमिस डे म्हणजे राजं आधी लगीन कोंढाण्याच मगचं माझ्या रायबाचे - तानाजी मालुसरे

प्रॉमिस डे म्हणजे राजं तुम्ही 60 मावळे द्या एका रात्रीत गड घेतो - कोंडाजी फर्जद

प्रॉमिस डे म्हणजे स्वराज्य स्थापन करून दाखवून आईचं स्वप्न पूर्ण केलं - छ. शिवाजी महाराज

©saurabh s kore
f4e86abf2197766df238e604dd6d1da6

saurabh s kore

आदर्श शाळा

कॉलेजच्या बाका पेक्षा, माझ्या शाळेचा बाकच बरा होता. कामाच्या या व्यापापेक्षा, आमच्या महावीर सरांचा गणिताचा गृहपाठच बरा होता........

कितीही असला कॉलेज आणि नोकरीचा लळा, तरी माझ्या शाळेचा फळांच बरा होता. वरिष्ठांच्या सततच्या टेंशन पेक्षा, रितिकर सारंच्या छडीचा मार बरा होता.... मोबाईल वरील व्हॉटसअप फेसबुक पेक्षा सातवेकर सरांचा मैदानी खेळांचा थाटच बरा होता.. आत्ताच्या लेटेस्ट इंग्रजी पेक्षा आनीखिंडे मॅडमाचा तोच इंग्रजीचा तास बरा होता...

जॉब साठी इंटरव्यू द्यायला जाताना कंपनीचा मागचा इतिहास पाहण्यापेक्षा त्या कांबळे मॅडमचा इतिहासचा तास बरा होता...

पुढच्या 'कॉलेजच्या सिल्याबस मध्ये मराठी विषय हा गडपच झाला होता अजूनही आठवते तो शाळेतला वाटवे मॅडमाचा मराठीचा तासच बरा होता.. मला अजूनही आठवते त्या जगताप सरांच मुलानं मुलीनं समोर ओव्हरअॅक्टिंग चा नमुना खूप वेगळाच होता.. हरवलो आहे आता करिअरच्या शोधात जीवनाच्या धावपळीत पण मित्रा आपला तो अगोदरचा शाळेचा काळच बरा होता....

©saurabh s kore
f4e86abf2197766df238e604dd6d1da6

saurabh s kore

सुखाची ती तहान

सुखांमागे धावता धावता, विवेक पडतो गहाण पाण्यात राहूनही माशाची मग भागत नाही तहान

स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप वाटीवाटीने ओतलं तरी कमीच पडतं तूप

बायका आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ पैसा आणून ओतेन म्हणतो, पण मागु नका वेळ

career होतं जीवन, मात्र जगायचं जमेना तंत्र बापाची ओळख मुलं सांगती पैसा छापणारं यंत्र

चुकून सुट्टी घेतलीच तरी पाहुणा स्वत:च्याच घरी दोन दिवस कौतुक होत, नंतर डोकेदुखी सारी

मुलंच मग विचारू लागतात, बाबा अजून का हो घरी? त्यांचाही दोष नसतो त्यांना सवयच नसते मुळी

क्षणिक औदासिन्य येतं मात्र पुन्हा सुरु होतं चक्र career career दळण दळता, स्वास्थ्य होतं वक्र

सोनेरी वेली वाढत जातात, घराभोवती चढलेल्या आतून मात्र मातीच्या भिंती, कधीही न सारवलेल्या

आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागतं काही धावण्याच्या हट्टापायी श्रासच मुळी घेतला नाही

सगळं काही पाहता पाहता, आरशात पाहणं राहून गेलं सुखाची तहान भागता भागता, समधान दूर वाहून गेलं

©saurabh s kore #writer
f4e86abf2197766df238e604dd6d1da6

saurabh s kore

Happy Rose day


एक Rose त्या आईला जीने मला जन्म दिला.

एक Rose त्या बापाला ज्याने माझा प्रत्येक हट्ट पुरवला.

एक Rose त्या भावाला जो नेहमी माझ्या सोबत असतो.

एक Rose त्या बहीणीला जिने नेहमी आईसारखी माया लावली.

एक Rose त्या मित्र / मैत्रिणींना जे अनोळखी असून सुद्धा रक्ताच्या नात्याप्रमाणे माया दाखवली

एक Rose त्या प्रत्येक व्यक्तीला ज्याने माझ्या सुख दुःखात
साथ दिली.

©saurabh s kore #HAPPY_ROSE_DAY
f4e86abf2197766df238e604dd6d1da6

saurabh s kore

Happy rose day

Kafi waqt se na ye khyaal tha k tumhe ek gulaab dun Par sath me ye sawaal bhi tha kek gulaab ko bhi kya gulaab doonUljaan me la k rkh dia hai tumne aur tum ho k uiljane bhdaye jaa rahe ho

Boht bar socha tha k abse yaad nahin krunga tumhe aur tum ho k yaadon me aaye jaa rahe hoTumhari ankhein na nashili c hai mera sara nasha door krti hai

Ye baatein tumhari mujhe tumhe or sun'ne pe majboor krti haiTo kisi gulaab se kya tulna krun tumhari ye titliyan bhi to gulaab se pehle sirf tumhe chuna psnd krti haiPar fer bhi sochta hun ke is khass mauke pe tumhe ek gulaab de ata hoon

Par milna tumne hai nahin to bs isi baat se reh jata hoonBs akhir me ek yehi rasta bachta hai pass mere Inh kavitaon k zariye tumhe ye baat pohchane ka.. 

Happy Rose Day.

©saurabh s kore
f4e86abf2197766df238e604dd6d1da6

saurabh s kore

#MorningGossip
loader
Home
Explore
Events
Notification
Profile