Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser6099551520
  • 17Stories
  • 40Followers
  • 113Love
    0Views

Rohini Pande

  • Popular
  • Latest
  • Video
fcd51f59121d23e0f4d057a02766acf7

Rohini Pande

सुन नारी तू नही अधुरी
कोक जनी है दुनिया सारी
चाहे जितनी उतनी हो प्यारी
वक्त पडे़ तो... तू बन चिंगारी

   तू आदिमा है तू है अंतिमा
    मातृभाव की तू परिसीमा
   हर मन बसी है तू रिधिमा
    संस्कृती तू ..तू ही है गरिमा

रोही

©Rohini Pande #navaratri
fcd51f59121d23e0f4d057a02766acf7

Rohini Pande

#5LinePoetry 

सरणा-या या वाटेला मज सांगायाचे आहे
मनात माझ्या अजून थोडे धावायाचे आहे

गोड हासरा तुझा चेहरा मज आवडतो राणी 
दु:खालाही सवे सखीच्या  थांबायाचे आहे

इशा-यातल्या, मुक्या वेदना ,तुला समजल्या का रे?
नेत्र कडांवर अश्रू येता रोखायाचे आहे

उजाड वस्त्या ,नुसती वणवण, पाण्यासाठी  होते
कधीतरी मज थेंबांमधुनी  बरसायाचे आहे


साखरेतली गोडी सरली ऊस वाळला इतका
भाव मिळेना गोडव्यास का पुसावयाचे आहे

थेंब दवाचे पानावरती पडले आणिक विरले
क्षण मोत्यांचे सरण्याआधी जगावयाचे आहे

आस जागवी किती "रोहिणी" वर्षावाच्या आधी
सरेल तगमग वर्षावाने भिजावयाचे आहे

रोही

©Rohini Pande
fcd51f59121d23e0f4d057a02766acf7

Rohini Pande

इक सुखा फूल, इक तेरी तस्वीर और बहोत से खत 
ये निशानियाँ तेरी मुझे उदास कर दे हर वक़्त

©Rohini Pande #रोही

#Flower
fcd51f59121d23e0f4d057a02766acf7

Rohini Pande

का कोण जाणे ..?
°°°°°°°°°°°°°°°°``°°°°
आज माझ्या भावनांशी,खेळले का कोण जाणे 
 आज सर्वस्वास माझ्या , चोरले का कोण जाणे 

अंत माझा जाहलेला,आज डोळा देखले मी
पाहिजे ते लाभले ना,भंगले का कोण जाणे

ओल सरता भावनांची, वाळले नाते खरे का?
वाळल्या नात्यात जगणे, भावले का कोण जाणे 

काळ थोडा जीवनाचा,अत्तराचा गंध सांगे
गंध उडता रंग जपणे ,संपले का कोण जाणे

रोज थोडासा मनी मी ,वेगळा निर्धार केला
पाहता मृत्यूस इतके,खंगले का कोण जाणे

शब्दनक्षत्र

©Rohini Pande #Shades

9 Love

fcd51f59121d23e0f4d057a02766acf7

Rohini Pande

डोळ्यात पाहता लाज दाटली आज रोमरोमात 
सौख्यात  घेतला हात सहज हातात रंगली प्रीत..१
ओढाळ पाखरू धुंद गोड मकरंद चाखतो रोज
रसदार साजणी भेट साद ती थेट वाटते मौज..२
केसात माळता फूल चांदणी भूल गंध हृदयात
गालात हासता नार रूप गुलजार कंप श्वासात..३
देहात दाटली वीज हरवली नीज प्रीत ओढीत
स्पर्शात भावले रूप लाजली खूप मुग्ध भेटीत..४
रंगात रंगली रात ध्यास श्वासात धुंदला खास
मोहात आज दोघात गोड अधरात माधुरी ध्यास..५

(शब्दनक्षत्र)

©Rohini Pande #wetogether
fcd51f59121d23e0f4d057a02766acf7

Rohini Pande

••असे कसे..!••

तुझ्या विना मुळात मी, जगायचे असे कसे
उन्हास सावली तुझी ,म्हणायचे असे कसे

उदास वाटते मला,  नसेल तो  जिथे जिथे
उधाण आठवातले, जपायचे असे कसे

तरारते धरा अशी, सहून गर्भ वेदना
तृणात प्राण ओतता, फुलायचे असे कसे

मला न आवडे तुझा,उदास चेहरा असा
हसून दाखवीत मी, बघायचे असे कसे
 
मलाच ठेच लागते ,उगाच नेमकी तिथे
भरून घाव तू तिथे, दिसायचे असे कसे

हसायचे रडायचे, तुझ्या कुशित आज ही
तुझ्या शिवाय माउली, जगायचे असे कसे

उनाड पावसात त्या, शहारले किती किती
मिठीत स्पर्श जागता, झुरायचे असे कसे

अजाण भावना तिची, हुशार नाटकी सखा
सुरेख जाल टाकले,निघायचे असे कसे

अनाम साद सावळी, तुझीच येतसे मला
अधीर होत आज ही,पळायचे असे कसे

शब्दनक्षत्र

©Rohini Pande #रोही

#freebird
fcd51f59121d23e0f4d057a02766acf7

Rohini Pande

गंधात कामिनीच्या, भरला वसंत आहे
वेडावते दुरूनी,भलतीच खंत आहे

सांभाळ बालिके तू, आता जरा स्वतः ला
शृंगार मांडण्याला..थोडी उसंत आहे

गर्वात सुंदरी ती,जाई निघून कोठे..?
मोहात पाडण्याची , इच्छा अनंत आहे

  गालावरी सखीच्या, गर्वात तीळ शोभे
   राहे समीप इतका, तो भाग्यवंत आहे

   निष्ठूर रूपगर्वी, ती चंचला दिवानी
  हृदयात खोल इतकी, का शोभिवंत आहे

टेकून नित्य माथा, भक्तीत रंगले मी
कळले मला न तेव्हा, खोटा  महंत आहे

  नासून जात आहे..हापूस कोकणाचा
   राजा जरी फळांचा... तो नाशवंत आहे

©Rohini Pande #रोही
fcd51f59121d23e0f4d057a02766acf7

Rohini Pande

तेज मनाचे मज लाभू दे काळोखाच्या आधी
मनातल्या मज अंधाराने छळावयाच्या आधी

गालावरची खळी खुलावी तू हसताना  राणी
अधरावरची गोडी चाखू उजडायाच्या आधी

कुणीतरी मज आवडले... हे कधीच नव्हते  झाले
बरा दुरावा काही भलते घडावयाच्या आधी

उंच उडावे नभी फिरावे असे ठरविले होते
पंख  छाटले कोणी माझे उडावयाच्या आधी

मैत्री केली माझ्यासोबत थोड्या  स्वार्थासाठी 
विश्वासाच्या  तुटल्या तारा जुळावयाच्या आधी

हसणे  रडणे  दोन्ही नाणे आयुष्याचे येथे
हसून घ्यावे पुष्कळ मनभर रडावयाच्या आधी


पाया मध्ये पाय घातले कित्येकांनी माझ्या
तरी पांगळी झाले नाही चालायाच्या आधी

दान मिळाले आयुष्याचे आनंदाने जगण्या
 जगून घेऊ चल, मृत्युला भेटायाच्या आधीc

©Rohini Pande #रोही
fcd51f59121d23e0f4d057a02766acf7

Rohini Pande

•••घटस्थापना•••

नवरात्रीचा सोहळा, घरोघरी रंगलेला
घट स्थापना करुनी,उत्साहात सजलेला |धृ|

तत्व रुजण्याचे आम्हा, काळी माती शिकविते
रास धान्याची रचता, मृद घट मी स्थापिते
घट पाण्याचा त्यावर,तृण धान्य अंकुरते

 देवी घरात येताना, तिचा जागर मांडला
घट स्थापना करुनी, उत्साहात सजलेला ||१||

माळ सोन चाफ्याची ही ,आज देवीला घातली
कलशाच्या पूजनाने,पूजा सुरू ही जाहली
शैलपुत्री रूप आज,नवरात्रीत सजली

यथासांग पूजा विधी, घाट उत्सवी घातला
घट स्थापना करुनी,उत्साहात सजलेला||२||

सामूहिक उत्सवात ,तिथे मूर्तीच्या समोर
घट मांडण्याची प्रथा ,चालू असे पूर्वापार
फुलमाला मळवट , केला देवीला शृंगार

उपवास देवीसाठी साऱ्या भक्तांनी ठेविला
घट स्थापना करुनी,उत्साहात सजलेला||३||

रोहिणी पांडे

©Rohini Pande #रोहिणी पांडे

#रोहिणी पांडे

5 Love

fcd51f59121d23e0f4d057a02766acf7

Rohini Pande

अश्को़का फसाना रोके ना रुकेगा
रोकोगे जितना उमड के आयेगा !

किसी की मुस्कान हावी है दिल पे
ताल्ल़ुख ए ईश्क़ अब नही आयेगा !
शब्दनक्षत्र #शब्दनक्षत्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile