Nojoto: Largest Storytelling Platform
sanikachalke1718
  • 38Stories
  • 62Followers
  • 247Love
    0Views

Sanika Chalke

कविता करण्याचा छंद

  • Popular
  • Latest
  • Video
fdbfe669f34d05949af9c451b615e2b2

Sanika Chalke

येईल अशी वेळ की
मनात असुन पण
प्रेम नाही करु शकणार
बघायच असुनही
मन भरुन नाही पाहू शकणार
चोरुन बघायच झालच तर
कोणी तरी पाहण्याची भिती 
वेडावल्या मनाला 
समजुन घ्यायला तिथे कोणीच नसेल

~सानिका~ #alone
fdbfe669f34d05949af9c451b615e2b2

Sanika Chalke

दगड झालेल्या तुझ्या मनाला
पाझर कधी फुटेल का
माझ्या मनातले प्रेम 
कधी तुला समजेल का
मनातले सारे मनात राहीले
वेळच अशी होती की
अंतर वाढत राहीले......

--सानिका चाळके. #मन
fdbfe669f34d05949af9c451b615e2b2

Sanika Chalke

गंध जीवनाचा

जीवनाचे गंध
आता सारे संपून गेले
दोन जीव भेटण्यासाठी
तडफड करु लागले
वेळ अशी होती की;
भेटणे ते राहीले
मनामध्ये असंख्य
प्रश्न येत असता
कोणा वाटले होते
वाट ही अशी मिळे
चालताना पायातुनी
रक्त भळभळत च राहीले......

--सानिका चाळके. #गंध जीवनाचा

#गंध जीवनाचा

fdbfe669f34d05949af9c451b615e2b2

Sanika Chalke

प्रेम करणे तुझ्यावर 
काही थांबले नाही
कवितेतून त्यांना;
बहर पुन्हा येत जाई
सुकुनि प्हाने जशी
पुन्हा बहरतील
माझी प्रीत ती वेदना लपवून
तुझ्या साठी नेहमी हसत राहील
 
    --सानिका चाळके.

fdbfe669f34d05949af9c451b615e2b2

Sanika Chalke

ओठांचा सामना
रोज रोज होतो
तिच्या मधाळ स्पर्शानी
   हल्ली शुद्धीत मी नसतो...


                   --सानिका चाळके. #तिचे ओठ
fdbfe669f34d05949af9c451b615e2b2

Sanika Chalke

प्रवास

एक गमतीदार प्रवास
तुझा अन माझा
नको म्हणता म्हणता 
कधी होकारात बदलून जाईल
ह्याचा काही ठाव ठिकाणा नव्हता
एक गमतीदार प्रवास.....

--सानिका चाळके. #प्रवास..
fdbfe669f34d05949af9c451b615e2b2

Sanika Chalke

तु बोलावे मज-पाशी
तुझ्या मनातले सारे
का अबोल असा तु
सांग तुझ्या मनातील गाणे,
मग तु धुंद होऊन जगावे
माझ्यात स्वतःला विसरावे
प्रित बहरेल तुझी ही
थोडे तु थांबावे
धीर नको सोडू तु
भेटेल तुला ते सारे
जे मनात तुझ्या आहे...

           --सानिका चाळके. #मन
fdbfe669f34d05949af9c451b615e2b2

Sanika Chalke

तुझ्या नजरेत स्वताला पहावे
ओठांना तुझ्या अलगद 
माझ्या ओठांनी बिलगून जावे असे की,
जसे मधमाशांनी फुलातून
मध शोसावे
बटांना तुझ्या बाजूला सारावे
घट्ट मिठीत बिलगुन घ्यावे
मानेवरी मोर पंख फिरवावे;
शहारे मग सर्व देहावरी फुलावे
शरीर दोन असले तरी
आत्म्याला एक रुप करावे.

--सानिका चाळके.

fdbfe669f34d05949af9c451b615e2b2

Sanika Chalke

ओठ शांत असताना
तुझे डोळे खुप काही
बोलून जातात
जरा कुठे स्थिरावलेल्या मनावर;
वादळी थैमान 
घालून जातात......


--सानिका चाळके.

fdbfe669f34d05949af9c451b615e2b2

Sanika Chalke

जिसने तुम्हे गले लगाया होगा
वो बहुत खुश नसीब होगा
हम तो कभी मिले भी नहीं 
फिर भी ;
तुम्हारे साथ होने का 
एहसास होता हैं...
उसी सुकून मैं जी रहे हैं
अगर मिल जाते तो बेचैन हो जाते
बेचैन होने से अच्छा 
सुकून ही सही......

--सानिका चाळके. #सुकून
loader
Home
Explore
Events
Notification
Profile