Find the Latest Status about कवी चे गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कवी चे गाणे.
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
Kavi Avinash Chavan(युवा कवी)
Vishal Chavan
कवी.. फुलांचा कळ्यांचा, वाडी वस्तीचा मळ्यांचा.. ओढ्याचा झर्यांचा, डबक्याचा अन तळ्यांचा... मी एक कवी, तिच्या गालावरच्या खळीचा.. गुलाबाचा जास्वंदीचा, बाभळीचा अन बोरीचा... आनंद लिहतो लेखणीने, लेखणीने दुःख लिहतो, विराणी गातो कंठाने, कंठाने आनंदगीत गातो.. जिथे जातो तिथे तिथे, तसा आणि तोच होतो.. स्वर्गात गेल्यावर स्वर्ग, नरकात गेल्यावर नरक होतो.. Vishaal/Aadinaath 18-07-21 ©Vishal Chavan #कवी
Dileep Bhope
कवी सुखदुःखांच्या ऐलतीरी अन् पैलतीरी शब्दांची सळसळती जाणीव हवी. अतृप्तीचे क्षण तर अनेक इथेतिथे जाणे तृप्तीत उणीव, तो एक कवी! ©Dileep Bhope #कवी
Gayatri Sonaje
कवी असो वा नसो मनातले लिहिण्यास पुर्ण अधिकार असतो... कडू गोड शब्द व्यक्त करून वेडेमन जरासे हलके करतो... ©Gayatri Sonaje कवी