Find the Best कवी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutभक्ति काल के कवी, पिंजऱ्यातील पोपट कविता कवी दत्त, कवी कलश यांच्या कविता, 'कवी ग्रेस यांच्या कविता', कवी कुसुमाग्रजांच्या कविता,
Shankar Kamble
शापित यक्ष... शामलवर्णी अस्तर ओढून गूढ नभाचे तेज लोपले झरोक्यातूनी डोकावत का अनोळखी मी बिंब गोपले.. उगां वाटते वठल्या झाडां कधी तरी येईल पालवी आस मनीची सुकते तेंव्हा वसंत जेंव्हा गरळ कालवी.. कैक फुलांचे कैक ताटवे स्वैर मुखाने दिशा चुंबिती कोश पांघरूण खुळा भ्रमर तो राग वीराणी सर गुंफिती.. विलुप्त झाल्या खुणा गहिऱ्या मागमूस ना मातीला आत कोंदला गंध कस्तुरी कळ युगाची छातीला.. चमचमणारे मंद काजवे भार पेलती नक्षत्रांचा शापित यक्ष पैलतीरी मी श्राप भोगतो आठवांचा.. ©Shankar Kamble #Blossom #शाप #एकाकी #कवी #मराठीकविता #शापित #सुमन #काव्य
Sachin Zanje
तुम्ही ज्या प्रकारचे , लोक भेटतील त्याप्रकारचे. कवी लेखक :- सचिन सदाशिव झंजे. ©Sachin Zanje #duniya #कवी #लेखक #सचिनझंजे.
Sachin Zanje
ठरवलं तर सगळं काही करू शकतो.. पण मनाला लागलं म्हणून ठरवलं, आणि मनाला कष्टदायक वाटत म्हणून सोडून दिलं , असे आपण काहीही साध्य करू शकत नाही.. म्हणून एखाद्या गोष्टीशी पक्के रहा... नक्कीच जे हवं ते प्रत्यक्षात भेटेलं. कवी लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे. ©Sachin Zanje #intezaar #वक्त.#सचिनझंजे #कवी #लेखक
Sachin Zanje
अहो, सांगा त्या बाजारातील वस्तूचा भाव कसा आहे.. कारण लिलाव तर ? खिशातील वजनावर होणार आहे.. कवी लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे ©Sachin Zanje #Sheher #सचिनझंजे.#कवी #लेखक
Sachin Zanje
दिल्याने वाढते ? मग ती कोणतीही गोष्ट असू दे .. कवी लेखक :- सचिन सदाशिव झंजे ©Sachin Zanje #God #कवी #लेखक #सचिनझंजे
Sachin Zanje
सुंदर विचारांच्या ,सुंदर दुनियेचा .. सुंदर तो विचार नेहमी यावा... सुंदर संगतीचा, सुंदर सहवासाचा.. सुंदर तो क्षण नेहमीच दिसावा... कवी लेखक:- श्री सचिन सदाशिव झंजे.. ©Sachin Zanje #yogaday #सचिनझंजे.#कवी #लेखक
Sachin Zanje
लिहून ठेवल्या गेल्या अनेक आठवणी शब्दरचनामध्ये गुंतून.. जाणेच नाही शक्य आता, त्या दिवसांमध्ये परतून तेव्हा बघ मी लिहलेले पान ते एकदा उघडून.. कवी लेखक :-श्री सचिन सदाशिव झंजे.. ©Sachin Zanje #सचिनझंजे.#कवी #लेखक
Dileep Bhope
कवी सुखदुःखांच्या ऐलतीरी अन् पैलतीरी शब्दांची सळसळती जाणीव हवी. अतृप्तीचे क्षण तर अनेक इथेतिथे जाणे तृप्तीत उणीव, तो एक कवी! ©Dileep Bhope #कवी
Shankar Kamble
कसे ओळखावे तुला भेटल्यावर? कसे शांत होणार रान पेटल्यावर? दवाचे सडे आज भिजले अवेळी नको पान तोडू पुन्हा जोडल्यावर.. गेले लयास मोठे स्वप्नातले मनोरे तलवार म्यान केली खिंडीत गाठल्यावर.. जुजबी बनाव होता जगण्यातला कसा हा गिळले वादळांनी पंख दोन्ही छाटल्यावर.. फिरूनी कितीदा गिरवतोस काय पुस्ती? होतात खुणां गहिऱ्या पुन्हा खोडल्यावर.. जुळवून आज घेते सुखाचे उखाणे अडवतो उंबरा का माप ओलांडल्यावर? भरभरून श्वास आता लाभले परंतु ठेवू कशात भरुनी क्षणगंध सांडल्यावर? ©Shankar Kamble #walkingalone #तू #भेट #भेटली_ती_पुन्हा #भेटतुझीमाझीस्मरते #गझल #मराठीशायरी #कवी #मराठीकविता