Nojoto: Largest Storytelling Platform

New शिवराय स्टेटस मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिवराय स्टेटस मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवराय स्टेटस मराठी.

    PopularLatestVideo

Kishor Rokade

मराठी हाक.. "जय शिवराय"

read more
"अस्तित्व"
खुप शब्दवेडे..अन भाववेडे.. 
पाहिले प्रेमवेडे या पानावर..!

मराठीकणा..मराठीबाणा 
शिव विचार ही घ्या मनावर..!

अस्तित्व आज आपले..
ज्या कर्म-विचारांवर जगले..!

त्या माझ्या शिवशंभुन साठी..
पानावर शब्दपुष्प मी वाहीले..!
            शब्दपुष्प मी वाहिले..!
            
जय शिवराय मराठी हाक..
"जय शिवराय"

Kishor Rokade

मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा "जय शिवराय"

read more
"एकी"
                              
आता कुठे आपण एक होतोय...संघटित होताना पूर्वी सारखा आनंद ही जाणवतोय..
 जरी नाही येत सोबत तुमच्या ,धावता मला...साथ नक्की राहील तुमच्या त्या योग्य वेळेला..!

आठवण मनात आहे अजूनही त्या गोड दिवसांची...
                                                   येईल का पुन्हा संधी इतिहासात जाऊन नांदण्याची..!

काय होत ते वावरणं,एकमेकांना सावरण ,प्रत्येकाची बातच निराळी होती..
                                                            स्वराज्याच्या मातीत आपुलकीची ओढ होती.!

पंचवीस तीस वर्षामागे सणांची जणुं पैजच लागायची... 
                                                     मात्र शिवरायांची जयंती सर्वांना एकत्र आणायची..!

जुना गड नवा गड म्हणुन स्वराज्याची ओळख असायची..
                                             हर एक गडावरील मातीतील मजा ही रांगडीच रहायची..!

दृष्ट लागण्याची खात्री आता मला पटली..
                            शहरीकरण ओद्योगिकतेच्या नावाखाली,काही शहरात मराठी आटली..!

स्व स्वार्थात बुडालेली अधिक आपलीच माणसे आहे..
                                                   आज च्या जातीवादाला सांग फुस कोणाची आहे..???

आवर घालुन भावनांना..साद घालतो साऱ्यांना..भविष्य विचार करण्याला ..या मराठी एकीकरणाला..
जोडा मराठी बोला चळवळीला..यश वाढेल.. बळ लाभेल.. मराठी अस्मितेला..मराठी माणसाला..!

                                            🚩🚩समर्पित🚩🚩
                                           मराठी एकीकरण समिती
                                               मराठी बोला चळवळ
                                                  मराठी अस्मिता
                               श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा
"जय शिवराय"

Kishor Rokade

जय शिवराय जय शिवराय..

read more
!! माझ्या राजा र...!!
पहा महाराज आज काय घडतं आहे..
तुमच्या मावळ्याला..शिवकार्यच नडत आहे.!

खऱ्या खोट्याची जाणं व्हावी..यासाठी 
छत्रपतींच्या वारसांचा..अन बाबराजें सोबत..
प्रत्येक शिवमावळ्यांचा जीव तळमळत आहे.!
पहा महाराज आज काय घडतं आहे..
तुमच्या मावळ्याला..शिवकार्यच नडत आहे.!

आज महाराष्ट्रात "शिवभक्त" शिव विचार..जपत आहे.!
त्या कार्याचं मोल..त्यांच्या पाठीवर उमटवलं जात आहे.!
पहा महाराज आज काय घडतंय आहे..
तुमच्या मावळ्याला शिवकार्यच नडत आहे..!

अश्रूंनी आज त्यांच्या..शिवचरणाला अभिषेक आहे.!
सर्व सहन करून देखील..शिवभक्त तटस्थ आहे..!
आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत..
याचा सार्थ अभिमान.. आम्हांस आहे..
दाखवुन देऊ शिव मावळ्यांच्या कार्याने..की
छत्रपती शिवरायांचे वाघ अजूनही जिवंत आहे.!
जय शिवराय..

©Kishor Rokade जय शिवराय

जय शिवराय..

vishnu thore

शिवराय

read more
 शिवराय

Bharat Yadav

mute video

Sachin Narkar

शिवराय

read more
"जयांसि वाटे व्हावे आपुले 
उज्वल भविष्य ,
तयांनी घ्यावा " शिवचरित्र"
हां- एकचि गुरुमंत्र"...
स्वच्छंदी 💞 शिवराय

AnishaDodke

शिवराय #मराठीकविता

read more
शिवराय

शिवनेरी किल्ल्यावरती
 जिजाऊंच्या पोटी
शहाजीचा पुत्र भोसलेचा
 कुलदीपक ठरलात तुम्ही!

माता जिजाऊंच्या संस्काराणे
घडलात तुम्ही
हुशार, स्वमिनिष्ठ ,करारी व अनुभवी आशा गुरुवर्य आई 
वडिलांकडून राज्याची लष्करी
शिकलात तुम्ही!

अन्याया विरुद्ध पेटून उटलेल्या
हरहर महादेवाच्या गजरात
रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची
प्रतिया घेतलीत तुम्ही!
मोगलशाई,आदिलशाही,
 निजामशाही सुरुंग लावलात 
तुम्ही!

जनता सुखी समाधानी राहावी
म्हणून राज्याभिषेक करून
घेतलात तुम्ही!
स्वराज्याची निर्मिती करून
स्वराज्य संकल्पक ठरलात
तुम्ही!

स्त्रिला स्वभिमानी कस वागायचं 
हे शिकवलत तुम्ही!
म्हणूनच तुमचे कार्य भारतीयांना
प्रेरणा देत राहतील 
अस वाचन देतोय आम्ही!

कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके

©AnishaDodke शिवराय

Bharat Yadav

mute video

Ramesh Mungale

जेय शिवराय #nojotophoto

read more
 जेय शिवराय

Kishor Rokade

जय शिवराय

read more
मराठीचा जीर्णोद्धार..

    शिवरायांचे आसन अन छत्रपती शासन..

          शुर सिंह अन त्याचा छावा..आज पुन्हा हवा.!


                                                  .  "जय शिवराय" जय शिवराय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile