Nojoto: Largest Storytelling Platform

New षडाक्षरी कविता नियम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about षडाक्षरी कविता नियम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, षडाक्षरी कविता नियम.

    PopularLatestVideo

vaishali

# षडाक्षरी काव्य #

read more
🌹 बहरली प्रीती 🌹

आज आठवते
रात्र मिलनाची
हा आकाशी चंद्र
साथ चांदण्यांची

घेतलास हात
माझा तुझ्या हाती
लाज आली गाली
बहरली प्रीती

तुझ्याच श्वासात 
हा गुंतला श्वास
आजही होतो त्या
आठवांचा भास

मोहरली काया
मिलनाच्या क्षणी
कशी विसरू या
गोड आठवणी # षडाक्षरी काव्य #

vaishali

झुंज # षडाक्षरी चारोळी #

read more
झुंज असे माझी
माझ्याच मनाशी
स्वतःची तुलना
का करू कुणाशी झुंज # षडाक्षरी चारोळी #

vaishali

निसर्ग उद्रेक # षडाक्षरी काव्य #

read more
निसर्ग उद्रेक

कधी हे वादळ
निसर्ग कोपला
सुरू महामारी
श्वास महागला

नाही माणसात
माणूस राहिला
एका विषाणूंने
हाहाकार केला

वादळाने उडे
छप्पर घराचे
सांग देवा किती
घाव सोसायचे

मृतदेहाने हा 
स्मशान भरला
उरली ना जागा
देह जाळण्याला

नको पाहू अंत
शिनला हा जीव
तूच आता वाली
कर देवा कीव निसर्ग उद्रेक # षडाक्षरी काव्य #

vaishali

भेटीची आस # षडाक्षरी काव्य

read more
भेटीची आस

वाट पाही सखी
पैलतीरावर
करुनिया सारा
हा साज शृंगार

मनाला भेटीची
लागली ही आस
कोणीतरी सांगा
तिच्या सजनास

आठवणींचे हे
दाटले काहूर
मनात भेटीची
असे हुरहूर

तिन्ही सांजवेळी
पाहते रे वाट
आता तरी सख्या
येऊनिया भेट

चंद्राची आपल्या
प्रेमाला रे साक्ष
घेऊया वचने
साऱ्यांच्या समक्ष भेटीची आस # षडाक्षरी काव्य

Prashant Mishra

ट्रैफिक नियम पर कविता

read more
अच्छा है  सितम्बर में  'वैलेंटाइन' नहीं है
सड़कों पे आशिकों की लंबी लाइन नहीं है
ट्रैफिक के नियम तोड़ना तो मँहगा हो गया
'दिल' तोड़ने पे मग़र कोई 'फाइन' नहीं है

--प्रशान्त मिश्रा ट्रैफिक नियम पर कविता

vaishali

तुझाच प्रेमात # षडाक्षरी काव्य ( प्रत्येक ओळीत ६ वर्ण )

read more

❤️तुझ्याच प्रेमात❤️

जीव हा रंगला
तुझ्याच प्रेमात
विरह कायम
आहे नशिबात

दूर राहूनिया
निभावतो नाते
आठवणीत या
मन हे झुरते 

काळजात तुला
जपते निरंतर
नसावे आपुल्या
मनात अंतर 

सुख माझे तुझ्या
सुखात शोधते
भेटीसाठी मन
माझे आतुरते

"मी आहे ना"शब्द
पुरे जीवनात
एक शब्द देई
जगण्या हिम्मत तुझाच प्रेमात # षडाक्षरी काव्य ( प्रत्येक ओळीत ६ वर्ण )

vaishali

तुला आठवता # षडाक्षरी काव्य ( प्रत्येक ओळीत ६ अक्षरे )

read more
🌷 तुला आठवता 🌷

तुला आठवता
पाणी डोळा येई
जुन्या आठवात
मन माझे जाई

किती घेतल्या तू
सांग आणाभाका
आज राहिला हा
रिता माझा झोका

तू देऊनी धोखा
खेळला हृदयाशी
प्रेम माझे खरे
मी विसरू कशी

वेदना कित्येक
झाल्या काळजाला
दुःख या मनाचे
सांगू मी कुणाला

विरहात तुझ्या
आश्रू मी गाळते
आठवण तुझी
रोज मला छळते तुला आठवता # षडाक्षरी काव्य  ( प्रत्येक ओळीत ६ अक्षरे )

ALL IS WELL

नियम ही नियम #Childhood #विचार

read more
गलत के लिऐ 'ना' 
सही के लिऐ 'हाँ'
 सोचना तो दूर, मौका कभी मिले तो चूकना मत

©ALL IS WELL नियम ही नियम

#Childhood

Anjali Ansh

नियम

read more
जो दोगे वही मिलेगा
नियती का‌ नियम यही चहुं और मिलेगा
कर्म करके भूल न जाना
हर बात का यहीं हश्र मिलेगा

मान दोगे मान मिलेगा
सम्मान दोगे, मिलेगा सम्मान
करी करूणा तो दिल को चैन मिलेगा
जो बोई नफरत तो नफरत का सैलाब मिलेगा।

आंसुओं के खेत में बद्दुआ का दरिया मिलेगा
बांटी जो मुस्कुराहटें, हंसी का तूफान मिलेगा
आज नहीं‌ करूं  कल -मुशकिलो का अमबार मिलेगा
तुम्हारी हर ताली पर, वाह वाही का भरमार मिलेगा

आज़मा लो चाहे बार  हज़ार 
 जीवन के हर मोड़ पर  नियम यही हर बार मिलेगा
सोच ऊंची रख प्यारे
सोच बुलंद रही अगर  हर मुश्किल का पार  मिलेगा!!! नियम

Rakhi Yadav

# नियम..... #thought

read more
****नियम****
 जो व्यक्ति जीवन में अपने लिए नियम नहीं बनाता.... उसे हमेशा दूसरों के नियमों पर चलना पड़ता हैI
 
अपने खुद के जीवन के लिए नियम बनाएं व नियम ऐसे हो जो दूसरों को भी सही लगे....
 दूसरे आप के नियमों को देखकर यह कहे कि जीवन ऐसे ही जीना चाहिए!!!
                         
                     Rakhi Yadav # नियम.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile