Nojoto: Largest Storytelling Platform

New मूर्तिकार की कहानी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मूर्तिकार की कहानी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मूर्तिकार की कहानी.

    LatestPopularVideo

Jiyalal Meena ( Official )

एक मूर्तिकार की कहानी 💥 Motivational Stories nojototeam trendingvideos Family NojotoFilms nojotohindi

read more

Jiyalal Meena ( Official )

विश्वास और प्रेरणा | एक मूर्तिकार की कहानी 👉 कहानियां हमें बहुत कुछ सिखाती है। कहना चाहूंगा कि जीवन में दूसरों के एक्सपीरियंस से हमेशा सीखने #प्रेरक #jiyalalmeena #IFPStorytelling

read more

Parshuram

मूर्तिकार #Society

read more

innocent girl

मूर्तिकार #Thoughts

read more

Somya Tiwari (Poetic_Girl_Somu)

pradeep soni

मूर्तिकार ओर भगवान.. #ज़िन्दगी

read more

AMRUTA PAWAR

मूर्तिकार तू निर्माता...!!! #story

read more
!! वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा !!



तूच निर्माता तूच सखा ...
तूच वाली तूच विधाता ...
बाप्पा तुझी मूर्ती तूच आंमचा कैवारी... 
 कर दाता तू गजानना...

जेव्हा तुझ्या हाताला मातीचा स्पर्श होतो,  स्पर्श झालेल्या मातीचा ओलावा डोक्यात चाललेल्या अंधुक ढोबळ संकल्पनेला चालना देतो,  तुझ्या हृदयातील अफाट प्रेमाला बांध न घालता पवित्र निर्मळ मनाने तू ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवतो,  जिच्या विविध देहबध्दांनी गणेश भक्तांच्या मनमंदिरी तुझ्या संकल्पनेने साकारलेल्या मनमोहक मूर्तीला आपल्या घरी घेऊन जाण्याच्या मोहात पाडतो ,   असा तू .....

गोष्ट एका युवकाची,   आमच्या मूर्तिकाराची ....!!!

तुझी शैली वाखाणण्याजोगी, जी नेहमीच दिखाव्याच्या प्रखरते खाली फिकी पडते, तुझा उल्लेख सहसा होत नाही परंतु तुझ्या हाथांनी साकारलेली प्रतिकृती  काहीशी वजनदार आकर्षणाचं जिवंत उदाहरण बनते. ईश्वराची अखंड व्याख्या तुझ्या बोलक्या डोळ्यांनी विस्तृत होते. आजतागायत चालत आलेल्या गणपती लीलांना वाव देत गणेशभक्तांचा तुझ्यात  वसलेला गूढ विश्वासाचा अखंड  विचार करून तू घडवलेली मूर्ती पुढच्या संपूर्ण वर्षभरासाठी एक ऊर्जादायक नवीन उमेद देते.
मूर्तीची सुबक देहबद्धता  हि, तुझ्या कटाक्षाने, एकाकग्रतेने तुझे ताणलेले लालसर डोळे दिवस रात्र एक केलेल्या  मेहनतीच  मनोगत गाते.
मूर्ती पूजा हा मानसपूजेचा प्रारंभ आहे. पारतंत्र्याच्या काळात  समाजाचे विचार मात्र  भ्रष्ट होत चालले  होते.  अश्या काळात लोकमान्य टिळकांनी विचार केला आणि उत्सवाच्या निमित्ताने सारे जण एकत्र येतील या दृष्टीने त्यांनी गणेश  उत्सवाची कल्पना  रुजू  केली. त्यांच्या विचार मंथनाचा प्रभाव सामान्य लोकांना भावला आणि लोकमान्य टिळकांच्या विचारांची फलश्रुती   म्हणजे  सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात झाली. यासाठी  भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसांचा काळ निश्चित करण्यात आला.
लोकप्रिय असलेला हा धार्मिक उत्सव पुढे राष्ट्रीय स्वरूपात साजरा होऊ लागला. राष्ट्रीय उत्सवाद्वारे राष्ट्रीय एकता या मंत्राचा प्रचार होईन हे या मागचे मूळ उद्दिष्ट होते.  लोकमान्य टिळकांच्या या पुढाकारा मुळे राष्ट्रीयत्वाची भावना जनतेमध्ये जोपासण्याचा बळ मिळालं. सोबतच साहित्य आणि कलेला देखील वाव मिळाला.  उत्सवाला अजून बहारदार बनवण्यासाठी  विविध  कार्यक्रमांना स्थानिक भाषेत सादर करण्याची संधी मिळाली. वाढत्या लोकप्रियतेमुळे स्थानिक भाषेचा आदर वाढत गेला. भाषेला मोठा रंगमंच मिळाला. रंगमंचाची प्रगती वाढतच गेली.
नवीन नाटक, लिखाण, या सगळ्यांची सांगड घालून  त्याचा   मोठ्या  रंगमंच्यावरच सादरीकरण, या सगळ्यामध्ये आकर्षण आजतागायत टिकले. अर्थातच, छोट्या रंगमंचाच्या वाटचालीपासून मोठ्या रंगमंचाच्या वाटचाली मध्ये गणेश मूर्तीच्या आकारामध्ये   देखील  स्पर्धकता वाढत गेली. हळूहळू छोट्या  मूर्ती पासून मोठ्या आकाराच्या   मूर्तीचे  फॅड देखील निघाले. कुठे ना कुठे स्वराज्याचा सुराज्य मध्ये पलटण होताना कुठेतरी मात्र आतिष योक्ती ला सुरुवात झाली आणि पुढच्या काळात मात्र डोळ्यांना झोंबणारा रोषणाईचा झगमगाट, विचित्र वेगळ्या वाटेने चाललेल्या हिंदी चित्रपट संगीतात, पाश्चिमात्य  थाटाच्या संगीत कार्यक्रमात वळला गेला .  असो, या सगळ्या झपाट्याने होत असणाऱ्या बदलांमध्ये एका गोष्टीने मात्र मुख्यतः रसिकांनी, कलेच्या  जाणकार व्यक्तींचा लक्ष वेधून घेतला  ते म्हणजे देवाचा निर्माता मूर्तिकार . लोकांच्या श्रद्धास्थाना मध्ये मोठा वाटा असणारे मूर्तिकार गणेश चतुर्दशीच्या चार -  पाच  महिन्यांआधी मूर्ती घडवण्याच्या कामाला  सुरुवात करतात. स्वहाथाने निर्मिती करत असलेला मूर्तिकार मूर्तीच्या नयन कमळाची  नक्षी कोरतो.
अलगदपणे ब्रशच्या साहाय्याने  कोरीव रचलेल्या डोळ्यात साजेश्या रंग संगतीने डोळ्यांना बोलके करतो.
त्याच्या कौशल्याने रंग संगतीच्या साहाय्याने  मूर्तीला हावभावात्मक बनवतो. मूर्तीच्या याच रुपाला पाहून नागरिकांच्या संकल्पनेला अजून असा दुजोरा दिला जातो .  करोडो नागरिक श्रद्धेने मूर्ती पूजा करतात आणि पुढील आयुष्याच्या सुखद वाटचाली साठी मनोकामे इच्छा मागतात आणि  थाटात, आनंदमयी वातावरणात अनंत चतुर्दशीच्या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने गणेश मूर्तीचे विसर्जन करतात.
POP मूर्तींचा व्यवसाय हा  पर्यायाने जरी कमी वेळात जास्त पैसे मिळवून देणारा असला तरीही समाजाने अजून  एकदा यावर योग्य निर्णय घेऊन  शाडू  मातीच्या मूर्तींना प्राधान्य देणं प्रामुख्याने गरजेचं आहे.

निर्मात्या तू मूर्तिकारा ....!!!

तुझे आभार ...!!!
मूर्तिकाराच्या कलेला अजून एक छेडण्यासारखा मुद्दा अर्थातच धावपळीच्या वातावरणा मध्ये देखील स्वतः कडे  कटाक्षाने लक्ष घालणे  महत्वाचे.
आयुष्य देखील बाप्पाच्या कोरीव मूर्तीसमान असावं  जिथे घडवणारा समाज जणू मूर्तिकार घडलेल्या व्यक्तिमत्वाकडून  फक्त आणि फक्त सकारात्मक स्पंदने घेईन .

गणपती बाप्पा मोरया....!!!  मूर्तिकार तू निर्माता...!!!

Homendra Kumar

#Colors कविता की कहानी।#कहानी

read more

Bhairav Dey

कहानी की बोल #कहानी @bhairavdey #जानकारी

read more

Vivek

#कहानी हालातों की #कहानी हमारे बनने बिगड़ने की # #प्रेरक

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile