Nojoto: Largest Storytelling Platform

New उगवला चंद्र पुनवेचा lyrics Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उगवला चंद्र पुनवेचा lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उगवला चंद्र पुनवेचा lyrics.

    PopularLatestVideo

Mahesh Lokhande

स्वातंत्र्याचा सूर्य उगवला #poem

read more
स्वातंत्र्याचा सूर्य उगवला

स्वातंत्र्याचा सूर्य उगवला
तेज चहूकडे फाकले
स्वातंत्र्याच्या या तेजाने
विश्व सारे दिपले॥धृ॥

फळाफुलांनी नटली अवनी
कृतार्थ झाली इथली जननी
शेतकरी हा समर्थ झाला
हरितक्रांतीने हे केले॥1॥

दुधातूपाची अवतरली गंगा
कृतार्थ केले भारतीयांना
गुरे वासरे नाचू लागली
धवलक्रांतीने हे केले॥2॥

साक्षर झाली इथली जनता
कृतार्थ झाली भारतमाता
सिलीकाॅन व्हॅलीमध्ये जाऊनी
संशोधन यांनी केले॥3॥

अमेरिकेने तंत्र न दिले
हिंदपुत्राने स्वतःच मग
महासंगणक बनवले
माहिती तंत्रज्ञानाने
हे केले॥4॥

कवी=महेश लोखंडे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला

nisha Kharatshinde

रवी उगवला नाही #मराठीकविता

read more
रवी  उगवला नाही

पाहण्यास आज रवीस
सजूनी पहाट आली
शृंगार वाट पाहे
अन् रवी उगवला नाही

चमकूनी दवबिंदू ते
थबकले पानांवरी
भ्रमरही गुंजारव मग
करु लागले सुमनांवरी

दाट धुक्यात त्या
पहाटही सज्ज होती
नेसुन शालू हिरवा
प्रतिक्षेत उभी होती

प्रसन्नतेचा शुभ्र पिसारा
अतुरता ही वाढलेली
क्रूर मेघ दाटून गडद
वाट रवीची रोखलेली

✍️निशा खरात/शिंदे
(काव्यनिश)

©nisha Kharatshinde रवी उगवला नाही

Suraj Agade

काय बरे झाले असावे चंद्राला,
का रडतोय तो घेऊन ढगांचा सहारा...??

त्यालाही असावे का कसले दुःख,
की त्यालाही मग आठवणींचा सहारा.?? #चंद्र

सतीश देशपाडे

चंद्र

read more
mute video

कवी - के. गणेश

चंद्र..

read more
सुगंध तुझ्या सहवासाचा
अंगणी माझ्या दरवळत राहतो..
पूनवेच्या चंद्राची शीतलता 
मी तुझ्या रुपात पाहतो..! चंद्र..

pratiksha's poem

चंद्र... #Gif

read more
रात्रीच फक्त दिसतोस तु..
मनातल्या मनात जणु हसतोस तु..
दु:खाच्या अंधाऱ्या रात्रीत तुझ्या सुखाचा प्रकाश असाचं राहु दे..
चमचमत्या चांदण्यात तुझं अस्तित्व आम्हाला नेहमी दिसु दे..
आणि आमचा लाडका चांदोबा म्हणुऩ 
तुझं स्थान आमच्या ह्रदयात असचं वसु दे.. #gif चंद्र...

Vishal Chavan

चंद्र #मराठीशायरी

read more
पौर्णिमा...

डोळे भरुन बघून घेतो, सजलेलं चंद्रबिंब..
मन भरून जगतो, होतो आनंदात चिंब...
पूनवेच्या चंद्रासम, सजू दे उपेक्षितांच आयुष्य..
 अस्तित्वावर तलवार ज्याच्या, मिळो त्याला भविष्य...

चंद्र शिंपण करत फिरतो, चांदणं वत्सल चंदेरी...
चंद्र आहे हा विश्वास असुदे, आली रात्र जरी अंधारी..
 अमावस्येला असतो तो, तुला तो विसरत नाही..
एक दिवस विश्रांती घेतो, विश्रांती घेतो; मरत नाही...  

17-12-2021
Vishaal/Aadinaath

©Vishal Chavan चंद्र

उमा जोशी

मावळतीला जातोस तू
उगवतीचा घेऊन निरोप
चंद्र खेळतो मग आभाळी
अंधाराचा त्यावर आरोप
@गुज
©उमा जोशी #चंद्र

priyanka

चंद्र #poem

read more
चंद्र नभीचा 
या मनीचा
क्षण सुखाचा
गुजगोष्टी कराया
तूज संगे एक माझा राया... चंद्र

somnath gawade

नभीचा चंद्र आज हृदयी दाटला;
भेट होता तीची आनंद वाटला.
 #चंद्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile