Find the Latest Status about meaning of अष्टाक्षरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, meaning of अष्टाक्षरी.
vaishali
घर तुझं आणि माझं त्याला विश्वासाच्या भिंती वर प्रेमाचे छप्पर सुख ओंजळीत किती शब्दसंगिनी अष्टाक्षरी चारोळी #mrathiquotes
vaishali
प्रेमावर बोलू काही शब्द झालेत अबोल सारे गुपित जाणण्या पहा काळजात खोल — % & अष्टाक्षरी चारोळी #मराठी_quote
vaishali
🌷 बालपण 🌷 जगू पुन्हा बालपण वाटे व्हावे मी लहान तेव्हा नसतो विचार नसे कुठलाच ताण रडल्यावरती सारे खाऊ देतात गोड आई बाबा ताई दादा सारे करतात लाड नसे दुःख फक्त खेळ सुखी असे बालपण मोठे होऊन कळते गमावले छान क्षण आयुष्याच्या शिदोरीत असे सुंदर हा ठेवा वाटे मला पुन्हा पुन्हा बालपण देगा देवा बालपण ( अष्टाक्षरी काव्य )
vaishali
पडे टिपूर चांदणं अवखळ वाही वारा दोघे समुद्र किनारी बसू एकांतात जरा खळखळ करी लाटा फेसाळला दर्या सारा मन हे बावरे झाले माझे बघून नजारा हात हा हाती घेऊन स्वप्न उद्याची रंगवू विसरुनी जग सारे प्रीत ही मनी रुजवू चंद्र चांदण्यांची साक्ष असे आपुल्या प्रेमाला कधी ना विसरणार मन या गोड क्षणाला प्रीत #अष्टाक्षरी काव्य#
vaishali
🌹सल तिच्या मनातली 🌹 इतिहास आहे साक्ष तिच्या कर्तृत्वाची गाथा तीला काही सांगायचे आज मनातील व्यथा घ्यावा मोकळा श्वास मी तिला वाटे पुन्हा पुन्हा स्वतःसाठी जगणे हा तर नाही मोठा गुन्हा मग का ? तिच्या घालती पायी बेडी बांधनांची कधी केली जाते होळी फक्त तिच्याच स्वप्नांची पंख तिचे हे छाटले उंच उडण्या आधीच दुःख तिच्या काळजाचे नाही कळले कधीच उरी भावना घेऊन मनी आजही झुरते सल तिच्या मनातली डोळ्यांतून पाझरते अष्टाक्षरी काव्य #मराठीलेखणी
vaishali
अग्निपरीक्षा पतिव्रता नारी सीता दिली ही अग्निपरीक्षा चूक नसताना सुद्धा भोगायची स्त्री ने शिक्षा केला त्याग हा रामाने तरी मनी त्याचा ध्यास चौदा वर्षांनंतरही सुरू तिचा वनवास #अग्निपरीक्षा# अष्टाक्षरी आठोळी #
vaishali
🍁 विरह 🍁 साजनाच्या भेटीसाठी आतुरले माझे मन क्षणोक्षणी होत आहे सख्या तुझी आठवण तुझ्या विरहात सख्या दिनरात मी झुरते तुझ्या आठवणीतच माझे जीवन सरते असे तू रे दूर लागे काळजाला हुरहूर मनी माजले साजना माझ्या भीतीचे काहूर तुझ्या भेटीची लागली माझ्या मनाला ही आस सांग कधी सरणार सख्या विरहाचे दिस # विरह # अष्टाक्षरी काव्य #
vaishali
शेवटच्या श्वासालाही आस तुझ्या होकाराची काळजात माझ्या दिसे छबी तुझ्याच प्रेमाची — % & #मराठी_quote अष्टाक्षरी चारोळी