Nojoto: Largest Storytelling Platform

New अष्टाक्षरी कविता नियम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अष्टाक्षरी कविता नियम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अष्टाक्षरी कविता नियम.

    LatestPopularVideo

vaishali

रिमझिम पावसात (अष्टाक्षरी कविता)

read more
🌹रिमझिम पावसात🌹

रिमझिम पावसात
असे हात तुझा हाती 
पावसाच्या येण्याने ही
सुगंधित झाली माती

गोरे गोरे रूप तुझे
पावसात ग भिजले
पावसाच्या थेंबानी हे
तुझे यौवन सजले

पसरला हा गारवा
मिठी तुझी उबदार
लाज लाजुनी झालीस
सखे तू ग चुर चुर

लाजू नकोस ग प्रिये
अशी जवळ ये माझ्या 
मकरंद टिपू दे ग
सखे ओठातला तुझ्या

नको करुस बहाणे
होऊ एकरूप आज
तुही घाल आज सखी
माझ्या मिठीचा ग साज रिमझिम पावसात (अष्टाक्षरी कविता)

RJ कैलास नाईक

# अष्टाक्षरी #nojotophoto

read more
 # अष्टाक्षरी

RJ कैलास नाईक

# अष्टाक्षरी #nojotophoto

read more
 # अष्टाक्षरी

vaishali

अष्टाक्षरी चारोळी #mrathiquotes

read more
घर तुझं आणि माझं 
त्याला विश्वासाच्या भिंती
वर प्रेमाचे छप्पर
सुख ओंजळीत किती

    शब्दसंगिनी  अष्टाक्षरी चारोळी #mrathiquotes

vaishali

अष्टाक्षरी चारोळी #मराठी_quote

read more

प्रेमावर बोलू काही
शब्द झालेत अबोल
सारे गुपित जाणण्या
पहा काळजात खोल
— % & अष्टाक्षरी चारोळी #मराठी_quote

vaishali

बालपण ( अष्टाक्षरी काव्य )

read more
🌷 बालपण 🌷

जगू पुन्हा बालपण
वाटे व्हावे मी लहान
तेव्हा नसतो विचार
नसे कुठलाच ताण

रडल्यावरती सारे
खाऊ देतात गोड
आई बाबा ताई दादा
सारे करतात लाड

नसे दुःख फक्त खेळ
सुखी असे बालपण
मोठे होऊन कळते
गमावले छान क्षण

आयुष्याच्या शिदोरीत
असे सुंदर हा ठेवा
वाटे मला पुन्हा पुन्हा
बालपण देगा देवा बालपण ( अष्टाक्षरी काव्य )

vaishali

प्रीत #अष्टाक्षरी काव्य#

read more
पडे टिपूर चांदणं
अवखळ वाही वारा
दोघे समुद्र किनारी
बसू एकांतात जरा

खळखळ करी लाटा
फेसाळला दर्या सारा
मन हे बावरे झाले
माझे बघून नजारा

हात हा हाती घेऊन
स्वप्न उद्याची रंगवू
विसरुनी जग सारे
प्रीत ही मनी रुजवू

चंद्र चांदण्यांची साक्ष
असे आपुल्या प्रेमाला
कधी ना विसरणार
मन या गोड क्षणाला प्रीत #अष्टाक्षरी काव्य#

vaishali

अष्टाक्षरी काव्य #मराठीलेखणी

read more
🌹सल तिच्या मनातली 🌹

इतिहास आहे साक्ष
तिच्या कर्तृत्वाची गाथा
तीला काही सांगायचे
आज मनातील व्यथा

घ्यावा मोकळा श्वास मी
तिला वाटे पुन्हा पुन्हा
स्वतःसाठी जगणे हा
तर नाही मोठा गुन्हा

मग का ? तिच्या घालती
पायी बेडी बांधनांची
कधी केली जाते होळी
फक्त तिच्याच स्वप्नांची

पंख तिचे हे छाटले
उंच उडण्या आधीच
दुःख तिच्या काळजाचे
नाही कळले कधीच

उरी भावना घेऊन
मनी आजही झुरते
सल तिच्या मनातली
डोळ्यांतून पाझरते अष्टाक्षरी काव्य #मराठीलेखणी

vaishali

अग्निपरीक्षा# अष्टाक्षरी आठोळी #

read more
अग्निपरीक्षा 

पतिव्रता नारी सीता
दिली ही अग्निपरीक्षा
चूक नसताना सुद्धा
भोगायची स्त्री ने शिक्षा

केला त्याग हा रामाने
तरी मनी त्याचा ध्यास
चौदा वर्षांनंतरही
सुरू तिचा वनवास #अग्निपरीक्षा# अष्टाक्षरी आठोळी #

vaishali

# विरह # अष्टाक्षरी काव्य #

read more
🍁 विरह 🍁

साजनाच्या भेटीसाठी
आतुरले माझे मन
क्षणोक्षणी होत आहे
सख्या तुझी आठवण

तुझ्या विरहात सख्या
दिनरात मी झुरते
तुझ्या आठवणीतच
माझे जीवन सरते

असे तू रे दूर लागे 
काळजाला हुरहूर
मनी माजले साजना
माझ्या भीतीचे काहूर

तुझ्या भेटीची लागली
माझ्या मनाला ही आस
सांग कधी सरणार
सख्या विरहाचे दिस # विरह # अष्टाक्षरी काव्य #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile