Find the Latest Status about उन्नत शेती समृद्ध शेतकरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उन्नत शेती समृद्ध शेतकरी.
Shankar kamble
सुगी सराईचं दिस नाही इसावा पायाला माय माळ तुडविते चार मोत्याच्या दाण्याला.. भर उन्हाचा काहूर भिजं घामानं पदर आग पोटात पेटली चिल्या-पिल्याचा इचार... धाटं-धाटं जमवूनी भारा जोंधळ्याचा डोई लयी तापली ढेकळं भार संसाराचा वाही... काट्या-कुट्यात चालता देह -मनाला जखमां* *घाली फुंकर स्वतःच चिंधी बांधते त्या कर्मा* ... अंग मोडूनियां काम नाही घडीचा आराम* वात तीळ तीळ जळे दिव्यासंग ज्योत ठाम...* *घोट पिऊनिया पाणी दूर सारते भुकेला* शिळ्या तुकड्या संगती पचविते नशिबाला...* सांज ढळता-ढळता रास सरली-सरली* ऊत आला तुझ्या दारी झोळी अर्धी भरली...* मोती झोळीत की डोळा दोन्ही नाहीत येगळा* * घास भरविते माय सारा अमृत सोहळा...* ©Shankar kamble #सुगीचे #रास #शेतकरी #🎑शेती #शेती #SunSet
Abhijeet Jagtap
निसर्ग अन् शेतकरी निसर्गाला वाटते दमला आहे माझा शेतकरी... तेव्हा तो बरसवतो सरी आपुलकीने.. किलबिलाट तव उठतो पावश्या घुम पावश्या घुम् जणू धरणीमाय कवटाळते त्याला लेकराप्रमाने.. साथीला येतात बुबुळासारखे ढग.. अन् कथ्थक करतो तो मोर नाचरा.. बरसतात सरी एकामागून एक.. जणू वसुजानकीचा तो कृष्ण हासरा.. शेतकरी आणि निसर्ग म्हणजे जणू सख्खे भाऊ.. एकत्र आले तर बनतील हे अख्ख्या गावाचे राव.. अन् गेले विरोधी एकमेकांच्या.. तर यांना रंकाचाही मिळणार नाही भाव.. साथ दे निसर्गा , वाट दे निसर्गा.. कष्टाची होऊदे चीज त्याच्या.. आजवर झेलली खूप दुःखे त्याने.. त्यास दिसुदे एकदा सुखाची पहाट निसर्गा... त्यास दिसुदे एकदा सुखाची पहाट निसर्गा... -अभि...✍ #मायमराठी #मराठी #मराठीकविता #शेती #शेतकरी #गावाकडची_रानफुलं #कष्ट
Shankar kamble
आल्या वळीवाच्या सरी माती न्हाती धुती झाली बीजं रुजलं काळजात सांज शहारून आली भेगाळल्या जीवा असं शिंपण सुखाचं माळ शिवारात फुलं आता सपान मोत्याचं वणव्यात वैशाखाच्या सुखं करपून गेलं करणी त्या परमेशाची डोळं नभाचं पाणावलं ठाई ठाई पांढरीत मेघराशी बरसल्या सुपाएवढं काळीज बळीराजा हरखला फुट मनाला अंकुर हात जोडी धरतीला सुखं पेरलं मातीत सारा भार देवा तुला ओटी भरली ओंजळ पिकं येवो मायंदळ सोन्या मोत्याची ही रास आता भरू दे हे खळ ©Shankar kamble #पाऊस #पाऊसधारा #शेतकरी #पेरणी #शेती #वळीवाचापाऊस #धारा #पाणी_पाऊस_देगा_देवा
Shankar kamble
🌾 *सुगी...* 🌾 *सुगी सराईचं दिस* *नाही इसावा पायाला* *माय माळ तुडविते* *चार मोत्याच्या दाण्याला...* *भर उन्हाचा काहूर* *भिजं घामानं पदर* *आग पोटात पेटली* *चिल्या-पिल्याचा इचार...* *धाटं-धाटं जमवूनी* *भारा जोंधळ्याचा डोई* *लयी तापली ढेकळं* *भार संसाराचा वाही...* *काट्या-कुट्यात चालता* *देह -मनाला जखमां* *घाली फुंकर स्वतःच* *चिंधी बांधते त्या कर्मा* ... *अंग मोडूनियां काम* *नाही घडीचा आराम* *वात तीळ तीळ जळे* *दिव्यासंग ज्योत ठाम...* *घोट पिऊनिया पाणी* *दूर सारते भुकेला* *शिळ्या तुकड्या संगती* *पचविते नशिबाला...* *सांज ढळता-ढळता* **रास सरली-सरली *ऊत आला तुझ्या दारी* *झोळी अर्धी भरली...* *मोती झोळीत की डोळा* *दोन्ही नाहीत येगळा घास भरविते माय सारा अमृत सोहळा ©Shankar kamble #सुगीचे #रास #शेती #🎑शेती #शिवारात #Morning