Find the Latest Status about जिससे जातील दिस येतील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिससे जातील दिस येतील.
Vilas Bhoir
आलं पेरणीचं दिस.... जा तू बळीराजा कर पेरणी शिवारी तुझ्या स्वप्नात जणु घे तु नव्याने भरारी आलं पेरणीचं दिस.... विश्व अंबराचे धन नांगर रुतला मातीत बीज पेरणी करता अंकुर फुटेल रसात आलं पेरणीचं दिस.... काळ्या मातीचं हे देणं येतं आभळ भरून पावसाचा थेंब थेंब घेतं बियाणे शोषून आता सरलं वरसं मासं आलं पेरणीचं दिस आलं पेरणीचं दिस.... - विलास भोईर (आलं पेरणीचं दिस....) आलं पेरणीचं दिस....
somnath gawade
हे ही दिवस जातील.. स्वतः भोवती घोंघावणारं निराशेचे वादळ गिळू पाहतेय माझ्या चिरंजीवी स्वप्नांना... माझ्या अभेद्य आत्मविश्वासाला आणि स्वाभिमानाला असंख्य टक्करा देणारे हे संकटांचे तोफगोळे कधीच खिंडार पाडू शकणार नाही... फिनिक्स पक्षाची पुन्हा ज्वालेतुन निर्माण होण्याची उर्मी ह्रदयाशी बाळगून अखेरपर्यंत अन्यायाविरुद्ध लढत राहीन. पुन्हा-पुन्हा स्वतः ला एकच सांगावंसं वाटतंय हे जे आज आहे ते कधीच शाश्वत राहणार नाही. दुःखाचे आणि सुखाचेही क्षण कधीच चिरकाल असू शकत नाहीत. हे ही दिवस जातील.