Find the Latest Status about sandhi sudha oil from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, sandhi sudha oil.
Sudha Betageri
White **दृष्टी** "हे देवा, थोडीशी जरी मज अंधुक दृष्टी दिली असतीस...... सुंदर तुझ्या या सृष्टीचे सौंदर्य मीही निहारले असते, रानावनात उमलेल्या फुलांना मीही परखले असते, उंच उंच डोंगराच्या रांगांना, आकाशात उंच भरारी मारणाऱ्या पाखरांना मीही पाहिले असते.... थोडा सा जरी मज अंधुक प्रकाश दिला असतास..... विशाल अशा या सागराचे, झुळझुळ वाहणाऱ्या नदीचे सौंदर्य मीही पापण्यात सामावले असते धो धो पडणाऱ्या पावसात टप टप पडणाऱ्या गारांना मीही वेचले असते इंद्रधनुच्या रंगात थोडी तरी मीही रंगले असते , थोडासा जरी मज अंधुक प्रकाश दिला असतास... हे देवा, थोडीशी जरी मज अंधुक दृष्टी दिली असतीस....." ************************ सौ. सुधा सुधीर बेटगेरी (बागलकोट) ©Sudha Betageri #sudha
Sudha Betageri
🎉🎉**नववर्ष***🎉🎉 काही जुन्या आठवणींचा सरला, आणखी एक वर्ष..... काही सुखद, तर काही दुःखद, क्षणांचा साक्ष झाला आणखी एक वर्ष... काही साकार, तर काही अधुऱ्या स्वप्नांनी बनला, आणखी एक वर्ष...... नव्या आठवणींना, नव्या उमेदीला पेरून गेला, आणखी एक वर्ष... अनेक शिकवणूक, अनेक अनुभव देऊन गेला आणखी एक वर्ष..... मिळून मिसळून राहू, सदैव चालू राहू दे, असाच नववर्षाचा उत्साह, आणखी कैक, कैक वर्ष..... ************************** सौ.सुधा सुधीर बेटगेरी (बागलकोट) ©Sudha Betageri #Sudha
Sudha Betageri
White ""Neutralize the acidity of your sorrows with basic solution of sweet memory....."" ©Sudha Betageri #sudha
Sudha Betageri
***वसुंधरा*** अनेक तुझे उपकार, वसुंधरे, अनेक तुझे उपकार ही प्रकृती, हा जल, वायू, मृदा, सारी तुझीच देण, वसुंधरे, सारी तुझीच देण. उंच पर्वत, खोल दरी,झुळझुळ पाणी, मंद हवा, घनघोर अरण्य, हिरवीगार राने, दिसतेस किती छान, वसुंधरे, दिसतेस किती छान! सूर्योदय-सूर्यास्ताचा हा लपंडाव, चांदण्यांची शीतल जरतार,पक्षांचा किलबिलाट, फुलांचा गंध दरवळतो तुझ्याच भोवती, वाह तुझे रूप, वसुंधरे, वाह तुझे रूप! पिकांमध्ये श्वास तुझा,फुलांमध्ये गंध तुझा, फुलपाखरांवर रंग तुझा,पशुपक्ष्यांनाआधार तुझा, वाह तुझे वरदान, वसुंधरे,वाह तुझे वरदान! तुझ्यामुळेच ऋतुचक्रांचा खेळ, साऱ्या सजीवांची तू जीवननाळ, तुझ्यामुळेच जीवनाचे घड्याळ, तुझ्यामुळेच स्वप्नांचे आभाळ, तुझ्यामुळेच प्रेमाची मोहक माळ. अनेक तुझे उपकार, वसुंधरे, अनेक तुझे उपकार! ************************** सौ. सुधा सुधीर बेटगेरी (बागलकोट) ©Sudha Betageri #sudha
Sudha Betageri
White **भूक*** इंधन नसतानाही पोटाला आग लावणारी, झळ नसतानाही चटके देणारी, शब्द लहान पण व्याप्ती महान, शब्द दोनच पण गाथा महान, रोटी, कपडा, मकान या मूलभूत गरजांतही तिचेच अग्रस्थान. कोण आहे ती? तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई...... नुकत्याच जन्मलेल्या तान्ह्या बाळापासून मृत्यूस आलिंगन देण्यास सज्ज झालेल्या वयोवृद्धांपर्यंत, सर्वांनानिकट असणारी. गरीबांच्या वस्तीत तिच्यामुळेच मारामारी, भिक्षुकांना तिच्यामुळेच पळापळी. कोण आहे ती? तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई........ कोणाला अन्नाची,तर कोणाला पैशाची, कोणाला खुर्चीची,तर कोणाला कीर्तीची, कोणाला सत्तेची,तर कोणाला विद्येची. सारे तिच्याच मागे!कोण आहे ती? तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई....... तिच्यामुळेच माणूस कधी बनतो,तर कधी बिघडतो. कधी लढतो, तर कधी लढवतो. कधी झुंज देतो, तर कधी झुरतो. कोण आहे ती? तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई....... ©Sudha Betageri #sudha
Manvi Gangwar
Manvi Gangwar
White : A man paints with his brains and not with his hands. In Hindi: व्यक्ति अपने दिमाग से पेंट करता है अपने हाथों से नहीं. ©Manvi Gangwar famous artist Raphael painting - La vellata oil colour medium @artist inspirational quotes motivational quotes in hindi quotes on life love
famous artist Raphael painting - La vellata oil colour medium @artist inspirational quotes motivational quotes in hindi quotes on life love
read moreKuldeep Dahiya "मरजाणा दीप"
#TuneWithTone Nîkîtã Guptā Anshu writer Sarika Tyagi Sudha Tripathi अब्र The Imperfect
read moreSudha Betageri
White जळून गेले सारे स्वप्नांचे महाल, पण अजून थोडी राख बाकी आहे..... रूह तर कधीच निघून गेली, पण अजून कफनात गुंतलेलं सामान बाकी आहे.... दिसतो शांत, शीतल असा मी, पण अजून माझ्यातलं वादळ बाकी आहे.. डोळ्यात भरला आहे मोठा समुद्र, पण अजून तहान बाकी आहे... भले तू सोडून गेलीस साथ माझी, पण अजून माझ्यातला देवदास बाकी आहे... ©Sudha Betageri #sudha