Nojoto: Largest Storytelling Platform

Best Sudha Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best Sudha Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutchiranjeevi affair with sudha, biography of sudha murthy in hindi, quotes by sudha murthy, pati ko kaise sudhare in hindi, about sudha chandran in hindi 260,

  • 21 Followers
  • 262 Stories

Sudha Betageri

#Sudha

read more
White **दृष्टी**

"हे देवा, थोडीशी जरी मज अंधुक दृष्टी दिली असतीस......

सुंदर तुझ्या या सृष्टीचे सौंदर्य मीही निहारले असते,
रानावनात उमलेल्या फुलांना मीही परखले असते, 
उंच उंच डोंगराच्या रांगांना, आकाशात उंच भरारी 
मारणाऱ्या पाखरांना मीही पाहिले असते....
थोडा सा जरी मज अंधुक प्रकाश दिला असतास.....

विशाल अशा या सागराचे, झुळझुळ वाहणाऱ्या 
नदीचे सौंदर्य मीही पापण्यात सामावले असते
धो धो पडणाऱ्या पावसात टप टप पडणाऱ्या
 गारांना मीही वेचले असते
इंद्रधनुच्या रंगात थोडी तरी मीही रंगले असते ,
थोडासा जरी मज अंधुक प्रकाश दिला असतास... 

हे देवा, थोडीशी जरी मज  अंधुक दृष्टी दिली असतीस....."

************************
सौ. सुधा सुधीर बेटगेरी
(बागलकोट)

©Sudha  Betageri #sudha

Sudha Betageri

#Sudha

read more
***वसुंधरा***

अनेक तुझे उपकार, वसुंधरे, अनेक तुझे उपकार
ही प्रकृती, हा जल, वायू, मृदा,
सारी तुझीच देण, वसुंधरे, सारी तुझीच देण.
उंच पर्वत, खोल दरी,झुळझुळ पाणी, मंद हवा,
घनघोर अरण्य, हिरवीगार राने,
दिसतेस किती छान, वसुंधरे, दिसतेस किती छान!
सूर्योदय-सूर्यास्ताचा हा लपंडाव,
चांदण्यांची शीतल जरतार,पक्षांचा किलबिलाट,
फुलांचा गंध दरवळतो तुझ्याच भोवती,
वाह तुझे रूप, वसुंधरे, वाह तुझे रूप!
पिकांमध्ये श्वास तुझा,फुलांमध्ये गंध तुझा,
फुलपाखरांवर रंग तुझा,पशुपक्ष्यांनाआधार तुझा,
वाह तुझे वरदान, वसुंधरे,वाह तुझे वरदान!
तुझ्यामुळेच  ऋतुचक्रांचा खेळ,
साऱ्या सजीवांची तू जीवननाळ,
तुझ्यामुळेच जीवनाचे घड्याळ,
तुझ्यामुळेच स्वप्नांचे आभाळ,
तुझ्यामुळेच प्रेमाची मोहक माळ.
अनेक तुझे उपकार, वसुंधरे,
अनेक तुझे उपकार!
**************************
सौ. सुधा सुधीर बेटगेरी (बागलकोट)

©Sudha  Betageri #sudha

Sudha Betageri

#Sudha

read more
White **भूक*** 
इंधन नसतानाही पोटाला आग लावणारी,
झळ नसतानाही चटके देणारी,
शब्द लहान पण व्याप्ती महान,
शब्द दोनच पण गाथा महान,
रोटी, कपडा, मकान या मूलभूत गरजांतही 
तिचेच अग्रस्थान.
कोण आहे ती?
तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई......

नुकत्याच जन्मलेल्या तान्ह्या बाळापासून
मृत्यूस आलिंगन देण्यास सज्ज झालेल्या 
वयोवृद्धांपर्यंत, सर्वांनानिकट असणारी.
गरीबांच्या वस्तीत तिच्यामुळेच मारामारी,
भिक्षुकांना तिच्यामुळेच पळापळी.
कोण आहे ती?
तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई........

कोणाला अन्नाची,तर कोणाला पैशाची,
कोणाला खुर्चीची,तर कोणाला कीर्तीची,
कोणाला सत्तेची,तर कोणाला विद्येची.
सारे तिच्याच मागे!कोण आहे ती?
तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई.......

तिच्यामुळेच माणूस कधी बनतो,तर कधी बिघडतो.
कधी लढतो, तर कधी लढवतो.
कधी झुंज देतो, तर कधी झुरतो.
कोण आहे ती?
तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई.......

©Sudha  Betageri #sudha

Sudha Betageri

#Sudha

read more
🎊🎊 दिवाळी 🎊🎊

आली दिवाळी ,आली दिवाळी 

रुचकर फराळांची, आली दिवाळी 

कुरुकुर चकली ,खुदकन हसली 

गोल गोल लाडू ,खाली नका पाडू
 
खमंग चिवडा, खावा तरी तो तेवढा 

करंजी हसली अन् तेलात फसली 

गोड गोड शंकरपाळी ,ओळीत थांबली

आली दिवाळी , आली दिवाळी 

रुचकर फराळांची , आली दिवाळी

©Sudha  Betageri #sudha

Sudha Betageri

#Sudha

read more
White 
||कोजागिरी पौर्णिमा||

***रात्री नभावरचा हा
राजस दिवा,
सर्व चांदण्यांनाही तो
हवा हवा.... 
आज शरद ऋतूत,
निखरले त्याचे रूप निराळे,
पाहुनी झाले, सारे त्याचे दिवाने...
शुभ्र दुधात मिसळला
त्याचा हा मंद प्रकाश,
चंद्रकोरीचे सौंदर्य जणू
जीवनी मिळाले....***

©Sudha  Betageri #sudha

Sudha Betageri

#Sudha

read more
White 




।।मौत।।
मौत कितनी खूबसूरत है और हम  
ज़िंदगी के लिए तरसते रहे।  

सुख चैन नींद छीन ली ज़िंदगी ने,  
पर आज चैन की नींद सो रहे हैं।  

समय की पाबंदी लगा दी थी ज़िंदगी ने,  
पर आज समय पर पाबंदी लगा दी मौत ने।  

तरसते रहे हमेशा किसी के साथ के लिए,  
पर आज पूरा काफिला साथ लेकर चल रहे हैं।  

किसी ने हाथ ना थामा उम्र भर हमारा,  
पर आज कंधा देकर चल रहे हैं।  

आंख दिखाकर बात करने वाले  
आज आंखें नम कर याद कर रहे हैं।  

सच में, मौत कितनी खूबसूरत है,  
और हम ज़िंदगी के लिए तरसते रहे।

©Sudha  Betageri #sudha

Sudha Betageri

#Sudha

read more
TEACHER'S DAY 
----------------------- 
अक्षरांच्या वनातून, सुंदर सुंदर शब्दरूपी
 फुलांना वेचून वाक्य रूपी माळ बनवण्याची
 शिकवणूक देणारे वंदनीय गुरु........     
खडूची धारेधार तलवार आणि काळीकुट्ट 
फळ्यांची ढाल धरून अज्ञानरूपी  अंध:काराशी 
अविरत लढा देणारे वंदनीय गुरु......... 
ज्ञानाचे पंख लावून, आशा आकांक्षा रुपी 
आगसात उंच भरारी मारण्यास,  प्रोत्साहित
 करणारे वंदनीय गुरु........
बिघडलेल्या  मुलांचा काठीने इलाज करून, 
शिक्षणरूपी औषधाचा लेप लावणारे, 
समाज सुधारक वंदनीय गुरु........  
विद्यार्थ्यांच्या बुद्धी संवेदनाला जागृत करून, 
सशक्त सुंदर समाज निर्मितीचे 
मार्गदर्शक वंदनीय गुरु........
 ज्ञानरूपी अमूल्य संपत्ती प्रदान  करणाऱ्या 
या गुरूंना कोटी कोटी प्रणाम....

©Sudha  Betageri #sudha

Sudha Betageri

#Sudha

read more
आज आहे चंद्राची पूर्ण चकोर 
पाऊस आहे घनघोर 
वनात नाचत आहेत सारे मोर 
 सगळीकडे रक्षाबंधनाचा एकच शोर 
जरा जोर, जरा जोर......
 हाती आहे माझ्या रेशमाचे डोर
 हे सहोदरा,
 पुढे कर तुझा कर 
बांधते ही पवित्र रक्षा डोर
 जरा जोर, जरा जोर.......
राखी आहे ही अनमोल
 बहीण भावाचे प्रेम हे अबोल
 नको पैशाने तू तोल 
रक्षेचे वचन तू बोल 
जरा जोर, जरा जोर.......

Happy Raksha Bandhan

©Sudha  Betageri #sudha

Sudha Betageri

#Sudha

read more

Sudha Betageri

#Sudha

read more
निर्भया
कानूनावर विश्वास नाही असे नाही परंतु प्रक्रियेवर विश्वास नाही. या कालावधीमध्ये आरोपी जर आरोप साबित न झाल्यामुळे बाहेर जर फिरत राहिला तर तो निर्भीड बनेल व अजून अशा कितीतरी अत्याचार करण्यास तो मुक्त राहील. पोलिसांचे काय? FIR दाखल करण्यासाठी त्या मुलीच्या परिजनांना या पोलीस स्टेशन पासून त्या पोलीस स्टेशन पर्यंत चकरा घालाव्या लागतात. क्राईम झाल्यानंतर पोलीसांची गाडी शव पडताळण्यासाठी येते, यावर तत्काळ ॲक्शन होत नाही का पोलिसांना त्याचे  गांभीर्यच वाटत नाही? प्रशासन! सगळ्यात मोठी जबाबदारी तर प्रशासनाची आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार खुर्चीसाठी ओढाताण करणारा हा वर्ग, ज्यांना खुर्ची दिसते पण जळत असलेला तो देह, क्रंदन करत असणारी ती माता, दिगभ्रमित झालेला तो पिता, घामाघूम झालेला तिचा भाऊ, कासावीस झालेली तिची बहीण दिसत नाही का ?खुर्ची सांभाळणाऱ्यांना माझे काही प्रश्न आहेत, जर तिथे तुमची आई, बहीण मुलगी असली तर तुमची काय प्रक्रिया असती ?का तेव्हाही तुम्ही ॲक्शन घेण्यास एवढाच delay केला असता?? आज प्रतिपक्षा वरही माझे सवाल आहेत , परिस्थितीवरील उपायांवर चर्चा करण्या ऐवजी आढळित रूढ पक्षावर कसे आरोप करावे याची चर्चा जास्त केली जाते. का समाज स्वार्थी बनला आहे? जिथे तिथे मीडियापासून सर्वजण परिस्थितीचा फायदा घेऊन, आपला फायदा कसा करावा या विचारात आहेत. परंतु परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यावर चर्चा कुणाचीच नाही. इथे फक्त प्रशासन , कानून
 न्यायव्यवस्था, पोलीस एवढेच जबाबदार नाहीत ,तर समाजही तेवढाच जबाबदार आहे. का आज हा पुरुषप्रधान समाज आपल्या पत्नीला ती रिस्पेक्ट देत नाही ज्याची ती हकदार आहे, तिला आपल्या साऱ्या खुशीला आशा -आकांक्षाला मारून जगावे लागते?  घरातील ही पुरुषांची वागणूक कुठेतरी नकळत आपल्या मुलांना चुकीचे शिकवणूक देऊन जाते. आज समाजातील प्रत्येक कुटुंबातील आई-वडिलांना त्यांच्या मुलांमध्ये ही जाणीव करणे आवश्यक आहे की स्त्रियांचा सन्मान करावा. घरामध्येही तेच समानतेचे वातावरण असावे. मंदिरात जाऊन लक्ष्मी सरस्वतीची पूजा जरूर करा परंतु त्या आधी घरातील लक्ष्मीची आराधना करा. आज ऍडव्हर्टाईसमेंट ,मीडिया मूवी, सगळ्यांवर ही माझे प्रश्न आहेत स्त्रीला फक्त सौंदर्यासाठी प्रतिबिंबित करू नका, तिचे टॅलेंट, तिची प्रतिभा तिची साधना, याचा प्रचार- प्रसार जास्त करण्यावर फोकस ठेवा. आज कानून, समाज, सगळ्यातही बदल होण्याची आवश्यकता आहे तरच मग समाजात दुसरी कुठलीही मुलगी  निर्भया बनणार नाही.........

Sudha betageri  (बागलकोट)

©Sudha  Betageri #sudha
loader
Home
Explore
Events
Notification
Profile