Nojoto: Largest Storytelling Platform

New savitribai phule marathi poem Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about savitribai phule marathi poem from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, savitribai phule marathi poem.

    LatestPopularVideo

Anagha Ukaskar

White माझ्या लेखणीत जादू असे सर्व सांगतात.
प्रश्न पडतो मला 'असे ते काय बरे पाहतात?'
तुम्हा आम्हा सर्वांचेच अनुभव सारखेच असतात. 
आणि या जगात कित्येक लेखक त्यांना गुंफतात. 
मग मी वेगळे असे नेमके काय लिहीत असेन ?
ज्यामुळे माझ्या कविता तुम्हाला आपल्याशा वाटतात?
बोलायची हिंमत नाही पण डायऱ्या माझ्या भरतात. 
विस्मरणीय असे क्षण कवितारुपी त्या साठवतात. 
त्यामुळे संवादाची मुळीच मला सवय नसली तरी
स्तुती, प्रशंसा या मला खरंच खूप आनंद देतात. 
पण कौतुकाचा जेव्हा मला देतील सारे हात 
तेव्हाही भिती असेल माझ्या मनात. 
या साऱ्यासाठी मी पात्र आहे का?
असे विचार सारखे येतंच राहतात. 
तरीही फक्त मनापासून लिहीत राहायचं 
कारण चांगल्या गोष्टींना दाद आवर्जून मिळतात.

©Anagha Ukaskar #Road #marathi #MarathiKavita #poem

Devanand Jadhav

श्रद्धा आणि विश्वास असला की, 
न मागता देवाला तुमच्या मनातलं कळतं! तसेच कर्म स्वच्छ आणि 
सुंदर असलं की, न मागताच सर्व 
काही मनासारखं मिळतं!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

आयुष्यातील अडचणी आपल्याला 
त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची 
जाणीव करून देण्यासाठी येतात!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

Person's Hands Sun Love सकाळ म्हणजे, नवीन क्षणांची 
सुरुवात! जे घडुन गेले आहे, 
ते विसरुन येणाऱ्या नवीन क्षणांचे 
स्वागत करणे! आणि आपल्या 
आयुष्याला आणखी सुंदर बनवणे!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

वाणी, वागणूक आणि विचार 
हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे 
उत्पादन आहे. आपण जितका 
उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च 
किंमत मिळेल!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

वेळ आणि खेळ यांचं काहीच भाकित सांगता येत नाही. म्हणून वेळेच्या बाबतीत जागरूकता आणि खेळाच्या बाबतीत खिलाडूवृत्ती बाळगली, तर मनाला जास्त धक्का लागत नाही!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

टीका करणारी व्यक्ती एखाद्या 
सज्जन माणसाला, बदनाम करू शकते. पण, स्वतःला मात्र सज्जन बनवू शकत नाही. तेव्हा जीवनाच्या तत्वांवर आनंदी रहा, तत्वनिष्ठ रहा!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

मातीचे मड़के, आणि मैत्रीची 
किंमत; फक्त बनवणाऱ्यानांच 
माहिती असते. तोडणाऱ्यांना नाही!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

"जीवनातील प्रवासात आपले 
बोट कोणी धरलंय; हे महत्वाचे. 
जर तो कृष्ण असेल तर, आपण 
अर्जुन! आणि शकुनी असेल तर, 
आपण दुर्योधन हे निश्चित!"

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

आपल्या आयुष्यात कोण येणार, 
हे वेळ ठरवते. आयुष्यात कोण 
यायला पाहिजे, हे मन ठरवते. पण आयुष्यभर कोण टिकून राहणार? 
हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral
loader
Home
Explore
Events
Notification
Profile