Find the Latest Status about हले हा नंदा घरी पाळणा lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हले हा नंदा घरी पाळणा lyrics.
Ganesh Shinde
गोकुळी आजी आनंद झाला, नंदाच्या घरी बाळ जन्मला, काय सांगू त्याच्या बाळ लीला ग, जो बाळा जो जो रे जो ।।धृ।। नंदाचा हा नंदलाला, काळा सावळा, नाजूक नि भोळा, म्हणुनी आवडे गोप-गोपाळा, जो बाळा जो जो रे जो ।।१।। देवकीपोटी अवतार झाला, कंसाला चुकवून गोकुळी आला, उसळलेला पूर शांत हो केला, जो बाळा जो जो रे जो ।।२।। मातेस मुखी विश्व दाविले, कालियास याने सहज हरवले, गोवर्धनही करांगुळी उचलीला, जो बाळा जो जो रे जो ।।३।। पांडवांचा हा स्वामी झाला, कंसाचा याने वध हो केला, मथुरेत याचा आनंद झाला, जो बाळा जो जो रे जो ।।४।। सारे गोकुळ याने भुलविले, ब्रह्मांडी एक कृष्णरुप दाविले, आमच्या ठायी ठायी मुराला, जो बाळा जो जो रे जो ।।५।। अवर्णनीय हा बारसा सोहळा, बाळ गणेश आनंदित झाला, कृष्ण चरणी माथा टेकीला, जो बाळा जो जो रे जो ।।६।। #कृष्ण #पाळणा #कृष्णजन्माष्टमी #yq_gns
Durga Deshmukh
गजानन आले घरी* श्रावणात चतुर्थीला गजानन आले घरी विद्या बुद्धीची देवता प्रगटली माझ्या दारी ||१|| देवा गणपती देवा कशी येईना रे कीव पाड पाऊस शिवारी फासावर चढे जीव ||२|| मोठे तुझे लंबोदर सामावल्या चुका किती दाखवुन एक मार्ग पेटतील क्रांती ज्योती ||३|| तुझ्या नावाचा जागर करतात तुझी भक्ती बुद्धी मिळु दे सर्वाना दाखवुन तुझी शक्ती ||४|| दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh गजानन आले घरी