Nojoto: Largest Storytelling Platform

Best vitthalbhakti Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best vitthalbhakti Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutenglish poems filled vit love passion sadness, vit campus life, vitthal status for whatsapp, vit e capsule for face, vitthal quotes in marathi,

  • 3 Followers
  • 7 Stories

शब्दवेडा किशोर

#vitthalbhakti मराठी कविता

read more
पंढरीचा राणा माझा देव तु विठ्ठल....
शब्दवेडा किशोर 
होईन भिकारी मी पंढरीचा वारकरी
वारी चुकू न दे तू हरी
छंद लागला मज त्या श्रीहरी विठ्ठलभक्तीचा 
जन्मोजन्मी दास होईल त्या श्रीहरी विठ्ठलाचा   ||१||
माझ्या विठोबाचा कैसा हा प्रेमभाव
खोट्या भक्तीस नसे तया चरणी वाव
माझ्या विठोबाचे रूप ते खुप साजीरे
तयामुळे लाभती आम्हास सप्तरंग हे आयुष्याचे गोजीरे  ||२||
नाही सोडणार कदापी कधी मी तयाचे चरण
तयाचरणी विरुनी जाता होईल माझ्या जन्माचं सोनं
तयाकृपेमुळेच आहे मजजवळी हे माझ्या श्वासाचं धन
तयाच्या दर्शनमात्रे होतसे मन माझे सदा पावन  ||३||
जन्म दिलासी आम्हा तु आमच्या बा विठ्ठला
तूच आमचा असशी पाठीराखा 
तूच आमचा बंधू सखा गुरु अन् धर्म 
अंतसमयीदेखील तुझ्याच चरणी दे विसावा तु आम्हाला   ||४||

©शब्दवेडा किशोर #vitthalbhakti  मराठी कविता

GANESH EDITZ

*ओढ मनी घेऊन विठ्ठलाच्या भेटीची,* *वाहे चंद्रभागा तशी वारकरी चाले वाट पंढरीची..!* _पांडुरंग भक्तीत तल्लीन होऊन चाललेल्या वारकऱ्यांना, आभाळाकडे आस लावून बसलेल्या बांधवरील शेतकऱ्यांना आणि विठुरायाच्या दर्शनाने सुखाचा सोहळा साजरा करणाऱ्या तमाम जनतेस आषाढी एकादशी निमित्ताने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!_ #vitthal #vitthalrakhumai #vitthalbhakti nojoto❤ Love #nojotonews #ganesh_pakere_editz love❤ #Culture

read more

radheshyam rathod

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile