Nojoto: Largest Storytelling Platform

Best जरी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about जरी कलम की उपाधि, जरी की साड़ी, जरी का अर्थ, विझलो आज जरी मी lyrics, विझलो आज जरी मी,

  • 17 Followers
  • 44 Stories
    PopularLatestVideo

Shubhangi Kolte

संघर्ष

हरले जरी मी शर्यत आता
पावलांनी थांबणे शक्य नाही
छाटले जरी पंख माझे
नाशवंत इतके माझे सामर्थ्य नाही

पेटेन मी इतके सोसूनही
अजूनही अशी आग ज्वलंत नाही
होणार नाही सार्थक जगण्याचे
तोवर देहास माझ्या अंत नाही

मी वाट शोधली सुखाची
दुःखाचे गाऱ्हाणे गाण्यास मला उसंत नाही
मी ध्यास घेतला ध्येयप्राप्तीचा
थांबणे आता मला पसंत नाही

सुटणार नाही कोडे जीवनाचे
इतके दुर्बल माझे ध्यासच नाही
जावे लागेल परतून माघारी
अजूनही असे वादळ सुटलेच नाही

कळणार कशी परिस्थिती मला
जोवर काटे मला बोचणारच नाही
मिळणार कशी उत्तरे
जोवर आयुष्य मी चाळलेच नाही

झाले जरी रक्तबंबाळ
मोडेन मी पण वाकणार नाही
होतील यातना जनांना
असे मी कधी वागणार नाही

सोसेन मी विषण्ण अन्याय
इतके सोशिक माझे हृदयच नाही
भारले कितीही मंत्रमुग्धांनी 
माझ्यावर चालेल अशी कोणती विद्याच नाही

होईल शहानिशा माझ्या अस्तित्वाचा
असे कथानक कधी घडणारच नाही
कळणार तरी कसे तुम्हाला
जोवर मी मन माझे लिहिणारच नाही

                        शुभांगी कोलते #संघर्ष

vish

वेदना मनाच्या शमविण्या कोणताही उपचार नाही
आहे तेच सहन करतो बदलण्याचाही विचार नाही

जे नशीबात घडले आहे ते सर्व जरी जाणतो मी
नशिबाला दोष देण्या अर्थ नाही असे मानतो मी
दिलाच जरी मी दोष नशिबाला या रूसलेल्या 
व्यर्थ कुणास काही मागेन एवढा मी लाचार नाही

आहे जगी या लोकं जे दुःख सहन करती रोज जरी
जगण्याची इच्छा त्यांची तसूभरही न कमी होते तरी
परीस्थितीशी लढण्याचे बळ हवे आता फक्त मला
हव्या थोड्या शुभेच्छा हा माझ्या वेदनेचा प्रचार नाही

असतेच तिची सोबत मला प्रत्येक संकटात माझ्या
कसे हरतील ते लोक साथ असेल अशी सोबत ज्याच्या
नशिबाची एवढीच काय ती कृपा असे माझ्यावर
आयुष्याचा एकही तो  क्षण नसे जिथे तिचा संचार नाही #startonmojoto #firstquote #curious

vishnu thore

एकटीला.... आता तुला जगावे, लागेल एकटीला खोटेच ते हसावे लागेल एकटीला आलोचना कितीही केली जरी जगाने पंखाविना उडावे, लागेल एकटीला

read more
 एकटीला....

     आता तुला जगावे,    लागेल एकटीला
     खोटेच ते हसावे       लागेल एकटीला

    आलोचना कितीही   केली जरी जगाने
    पंखाविना उडावे,     लागेल एकटीला

Archana Jadhav

#Quote

read more
जन्म घेतला जरी,
शब्दांच्या गर्भातून
कोठून येईल बळ
नभात झेपावण्याचे

उडण्याची 
आस जरी तुझी
पंख जकडलेत
प्रश्नाच्या जाळ्यात

©सौ.अर्चना संतोष जाधव
सातारा

Abhilash Apsingekar

#2YearsOfNojoto  कवितेत व्यक्त मी करू काय..
तिचा सोडून दुसरा विचार मनात आलाच नाय!
अरे किती करू तिला मी msg मधून hi
पण साला एक पण reply तिचा आलाच नाय!
किती जरी ठरवलं नाय करायचा तुझा विचार
पण किती अवघड हाय ते माझ्या मनालाच विचार!
आता किती जरी म्हणलं मला ती आवडतच नाय...
पण आतून माझा मन म्हणत
"अरे वेड्या तुझ्या मनात अजून तीच हाय!!! मनात अजून तीच हाय! #poem#कविता #मराठी #मराठीकविता #मानातल्यागोष्टी #प्रेम

Anil Siwach

|| श्री हरि: || सांस्कृतिक कहानियां - 12 ।।श्री हरिः।। 9 - सेवा का प्रभाव 'या खुदा, अब आगे को रास्ता भी नहीं है।' सवार घोड़े से कूद पड़ा। प्यास के मारे कण्ठ सूख रहा था। गौर मुख भी अरुण हो गया था। पसीने की बूदें नहीं थी, प्रवाह था। उसके जरी के रेशमी वस्त्र गीले हो गये थे। ज्येष्ठ की प्रचण्ड दोपहरी में जरी एवं आभूषणों की चमक नेत्रों में चकाचौंध उत्पन्न कर रही थी। वे उष्ण हो गये थे और कष्ट दे रहे थे। भाला उसने पेड़ में टिकाया, तरकश एवं म्यान खोल दी। कवच जलने लगा था और उसे उतार देना आवश्यक हो गया

read more
|| श्री हरि: || सांस्कृतिक कहानियां - 12

।।श्री हरिः।।
9 - सेवा का प्रभाव

'या खुदा, अब आगे को रास्ता भी नहीं है।' सवार घोड़े से कूद पड़ा। प्यास के मारे कण्ठ सूख रहा था। गौर मुख भी अरुण हो गया था। पसीने की बूदें नहीं थी, प्रवाह था। उसके जरी के रेशमी वस्त्र गीले हो गये थे। ज्येष्ठ की प्रचण्ड दोपहरी में जरी एवं आभूषणों की चमक नेत्रों में चकाचौंध उत्पन्न कर रही थी। वे उष्ण हो गये थे और कष्ट दे रहे थे। भाला उसने पेड़ में टिकाया, तरकश एवं म्यान खोल दी। कवच जलने लगा था और उसे उतार देना आवश्यक हो गया

Parivartan Jagzap

बरसावं प्रश्नांनी एक-एक करून…
शिस्थबद्ध विद्यार्थ्यांसारखं एका line मध्ये यावं…
घाई नसावी, गडबड नसावी…
शांत, संथ जरी असले तरी पार 'आर-पार' जाऊन ढवळणारे असावे....
नाहीच जर त्यांची उत्तरे मिळाली तर मग 
पेटावं त्यांनी उत्तरांसाठी…
करावी आंदोलने,
करावी जाळपोळ,
करावे दंगे,
गचांडी धरावी
आणि नाकी नऊ आणावे उत्तरदायी इसमाला…
#त्याने जरी कलम १४४ लागू केला तर मग आता
घोळका करावा...
गर्दीने यावं…
बरसावं आता मुसळधार ढगफुटी प्रमाणे…
नामोहरम करून सोडावं…
एखाद्या वेड्या पिश्या प्रियकाराप्रमाणे पाठलाग करावा…
अन उध्वस्त करावं #त्याला-स्वतःला...
पण हे करताना प्रश्नांनी स्वतःलाच प्रश्न विचारावा
का..??
कश्यासाठी..?
कारण काय..??
अस्तित्व कश्याच..??
आणि बरेच….
कारण प्रश्नांना उत्तरे असतात आणि जर उत्तरेच नसतील ते प्रश्न नसतात...

Sandesh Ganeshkar

करणार म्हणजे करणार

read more
*करणार म्हणजे करणारचं* !

संकटांना बघून डगमळणार नाही
घेतला वसा सहजा सहजी सोडणार नाही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार !

जरी सोडलं आज वाऱ्यावर आम्हास तुम्ही
 बालशिक्षणाचे स्वप्नं ह्रदयातून काढणार नाही आम्ही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच !
 
शिकण्यास नवी प्रेरणा मिळाली ताई तुमच्याकडून 
जगण्यास खरी दिशा मिळाली ताई तुमच्याकडून
 या उर्जेतूनच बालशिक्षणाचे स्वप्न साकार करणार म्हणजे करणारच !

वेड लागले बालशिक्षणाचे ताई आम्हास 
या वेडपणातच उद्या इतिहास घडवू आम्ही
  बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण  करणार म्हणजे करणारच !

करणार म्हणजे करणारच हे ब्रीद वाक्य आमुचे ताई ,
जरी कोलमडलो आज आम्ही, दिलेला शब्द नाही कोलमडनार ताई....

        शेवटी करणार म्हणजे करणारच या वरच ठाम राहू आम्ही 
    शेवटी करणार म्हणजे करणारच ताई.......

*संदेश गणेशकर* 
*ग्राममंगल* करणार म्हणजे करणार

कैलाश बगनावत (राजपुत)

#poem

read more
पाऊस जरी थांबला,
मन गळते आहे अजुन...
वात संपली जरी दिव्याची,
मौन अंधाराचे जळते आहे अजुन...

Shitalnishi

क्षण तुझे अण माझे......

read more
क्षण तुझे अण माझे
सुर्याचा वास्तव होताच  ओढ लागायची तुझ्या आवाजाची
तो आवाज आजही  गुण गुणत असतो कानात माझ्या 
ति सकाळ घालवलेले आठवतात ते
क्षण तुझे अण माझे.......

आज त्या जागी जरी एकटी होती मि
डोळ्या भोवती दिसत होते  घालवलेले ते
क्षण तुझे अण माझे......

आज हात जरी माझा खाली होता
तरी हातात भास तुझा होत होता 
त्यावेळीही आठवतात मला
हातात हात धरून घालवलेले ते
क्षण तुझे अण माझे.......

दिवस जेव्हा मावळतो,रात्रीचा थंडावा जाणवतो 
ति संध्याकाळची वेळ तुझ्या सोबत
आजही आठवतात त्या भेटीत घालवलेले ते
क्षण तुझे अण माझे.........

रात्रीची वेळ आपल्या विरहाची
दुसऱ्या दिवशी ओढ लागायची तुला बघण्याची
तुझ्या विरहानंतर आजही आढवतो मला ते
एकटीने घालवलेले माझ्या एकटीचे क्षण.

ते कढीच नसणार 
क्षण तुझे अण माझे.....

   शितल बगेनाईक. क्षण तुझे अण माझे......
loader
Home
Explore
Events
Notification
Profile