Nojoto: Largest Storytelling Platform

Best नसते Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नसते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about नसते घरी तू जेव्हा, रंगच नसते तर, आरसे नसते तर, प्रेमाला जात नसते, चहाला वेळ नसते पण,

  • 13 Followers
  • 37 Stories

Shubhangi Kolte

जीवन खूप सुंदर असते
ते सुंदरतेनी जगायचं असते
वाईट गोष्टींना दुर सारून
सुखाची वाट शोधायची असते

जीवन खूप सुंदर असते
अपयशानी खचायचं नसते
सु:खदुख:च्या वाटेवर चालून
यशाची वाट शोधायची असते

जीवन खूप सुंदर असते
पावलोपावली जग बदलणारं असते
भाग्यावर‌ अवलंबून न राहता
भविष्याची वाट शोधायची असते

जीवन खूप सुंदर असते
ते एका न सुटणार्या गणिताचं कोडं असते
त्याला एका रितीने सोडवून
आनंदाची वाट शोधायची असते

जीवन खूप सुंदर असते
अपमानानं कधी हरायचं नसते
जिद्दीने बळ वाढवून
जगण्याची वाट शोधायची असते
                                  - $hubh@ngi #जिवन

Rutuja Ghume

सैन्यात भरती होताना ;
काळजी नसते जीवाची. 
शत्रूचा वार झेलताना ;
तैयारी ठाम असते मनाची. 

सीमेवर लढताना ;
आठवन नसते घराची. 
एकच ध्येय मनी असावे. 
भारतभूमी हीच कुटुंब आपुले.. 

नागरिक हाच आनंद... 
हेच ब्रीद ठरते सैनिक जीवनाचे #happyindependentday #tributeindianarmy's #follow #comments #likes #support

Yogesh Ambawale

#अश्रुंचे_मोल#दुःख#अश्रू अश्रुंचे मोल त्यांना कधीच समजत नसते, ज्यांच्या हृदयात प्रेमाची, आपुलकीची भावना नसते. अनमोल असतात ते अश्रू जे उगाच वाहत नसतात, खूप वेदना असतात त्याच्यात जेव्हा ते कुणाच्या तरी आठवणीत वाहत असतात . ज्यांचे मन कुणाच्या तरी आठवणीत रडत असते, त्यांनाच खरे अश्रुंचे मोल माहीत असते. #poem

read more
अश्रुंचे मोल त्यांना कधीच समजत नसते,
ज्यांच्या हृदयात प्रेमाची, आपुलकीची भावना नसते.
अनमोल असतात ते अश्रू जे उगाच वाहत नसतात,
खूप वेदना असतात त्याच्यात जेव्हा ते कुणाच्या तरी आठवणीत वाहत असतात .
ज्यांचे मन कुणाच्या तरी आठवणीत रडत असते,
त्यांनाच खरे अश्रुंचे मोल माहीत असते. #अश्रुंचे_मोल#दुःख#अश्रू
अश्रुंचे मोल त्यांना कधीच समजत नसते,
ज्यांच्या हृदयात प्रेमाची, आपुलकीची भावना नसते.
अनमोल असतात ते अश्रू जे उगाच वाहत नसतात,
खूप वेदना असतात त्याच्यात जेव्हा ते कुणाच्या तरी आठवणीत वाहत असतात .
ज्यांचे मन कुणाच्या तरी आठवणीत रडत असते,
त्यांनाच खरे अश्रुंचे मोल माहीत असते.

Nishant Tendolkar

read more
संदर्भ

मी लिहलेले काही 
मागेच राहून गेलेत एका वळणावर..
राहुन गेलेत? छे मी ठेवून आलोय 
मागे त्यांना तुझ्यासाठी.. 
तु कदाचित ओळखणार नाहीस 
म्हणून मीच देउन आलोय 
त्यांना काही ओळखीच्या चाहुली
तुझ्या पावलांच्या...

तु चौकटीतुन बाहेर नाही येणार 
मला ठाऊक आहे... 
पण राहू देत त्यांना ही तुझ्या आशेवर...
त्यांना तसे सांगितले नसते तर 
ते थांबले नसते तिथे.... वाट पाहत...

हलके वाटते आता...
निश्चिंत एकटे चालताना ...
हवे तिथे थांबताना ...
हवे तसे झोपताना...
आता वाऱ्याला त्रास नाही 
तुझ्या घायाळ सुगंधाचा..
आणि रातीला ही छंद नाही...
तुझ्यासाठी नटण्याचा...

कधी निघालीस चौकटीतून बाहेर
तर अलगद वाटेत वेचुन घे.
त्या वळणावरचे अर्थ 
आणि ते विस्कटलेले संदर्भ....

कवी : निशांत तेंडोलकर...

Shweta Khode

#OpenPoetry

read more
#OpenPoetry स्वप्न 
कोणाचे तरी स्वप्न त्यांना ध्येयाकडे देत असतात 
तर कोणाचे तरी ध्येय त्यांना स्वप्नाकडे घेऊन जातात
असेच काहीजण असतात की ते स्वप्न बघत असतात 
कुणीतरी आपल्या स्वप्नासाठी नेहमीच धडपडत असतं 
ते लोकांच्या दृष्टीने नेहमीच पडत असत
पण तेच लोक स्वप्न गाठतात 
जे पडता पडता च घडत असतात 
असेच काहीजण असतात ते स्वप्न बघत असतात 
कोणाचेतरी स्वप्न खूप छान असते ते बघायला काहींना मनाई नसते 
वाटत नसतं असे होऊ शकेल 
पण बघायला मात्र हरकत नसते असेच स्वप्न जे प्रत्येकजण बघत असतात 
ते फक्त बघायचे नसतात तर गाठायचेही असतात
कारण ते स्वप्न आपण पाहिलेले स्वप्न असतात.......
shweta khode

Alka Kulkarni

read more
तू नसता माझी मी नसते... 

पहिला दुर्मिळ रोमांचित क्षण, आठवताना स्वप्नी येतो
किती हवा तू मला सख्या रे, डोळे मिटताना तू दिसतो

चांदवा नभी प्रीतफुला की, कोणती तुला उपमा द्यावी
तूच सुवासिक मोहक अत्तर  , दरवळताना उरात भिनतो

आवडतो आपण ज्याला रे, कायम त्याचे व्हावे आपण
मनी मानसी भास अभासी, जाणवताना खरेच असतो

जमले नाही मला कधी हे , तुझ्याविना मन रमवू कोठे
भेटीसाठी दोघे आतुर, काहुरताना व्याकुळ होतो

काय बोचते काळजास ह्या,  उदासीनता का येते ही
अडकत गेले तुझ्यात हे मन, सोडवताना गुंता होतो

इतकी तुझ्यात हरवत गेले, मलाच मी सापडते कोठे
तू नसता माझी मी नसते, तू असताना दोघे असतो

🍁 अलका 🍁

Sainath Bhojane

sai #विचार

read more
किती बरे झाले असते ,
जर नशिबात कोण आहे हे आधीच कळले असते .
त्यालाच जीव लावून त्याचे कायमचे
होता आले असते .
उगाचच जे सोडून गेले ते आपल्या नशिबात
नव्हते .
असा दोष देऊन आपल्या वाट्याला ते दुख आले
नसते .
किती बरे झाले असते .
जर असे सहजासहजी कोणाचे होता आले असते .
त्याच्या प्रेमात दंग होऊन जगाला विसरून
गेले असते .
उगाचच कोणीतरी आपले कधीच होणार
नाही ,
असे दोष मग समोरच्याला देता आले नसते
. sai

Sagar Khatate

#Quote

read more
"सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही,
     शपथेची गरज नसते.
          नदीला वाहण्यासाठी कुठल्याही,
    रस्त्याची गरज नसते.
      जे आपल्या हिंमतीच्या,
       जोरावर जीवन जगतात.
           त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी,
        कुठल्याही रथाची गरज नसते

Sagar Khatate

#Music

read more
सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही,
शपथेची गरज नसते.
 नदीला वाहण्यासाठी कुठल्याही
     रस्त्याची गरज नसते...*
  जे आपल्या हिंमतीच्या,
    जोरावर जीवन जगतात.
   त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी
 कुठल्याही रथाची गरज नसते"

Vishal

read more
​चप्पल चोरीला जाते म्हणून मंदिरात जाणे टाळायचे नसते,​
​आणी..​
​Reply भेटत नाय म्हणून massage करने सोडायचे नसते..​😉
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
🍃 ​नात्यांच्या बागेत एक नाते कडुलिंबाचे पण लावा​..🍃

 ​जे अनुभव भले कडवे देईल​,
​पण अडचणीत तेच उपयोगी येईल​.🍃

​🍃🌺 शुभ राञी 🌺🍃​
loader
Home
Explore
Events
Notification
Profile