Nojoto: Largest Storytelling Platform

Best तीचीशक्ती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तीचीशक्ती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आजपासुन नवरात्र सुरु होत आहे. नवरात्रेचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणानां समस्त वायक्यु टिम कडुन नवरात्र या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे 'ती' ची शक्ती... देवी म्हणजेच स्त्री, अनेक रुपे आहेत तिची. #नारी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तीचीशक्ती

read more
"ती" म्हणजे स्त्री
स्त्री जिचे एक ना अनेक रूप,कित्येक रुपात ती दिसते ,सर्वत्र आपले अस्तित्व दाखविते.
ह्या नवरात्री निमित्त आपण नऊ दिवस देवींची मनोभावे पूजा करणार ,नवरात्री संपली की पुन्हा आहे तसेच वागणार ह्याला काहीच अर्थ नाही.
देवी म्हणजे काय हो तर देवी म्हणजे स्त्री,जीला आपण लक्ष्मी बोलतो जेव्हा ती आपल्या घरी जन्म घेते,सरस्वती ही बोलतो जेव्हा ती आपल्याशी बोलू लागते,
हल्ली "स्त्री" ची कदर करायची त्या स्त्री ला मान द्यायचा म्हटलं की नेमकेच काही दिवस असतात,जसे आई साठी "मातृदिन",बहिणीची "रक्षाबंधन" किंवा मुलींसाठी "कन्यादिन" ह्या अशा काही दिवसांसाठी त्यांना मान सन्मान देतात आणि बाकीचे दिवस पुन्हा एक साधारण बाई,मुलगी म्हणून पाहिले जाते.
स्त्री चा आदर करायचा म्हणजे कुठलाही एक दिवस मर्यादित न ठेवता प्रत्येक दिवशी त्यांचा आदर करावा,आपल्याला जन्म देणारी सुद्धा एक स्त्रीच आहे जिला आपण "आई" बोलतो,आपल्या चुका लपवून आपले लाड पुरवणारी आपली "बहीण" सुद्धा एक स्त्रीच आहे तसेच आपल्या जन्मदात्यांना सोडून अनोळखी व्यक्तींसोबत पूर्ण आयुष्य घालवायला आपलं घर सोडते,ती आपली "अर्धांगिनी" सुद्धा एक स्त्रीच आहे,ह्या अर्धांगिनी मुळेच आपल्याला मुलांच्या/मुलींच्या रुपात एक नवीन विश्व प्राप्त होते.
म्हणून ह्या "ती" चा/स्त्री चा रोजच आदर करावा त्यांना रोज मान द्यावा तेव्हा कुठे नवरात्री ची पूजा सार्थक होईल. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों 
आजपासुन नवरात्र सुरु होत आहे.
नवरात्रेचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना.
सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणानां समस्त वायक्यु टिम कडुन नवरात्र या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
'ती' ची शक्ती...
देवी म्हणजेच स्त्री,
अनेक रुपे आहेत तिची.

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आजपासुन नवरात्र सुरु होत आहे. नवरात्रेचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणानां समस्त वायक्यु टिम कडुन नवरात्र या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे 'ती' ची शक्ती... देवी म्हणजेच स्त्री, अनेक रुपे आहेत तिची. #नारी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तीचीशक्ती

read more
घरातील घरपण जपणारी शांत स्वभावाची गृहिणी ती,
तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवुन लढणारी वाघीण ही तीच.
कठीण परिस्थितीत पतीला सांभाळणारी अर्धांगिनी ही ती,
तर लेकरांची काळजी घेणारी माऊली ही तीच.
भावाच्या चुका पाठीशी घालणारी बहीण ही ती,
तर कुठलेही स्वार्थ न ठेवता मैत्री जपणारी सखी ही तीच. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों 
आजपासुन नवरात्र सुरु होत आहे.
नवरात्रेचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना.
सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणानां समस्त वायक्यु टिम कडुन नवरात्र या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
'ती' ची शक्ती...
देवी म्हणजेच स्त्री,
अनेक रुपे आहेत तिची.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile