Nojoto: Largest Storytelling Platform

Best त्याच्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best त्याच्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutत्याच्या का, मराठी प्रेम कविता त्याच्यासाठी, त्याच्यावर विश्वास ठेवा, आणि त्याच्या, ऐकायला कमी येते त्याच्यावर उपाय,

  • 25 Followers
  • 26 Stories

Pranil Pawar

my new creation

read more
काल त्याच्या मिठीत 
चंद्र शांत निजला होता ..
प्रेमाच्या रिमझिम सरित 
तो चिंब भिजला होता ...

अलगत सैल होणारी मिठी 
पुन्हा घट्ट होत होती ..
काल त्याच्या रातराणीला 
नवी पालवी येत होती ...

अडखळनारा श्वास 
हळुवार एक होत होता ..
ती त्याची होत होती 
तो तिचा होत होता ....
-:प्राण :- my new creation

राज श्री

read more
अळूवावरचं पाणी 
क्षणभर  त्याची जिंदगानी
किती लोभस रूप त्याचे
दिसतो जणू मोत्याचा मणी
त्याला न कसली नाती
कूणी न त्याच्या अवतिभोवति
पान हेच त्याचे विश्व 
देठाचा असे  त्याला आधार
स्वतः मध्येच  रमतो
आनंदाने नाचत बागडतो.
त्याला न भिती कशाची
मरण जरी त्याच्या  सामोरी
झुळूक येता वा - याची
विलिन होतो  मातीशी
मला  हि वाटतं व्हावं 
अळूवावरचं पाणी 
क्षणभंगूर का होईना 
पण मनसोक्त  जगावं.

Pallavi Phadnis

read more
त्याने करांची ओंजळ उघडली
नी माझी धरतीशी नाळ जुळली
एका शाश्वत हातातून एका
मायेच्या हाती दोरी आली
पण तो तर ,कायम सोबत होता
कधी दिसत नव्हता पण अस्तित्व
मात्र दाखवत होता, त्याच्या नावाची
आंदोलने,त्यावर माझी स्पंदने
माझी चालणारी पाऊले,त्यावर
त्याच्याच नजरेचे असतात इमले
तो असला की एक आधार असतो
मग दुःखाचा डोंगर हि पार होतो
त्याचा माझ्यातील अंतर म्हणता
म्हणता तो तर अंतरातच राहतो
त्याच्या माझ्यातील संबंध हा तर
माझा अनेक जन्मीचा आहे बंध
त्याच्याकडे जाण्यासाठी अनेक 
वाटा आहेत ,वेळा आहेत पण
तो म्हणतो ,तुझे नी माझे संपेल
अंतर ज्यावेळी तू सोडशील हा 
देह नश्वर,तो माझा नी मी त्याची
हाच तर माझ्या अंतरीचा ईश्वर
   
            पल्लवी फडणीस,भोर✍

अश्लेष माडे (प्रीत कवी )

छान लिखाण आहे खूप

read more
बा प मा णू स ! 🔥
-माझं युद्ध न मला कधी जिंकायचंय न मला कधी हारायचंय! मला फक्त न फक्त ते लढायचंयं असा स्वतःशी निर्धार करत.. विचार, लेखणी, वक्तृत्व, कला अन् बाहू सोबतं बुद्धीचं सामर्थ्य. अश्या प्रकारची हत्यारं आपल्या सोबत घेऊन स्वतःला सामाजिक चळवळीसाठी झोकून देण्याचा विडा उचलणारा एक दिपस्तंभ अश्र्लेष माडे...🙌❤️
-सोशल मीडियाच्या दुनियेत नशिबानं मिळालेलं एक असामान्य व्यक्तिमत्व :  म्हणजेच बापमाणूस! होय बापमाणूसचं कारण त्याच्या लिखाणाची धार अन् त्याच्या वैखरीतुन निघणाऱ्या शब्दांची आग जर याची देही अन् याची डोळा तुम्हाला जाणवली. जर तुम्हांला त्या शब्दांचा साक्षात्कार झाला तर तुम्ही सुद्धा त्याला बापमाणूसचं म्हणाल ह्यात काही वाद नाही!💯
-माउलीभक्त म्हणा! शिवभक्त म्हणा! मावळा म्हणा ! व्याख्याता म्हणा प्रत्येक क्षेत्रांत आपला अभ्यास, आपल्या जवळील ज्ञान, आपले अनुभव आपलं कौशल्य पणाला लावून आमच्या सारख्या रसिकांना, श्रोत्यांना, वाचकांना कसं भरभरून देता येईल यासाठी जन्माला आलेली काही माणसं असतात त्यापैकीचं हा एक!🙌 -ह्या एका वैचारिक वादळी पर्वाची सुरुवातचं जर अशी झाली आहे तर इथून पुढं उभ्या आयुष्यात असंख्य जाणत्या तरुणाईच्या अन् इतिहासाच्या काळजावर तुझा प्रत्येक शब्द न् शब्द कोरला जाईल यात तिळमात्र शंकां नाही! "आमच्यासारख्या भरकटलेल्या तरुणाईला जागेवर आणण्यासाठी तुझ्यासारख्या सशक्त विचारांची अन् कृतीची  गरज आहे त्यामुळे तुझ्यासारख्या असामान्य व्यक्तिमत्वाला दीर्घायुष्य लाभावं हिच  प्रार्थना! - अश्या असंख्य तरुणाईच्या प्रेरणास्थानाला, विचारांच्या दिपस्तंभाला, बंधुतुल्य व्यक्तिमत्वाला 
तुझ्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हिच मनापासून सदिच्छा! 
नुसताप्रेम❤
मी✍🏻ऐश्वर्या छान लिखाण आहे खूप

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile