Nojoto: Largest Storytelling Platform

Best भयाचा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भयाचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

somnath gawade

#भयाचा गोरखधंदा

read more

       
भयाचा गोरखधंदा 

    भयाचा गोरखधंदा येथे जोमात आहे.
मृत्यूच्या भयाने प्रत्येकजण ग्रासलेला आहे.
दुसऱ्याच्या दुःखात स्वतः चा फायदा शोधणाऱ्या
अतृप्त आत्म्याचा चौफेर नंगा नाच सुरू आहे.

मरणयातनांचा प्रवास मरणा नंतर ही  सुरूच आहे.
कुणी आप्तांसाठी वेळेत उपचार मिळावा म्हणून
गळे काढत आहे; तर कोणी स्वार्थ पाहून इतरांचे
गळे कापण्यात धन्यता मानत आहे.

सुपातले आज जात्यात नाही म्हणून खुष आहेत.
जात्यातले भरडले जाऊन मदतीसाठी आर्त हाक देत आहे.
मदतीसाठी सरसावलेले हात अहोरात्र झटत आहे.
'माणुसकी शिल्लक आहे' याची साक्ष देत आहेत.

लोक जड अंतकरणाने आप्तांना भावपूर्ण निरोप देत आहे.
चहुबाजूंनी दुःखाचे ढग निराशा घेऊन येत आहे.
अशा कठीण प्रसंगात स्वतःला सावरलं पाहिजे.
सोबत्यांना धीर देऊन कठीण प्रसंगाला सामोरं गेलं पाहिजे.





 #भयाचा गोरखधंदा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile