Nojoto: Largest Storytelling Platform

Best मनातील_वादळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मनातील_वादळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

#माझ्या मनातले कळत नाही....
हा आजकालचा पाऊस सायंकाळ शिवाय पडत नाही
तिच्या मनातले बहुतेक कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही......
दुपारच्या उन्हात सावली कालवून बनवावे वाटते सुगंधी स्वप्नं
अशात ती माझ्या सोबत असताना तिने रहावे मिठीत मग्न
कोरत रहावी मी धुंदीची कविता स्पर्शाच्या बोरूने
तिच्या मुलयम त्या हातावर अन् पावसाच्या चाहुलीने
तिने ओठ टेकवावे माझ्या ओठांवर
पण नेमकाच साला हा पाऊस मिठी असताना कोसळत नाही
तिच्या मनातले कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही......
पेरणी बिरणी ठीक आहे राव पण जोडप्यांचाही विचार करावा त्याने
दोनच रोपटी असली जरी रानात तरीही थोडं का होईना झिरपावं त्याने
पाऊस पडायला लागला रे लागला की ती माझ्यात वितळायला लागते
अन् तिच्या देहाची कस्तुरीसुद्धा हवेत छान दरवळायला लागते
पण बरोबर अशाच वेळी हा पाऊस माझी प्रार्थना ऐकत नाही
तिच्या मनातले कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही......
चिखल होतो पाणी साचते तिच्या पायातले पैंजण वाजते
पावसात भिजताना पदर उडतो मग ती कसली सॉलिड लाजते 
तिच्यावरला सारा पाऊस मला अंगावर घ्यायचा असतो
म्हणून भेटल्यावर रोज दुपारी पावसाला मी ये रे पावसा म्हणतो
पण या पावसाला नेमक्या वेळी माझी तगमग दिसत नाही
तिच्या मनातले कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही......
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #मनातील_वादळ

pooja d

आजकाल खूप एकटेपणा जाणवतोय रे,
भरल्या गर्दीतही एकट असल्याचं भासतंय रे......

जीवनात एक पोकळी निर्माण झालीय
ती भरून निघणार कशी, याचाच विचार करतीय......

तुला दिसत नाही का रे माझं एकट असणं
तुला ऐकायला येत नाही का शब्द झालेले मुके......

अस वाटतंय तुझ्या सोबत घडाघडा बोलावं
पण, तुझ्या माझ्यातली खोल दरी मध्ये येते
अन, सगळं मनातच ठेवावं वाटत.......
 #एकटेपणा #मनातील_वादळ #मनातील_भावना

pooja d

मनात खूप काही....
मनात खूप काही साचलय,
सांगू कुणाला,
मनातलं सारं
बोलू कुणाला.......

थकले मी आता
समजून घेणार का
कुणी मला,......
उभारी घेण्यासाठी
बळ मिळेल का मला.....

दिवस रात्र रडत असते
कुढत बसते मी
नाही हिम्मत होत
सांगायला कुणाला......

मन भांभवल्या सारख
झालंय,
त्यावर निराशेचा काळोख
दाटतोय,,
विनाकारण भीती
वाटल्यासारखं होत मला.......

स्त्री म्हणून नाहीतर 
एक मैत्रीण म्हणून 
कुणी समजून घेईल का मला.......
मनात खूप काही आहे
हे सांगू मी कुणाला.....

         #मनातील_भावना #मनातील_वादळ #सांगू #भावनास्थिरनसतात


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile