Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझ्यासाठीमन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझ्यासाठीमन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी मन माझे झुरते... #तुझ्यासाठीमन हा विषय ना. सा. यांचा आहे चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्यासाठी मन माझे झुरते 
सांग कधी तुला कळणार 
आयुष्य माझं सुकलेलं फुल 
सोबती तुझ्या कधी नव्यानं फुलणार ?

तुझ्यासाठी मन माझे मरते 
सांग कधी तु त्यात श्वास फुंकणार
रोजचेच माझे गाऱ्हाणे ऐकून 
सांग तु देव माझा कधी असणार ?

तुझ्यासाठी मन लहान होऊन बागडते 
सांग कधी तु मला प्रेमाचा घास भरवणार
भूक तहानही फक्त तुझ्याच नावाची 
सांग तु खरंच असं प्रेम तुला जमणार ? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यासाठी मन माझे झुरते...

#तुझ्यासाठीमन
हा विषय
ना. सा. यांचा आहे 
चला तर मग लिहूया.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी मन माझे झुरते... तुझ्यासाठी मन । माझे झुरते रे। सदा मरते रे। तुझ्यावरी।। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझ्यासाठीमन

read more
तुझ्यासाठी मन ।
माझे झुरते रे।
सदा मरते रे।
                 तुझ्यावरी।।
तुला ना कदर।
त्याची रे जराशी।
का खेळे मनाशी।
                 खेळ असा।।
खेळ तुझा होते।
जीव माझा जाते।
तूच तू जिंकते।
                   नित्य नेम।।
कर जरा तमा।
माझी ही जराशी
थोडी दे उराशी।
                    जागा मला।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यासाठी मन माझे झुरते...

तुझ्यासाठी मन ।
माझे झुरते रे।
सदा मरते रे।
                 तुझ्यावरी।।

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी मन माझे झुरते... #तुझ्यासाठीमन हा विषय ना. सा. यांचा आहे चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

कसे सांगू तुला 
तुझ्यासाठी मन माझे झुरते
श्वास माझा तू
माझ्यात कुठे मी उरते

तुझ्या प्रेमात सारे
हे भान माझे हरते
तुझ्या आठवणीत 
माझी रात्र रात्र सरते

तूच माझा जीव
तुला काळजात जपते
बावरी मी राधा 
फक्त तुझ्यासाठी जगते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यासाठी मन माझे झुरते...

#तुझ्यासाठीमन
हा विषय
ना. सा. यांचा आहे 
चला तर मग लिहूया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile