Find the Best अष्टक्षरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
vaishali
बीज मी तुझेच आई ऐकना ग माझे , आहे अस्तित्व मी तुझे जन्मा येण्या झाले आहे , मन हे अधीर माझे...!!१!! जन्मा आधीच गर्भात , मला का मारले जाते मीही आहे अंश तुझा , जन्म तुझ्या पोटी घेते...!!२!! घ्यावा मी मोकळा श्वास , असे मनोमनी वाटे माझ्यासाठी का तुझा ग , झरा मायेचा हा आटे...!!३!! घेऊ दे जन्म मलाही , डोळा बघू दे दुनिया असे हा जन्म मुलीचा , देवाचीच ही किमया..!!४!! पाप स्त्री भ्रूण हत्येचे , घेऊ नकोस ग माथी जन्म घेऊन होईल , मीही वंशाची पणती...!!५!! बीज मी तुझेच आई , आता अंकुर मी होते घेऊ दे जन्म मला ग , विनवणी मी करते....!!६!! #अष्टक्षरी #मराठीलेखणी #मराठीकविता
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto