Nojoto: Largest Storytelling Platform

Best केलं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best केलं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकेलं का, मन केलं, त्याने प्रेम केलं किंवा, जिवापाड प्रेम केलं, काऊन बंद केलं,

  • 18 Followers
  • 96 Stories

अश्लेष माडे (प्रीत कवी )

ग्रामविकास बद्दल

read more
*सरपंच कसा असला पाहिजे? 
        1)सर्व प्रथम मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी मी गावकऱ्यांचा आहे. ह्या विचारांचा असला पाहिजे. 
2)ग्रामस्थ आणि सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणारा असला पाहिजे. 
3)नुसता लाईट, पाणी, रस्ते ह्या मोजक्या विषयावर काम करणारा नको तर असे अनेक हजारो विषय असतात गावाच्या विकासासाठी ते सुद्धा केलं पाहिजे. उदा.  शेती, सांडपाणी, पिण्याचे पाणी, शौचालय, अंगणवाडी, शाळा, महिलांचे प्रश्न, वृद्धांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, आजार, अंधश्रद्धा  ह्या विषयावर पण भर दिलं पाहिजे. कारण, हे विषय सुद्धा सरपंचाशी निगडित असतात. म्हणून सरपंच कायम जागृत असला पाहिजे. 
4)गावात येणारे -जाणारे प्रवाशी, विद्यार्थी ह्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. 
5)असे अजून बरेच प्रश्न आहेत जे गावाच्या विकासासाठी हितकर असतात. सरपंचाने 500 दिवस जरी निःस्वार्थ भावनेने काम केलं. तरी गावाचं विकास कुणी थांबवू शकत नाही... आपलाच -अश्लेष माडे. कोहमारा.. ग्रामविकास बद्दल

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
वाटलं होतं तुला तरी कळतील माझ्या भावना 
असं समजून तुझ्यावर प्रेम केलं होतं, 
विसरून सगळे जुने घाव, 
तुझ्यावर विस्वास केलं होतं. 
ती तर होतीच उत्तम खेळाडू ह्या खेळात 
जिने आधीच मला यात खेळवलं होतं, 
तरी नको पुन्हा कोणावर जीव लावायला हवं होतं, 
कारण, हे नव्हतं माहित मला की, 
तुलासुद्धा यात छान खेळता येतं, 
तुला पण कोणाच्या भावनेशी खेळता येतं, 
प्रेमात कुणाला हरवून तुला जिंकता येतं, 
पण प्रेम हे खरंच खेळ नव्हे ह, 
एकदा तू पण हरशील तेव्हा समजेल तुला, 
की, खरं प्रेम काय असतं.. (प्रीत )

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
कुणी जर तुमच्याशी रोज बोलत असेल. तुम्हाला त्याच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट हक्काने सांगत असेल. आणि अचानक त्यांनी तुमच्याशी बोलणं बंद केलं, तुम्हाला मॅसेज करणं बंद केलं असेल. तर, नक्कीच तुमचं काहीतरी चुकलं असेल. एकतर तुम्ही त्या व्यक्तीच्या बोलण्यावर दुर्लक्ष करत आहात, किंवा त्या व्यक्तीशी फक्त कामापुरते बोलता, तो तुमच्याशी वेळात वेळ काढून बोलतो मात्र तुम्ही त्याला वेळ नाही म्हणून टाळत आहात असं काहीतरी वाटत असते. खरं आहे एखादा व्यक्ती तुम्हाला महत्व देतो. तुमच्यावर प्रेम करतो. पण असं झाल्यावर त्या व्यक्तीला खूप दुःख होतो. त्याला खजील झाल्यासारखं वाटतं. आणि पुढे त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नको म्हणून न बोलणं च योग्य समजते. कारण तुमच्याविषयी असलेलं आदर कमी कमी होत जाते. आणि आहे ते नातं न बोलण्यामुळे तुटण्याची वेळ येते. तेव्हा आहे ते नातं जपायचं प्रयत्न करा.. (प्रीत )

अश्लेष माडे (प्रीत कवी )

तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं

read more
प्रेम सगळ्यांनाच होतं ना 
तसंच मला पण झालं होतं 
सगळेच मनापासून करतात हे माहित नाही 
पण मी अगदी मनापासून आणि 
निःस्वार्थ प्रेम केलं होतं, 

पण कळलंच नाही मला आतापर्यंत 
तिला माझं प्रेम खूप जास्त झालं की, कमी 
कारण, जास्त झालं की, पचत नाही 
आणि कमी पडलं की, 
कुणा दुसऱ्यात मन रमतं, 

पण तीने एकच चुकी केली 
न सांगता एकटं सोडून गेली 
असं सांगितलं असतं तर, 
adjust करून प्रेम केलं असतं 
तिला जसं आणि जेवढं पाहिजे तेवढं, 
एकदा तरी तिने म्हणायला हवं होतं 
पण माझ्या हृदयाशी असं 
खेळायला नको हवं होतं... (प्रीत ) तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
स्वतःच्या जीवावर केलं की, कुणीच बोलणारं नसतं, 
आपण पडलो काय नी उठलो काय? 
मग काही प्रश्न स्वतःलाच विचारायची असतात. आणि उत्तर पण स्वतःच शोधायची असतात.. कारण, मागे पुढे बोलायला कुणीच नसतं. जेव्हा आपण स्वतःच्या मस्तीने एकटेच मार्ग शोधत असतो.. अश्यावेळी आपण हार पत्करली तर आपलं अस्तित्व नष्ट होऊ शकते.. आणि हसणारे तर टपूनच असतात. आपण हरलो हे मान्य केलं की.( प्रीत )

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
तिला नसेल माझ्या प्रेमाची किंमत 
पण मला आहे ना , 
तिला नसेल पडत फरक, मी असल्या -नसल्याचा, 
पण मला पडतो फरक ती नसल्याचा, 
कदाचित तिला नसेल कडत प्रेमाबद्दल, 
पण मला तर कडतं ना, 
तिला नसेल जमत तसं प्रेम करायला, 
पण मला तर जमतं ना,
तिला नसेल झालं माझ्यावर प्रेम, 
पण मला तर तिच्यावर खरं प्रेम झालं ना, 
मग तिने काहीही केलं, 
रागावली, चिडली, दुखावली तरी मी तर प्रेम करणं सोडणार नाही ना..
कारण तिच्याकडून अपेक्षा केलं तर त्या पूर्ण होतीलच असं नाही ना..
ती आहे तशी चालेल मला, पण प्रेम करणं सोडणार तर नाही नं.. (प्रीत )

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile