Find the Best वेळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutएकाच वेळी अर्थ, एकाच वेळी meaning, जेवणाच्या वेळी म्हणायचे श्लोक, ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे, एकाच वेळी दोन पदव्या,
Vinayak Das
गुंतण महत्वाचं.कळतयं पण... 😊 पण आलाचं ना. हो, कळतयं पण भीती वाटते.. नाहकच असेल कदाचित पण आहे. आजच पहिल्यांदा भेटलो आणि गुंतलो.. खुप बोलावं वाटतं अश्या वेळी, पण विषय सुचतं नाहीत. तसे मला सावरायला जुने प्रश्न दिमतीला येऊन उभे होतेच या ही वेळी. 'तिला काय वाटेल?''काही गैरसमज तर नाही ना करुन घेणार ती?''हि पहिलीच भेट खरं तर, ही योग्य वेळ आहे का?' आणि तोच जुना प्रश्न 'खरंच आहे का आपली पात्रता,त्या योग्यतेची?' आणि या सर्वांसोबत एक नवाच प्रश्न आज नव्याने आला, 'तू पुन्हा प्रेमात कसं काय पडू शकतोस, काय ही तुझ्या पहिल्या प्रेमाची प्रतारणा तर नाही ना?' (खरं तर हा प्रश्न निरर्थक, पण तरीही आपलं अस्तित्व सिद्ध करून गेला) प्रश्न, पहिलेही मला निशब्द करायचे आणि आज ही त्यांनी तेच केलं.ती मात्र निर्भिडपणे माझ्याशी संवाद साधत होती. शेवटी आपलंच मन आपली गोची करतं हे मात्र खरं. मी फक्त तिच्या प्रश्नांना उत्तर करत होतो. तिच हसणं न्याहळत होतो, कदाचित ती माझ्या अवघडलेपणावरचं तर हसंत नाहिये ना, असं ही वाटुन गेलं. पण छे हो, इतक नितळ, निरागस हास्य ते, त्यावर इतका कोता संशय घ्यावा.. माझीच मला लाज वाटली. मी निर्धाराने भावनांना सावरून होतो. भीत सुध्दा होतो... काय सांगव, हा बांध कधी तुटेल ही. बराच काळ या सुख वर्षावा भिजत असतांना, वेळ आपलं कार्य साधतचं होती, अविरत वाहण्याचं. खरं तर ज्या वेळी वाटंत असत, वेळ जरा काळ थांबावा तो तेव्हाच इतक्या लवकर निघुन जातो ना.... असो, दोन तासच ते, फक्त तिच सोबत असणंच, मनाला उधाण देणारं होतं... गुतांयच नाही अस मनाशी ठरवलेलं असतांना ही, तिच्यात नकळत गुंतत जाणं, अनोखं होतं, विस्मयातीत करणारं होत, बाकी सगळं विसरायला लावणारं होतं. आज हे सगळं तुला सांगायच ठरवुनच आलो होतो, शेवटी तुच तर हक्काची मैत्रिण आहेस ना माझी... माझ्या प्रिय डायरीस् तुझा 'राही औरंगाबादी' #involvement is needed
#Involvement is needed
read moreMeena
शांत वेळी, एकांत क्षणी लहरी मनात असते , काहुर मनी मन होते सागर, विचार लहरी येते स्पर्शून गगण लाटेवर लाट होऊन आरूढ,करी शब्दांचे मंथन मन सुन्न ते खोलात जाऊन पाय रूजवले मन भरून येते ,काय मिळवले, काय गमावले कळू न शकले द्विधा मनस्थितीत ह्रदयाला छेडले आपल्याच तंद्रीत का ते राहिले सूर्या सम अश्रू चमकू लागले अस्ता प्रमाने हळूहळू खाली ओघळू लागले ह्रदयाला शब्दांच्या लाटा, किनारा देत होता लाटांचा आवाज तो आवाज दाबत होता पूर्ण असूनही लाटा विना अपूर्ण होते जखम ही अंतरींची लाटेत वाहून देत होते आंधळ्या अ़धांरातही चंद्राची साथ होती चंद्र हा माझा एकांत अनुभव होता तो माझ्याशी जुळवून घेत होता अशांत वेळी शांत तो करत होता.. मिनाक्षी..
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited