Find the Best एकालग्नाचीगोष्ट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sujata Darekar
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? दुःखाला परतवून लावणारा जादूचा दिवा की शितलतेशिवाय काही स्पर्शू न देणारी विजार कसं असतं हे सुख? मिळतं का कुठे बाजारी हो, आवडेल मला घ्यायला घेऊन जाईन घरी जपेन अगदीच मनाच्या कोप-या कोप-यातून लळा लावेन त्यासही माझा, बिलगेन तो मला करकचून बांधून घेऊ मी त्याला अन् तो मला असता सुख चिकटलेले येईल का दुःख दारी? अरेरे! हा वेडा काय म्हणतोय असं होणे नाही का तरी? मी म्हणते अशक्य असे काही नाही लावू ना शोध याचाही विज्ञानाची घेऊन कास! म्हणतोय कसा, ए वेडे, विज्ञान युगात राहूनही सुखाचा शोध अशक्य, एवढं साधं कळत नाही काय उपयोग तुझ्या त्या कपाटभर पुस्तकांचा? मी बुचकड्यात पडले, असले होणे शक्य नाही पुस्तकांनीच तर शिकविलं अशक्य काही नाही चाळेन आणखी पुस्तकं, शोधून काढेन व्याख्या काय आश्चर्य! सापडलं की मला जे हवं होतं ते फालतूच वेळ घालवला शोधण्यात मी इतरत्र ते पुस्तकच सांगतो आहे, सुख नांदे तुझ्या अंतरी शिरतेच आता अंतराच्या अगदीच खोल डोहात चाचपतेय पाप-पुण्याचा लेखा, सुखाच्या मोहात कळलंय, सुकर्माची मधुरता हीच सुखाची नांदी लेखकानों💕 सुप्रभात. मला सांगा,सुख म्हणजे नक्की काय असतं? प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकामधील गाण्याच्या या ओळी. या ओळींवरून तुम्हाला काय सुचतंय? एक सुंदर कविता,चारोळी किंवा दोन ओळी? तुमची सुखाची व्याख्या आम्हाला सांगा. #सुखम्हणजे हे टँग करायला विसरु नका.
लेखकानों💕 सुप्रभात. मला सांगा,सुख म्हणजे नक्की काय असतं? प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकामधील गाण्याच्या या ओळी. या ओळींवरून तुम्हाला काय सुचतंय? एक सुंदर कविता,चारोळी किंवा दोन ओळी? तुमची सुखाची व्याख्या आम्हाला सांगा. #सुखम्हणजे हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #एकालग्नाचीगोष्ट
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited