Nojoto: Largest Storytelling Platform

Best शापीत_हे_मन_माझं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शापीत_हे_मन_माझं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 3 Stories

शब्दवेडा किशोर

#एक एकाकी एकांत....
जेव्हा एकटेपण सोबतीला असतं
तेव्हा कुणाचाच आसरा
आपल्याला नसतो..
एक स्वतःचा चेहरा सोडला
तर इथं हरेक
चेहरा हसरा
दिसतो....
एकटेपणासोबत माणूस एकांताच्या
दुनियेत जाऊन
बसतो..
आजूबाजूला कितीही गर्दी असली
तरी मग माणसाला
काहीच फरक
पडत नसतो....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #शापीत_हे_मन_माझं

शब्दवेडा किशोर

#शापीत जगणे माझे....
आहे एक सुंदर परी माझ्या स्वप्नात बसलेली
समोर नाहि पण नेहमीच माझ्या हृदयात असलेली
तिच्या आठवणीत नेहमी मन झुरते माझे
बोलणे झाले नाहीतर मनच लागत नाही कुठे
अशी कशी मनात घर करून तु गेलीस 
हृदयात न विसरणारी सुखद जखम तु केलीस 
तुझाविन जगणे अधरे वाटे तुझ्या साथीनं
आयुष्यात माझ्या सुखसागर हा दाटे
झुळूक लाजरी येते अन्
स्वप्न मनीचे अलगद वेलीवर झुलते 
सांज सावली येते अन् उगीच उराची धडपड होते
देण्या चाहूल साजणीस आज भाव हृदयी हा दाटे
येशील का परतुन तू सांग एकदा
तुजविन सये सखे मज
शापीत जगणे माझे हे अधरे वाटे
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #शापीत_हे_मन_माझं 
#शापीत_आयुष्य

शब्दवेडा किशोर

#माणसांच्या गर्दीत हरवलेलं माझं मन....
मन हरवलंय माझं ह्या माणसांच्या गर्दीत
तुडुंब भरलंय अन् रितं देखील होईना पावसाच्या सरीत
भ्यायला लागलंय फारच पडणाऱ्या प्रश्नांच्या सर्व कोड्यांना
नकोतंच कुठल्या भावना म्हणतंय रामरगाड्याला
तोडावेसे वाटतात पाश अन् व्हावेसे वाटते मोकळे
पण मग येतात बंधने अन् पुन्हा मातीमोल होते सगळे
सतत होणाऱ्या चिखलफेकीत मन मात्र बावरलंय
कुणास म्हणावे अपुले हे आजवर कधी ना उमगलंय 
सहजच असे काही घडतंच नाही सगळंच क्लिष्ट भरकटलंय
सारं हे ठरवलेलं कोण जाणे आहे कुणाचं
अन् आयुष्याला कुणाची लागली दृष्ट
हरवलंय मन माझं अबोल झालंय फार
नात्यांच्या गुंत्यात गुंतत जातंय सतत
सापडेना त्यास कुठलीच किनार..
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #शापीत_हे_मन_माझं


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile