Nojoto: Largest Storytelling Platform

Best माणूस_चुकतो_कधीकधी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माणूस_चुकतो_कधीकधी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

शब्दवेडा किशोर

#माणूस चुकतो कधीकधी..
आयुष्याच्या समुद्रातून वाट शोधताना अन् त्यातून उचंबळणारी
प्रत्येक लाट मोजताना
नाती जोडताना अन् प्रसंगी ती तोडताना सुध्दा
दोष नसतो द्यायचा कुणाला
कारण
माणुस चुकतो कधीकधी....
अळवावर पडलेला थेंब अलगत टिपताना
जाणुन बुजून गमतीने गट्टी फू म्हणताना आपल्याच हृदयाची स्पंदने
आपल्याच नकळत वाढतात तेव्हा दोष नसतो त्यात मनाचा
ना त्या स्पंदनांचा
कारण
माणूस चुकतो कधीकधी....
दोष फक्त भावनांचा ज्या येतात समुद्राच्या लाटांसारख्या
अन् मागे उरवुन ठेवतात
फक्त आठवणी वाळुवरच्या ठश्यांसारख्या
पाण्यात प्रेमानी हात फिरावताना लहरी उठतात अन्
हरवून बसतो आपण त्या क्षणिक लहरी शोधताना
मन किती हळवं होतं कधी कधी व
तयार होतं एखाद्यासाठी आयुष्यभर थांबायला
तर कधीकधी पापणी लवेपर्यंतही
दम निघत नाही ह्याच मनाला
हेच मन कधी रमतं वाळुवरच्या रेघात
तर कधी हरवून जातं त्याच रेघाःच्या पुसटशा विश्वात
तेव्हा दोष नसतो द्यायचा कुणाला
कारण
माणूस चुकतो कधीकधी
नशीबाच्या रेघा
घडवताना....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माणूस_म्हणून_जगताना 
#माणूस_चुकतो_कधीकधी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile