Nojoto: Largest Storytelling Platform

Best मनाला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मनाला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about पडली माझ्या मनाला, पडली हरीची माझ्या मनाला, संपत्ती सोहळा नावडे मनाला lyrics, कारभारी आनंद झाला मनाला, विचारों कुणाला मनाला मनाला,

  • 27 Followers
  • 141 Stories
    PopularLatestVideo

Savidhan Kamble

Savinam😘 #मनाला

read more
ती म्हणते, तू संविधान अभिमान सर्वांचा
तर मी प्रस्तावना तुझ्या पूर्ण जीवनाची

ती म्हणते, मी प्रकाशमय पुनम ची रात्र
तू मन मोहून टाकणारे किरण चंद्राचे

ती म्हणते, तुझं मन पाण्यासारखं स्वच्छ,
तुझ्या मनात दिसे मला माझे प्रतिबिंब...

अगं वेडे हे मन तुझंच आहे,
पण ह्या मनाला ओढ लागलीये तुझ्या मिलनाची
ह्याला हवाय तुझा स्पर्श, तुझा सहवास
#मनाला,
बघायचीये, तुझ्या शुभ्र डोळ्यात लखलखणारी माझी प्रतिमा,
बघायचंय, हवेसोबत खेळणारे तुझे लाल केस
आणि खेळायचं तुझ्या लालकाळ्या केसांच्या कोमल छायेत,
दूर एकांतात हातात हात घेऊन
आपल्या आठवणींचे तरंग, तुझ्या तोंडांतून माझ्या कानापर्यंत येणारे शब्द आणि तुझा हवाहवासा गोड आवाज,
आणि मिठी मारून करायचेत ते वचनं
 कि 
येणारी प्रत्येक सकाळ तुझीमाझी असेल आणि असणार.....!!

#Savinam😘 #Savinam😘

SD writes

गच्च दाटलेलं हे आभाळ 
आणि तुझ्या त्या आठवणी
दोन्ही एकत्रच कसे येतात
मनाला कातर करून जातात..

रिमझिम पावसासारख्या अशाच त्या
माझ्या मनावर बरसत राहतात
आठवणी का येत राहतात
मनाला या भिजवून जातात...

तुला कसं कळणार सर्व 
पावासात भिजालाच नाही कधी
कशा जपशील सांग मनी
पावसातल्या या माझ्या आठवणी...

शब्दस्नेह ✍🏻 #मराठी #आठवण #प्रेम

दिपक किरणबाई दत्तात्रय बैसाणे

read more
ठेच आज मनाला लागली आहे 
तो सूर्यही मला पाहता जळतं आहे 
आयुष्याच्या नेमक्या कठीण वळणार 
आज तू ही असा लांब लांब जात आहे 

मनाचा टाहो तुझ्या खोल पाण्यात फोडत आहे 
तो सूर्यही मला माझ्या आसवांना सुखवत आहे 
दुःखाच्या या कठीण परिस्थितीत 
आज ते पाणी ही लांब लांब जात आहे 

आयुष्याच्या ह्या खोल समुद्रात मी वाहत आहे 
तो सूर्यही माझ्या स्वप्नांना पाण्यात जाळत आहे 
साथ अशी अर्ध्यावर सोडत 
आज ते स्वप्नं ही माझ्या सोबत पाण्यात वाहत आहे 

एकांतात तुला पाहता मी बुध्द आठवत आहे
मनाला शांत करत मी तुलाच त्यात पाहत आहे 
मेहनतीच्या कठीण काळात 
आज तो आधारही लांब लांब जात आहे 
उद्याच स्वप्नं या गडूळ पाण्यात वाहत आहे
              - दिपक बैसाणे....!

@maval_katta

आज स्वतःशीच काहीतरी बोलत होतो, कदाचित मनाला माझ्या समजावत होतो.. सोडून गेलीस तू तरी का तुझी आठवण होते नाही येणार तू माहीत असूनही #poem

read more
आज स्वतःशीच काहीतरी
बोलत होतो,
कदाचित मनाला माझ्या
समजावत होतो..

सोडून गेलीस तू तरी
का तुझी आठवण होते
नाही येणार तू माहीत असूनही
का मी तुझी वाट पाहतो..

आज स्वतःशीच काहीतरी 
बोलत होतो,
या वेड्या मनाला थोडंस
समजावत होतो.. आज स्वतःशीच काहीतरी
बोलत होतो,
कदाचित मनाला माझ्या
समजावत होतो..

सोडून गेलीस तू तरी
का तुझी आठवण होते
नाही येणार तू माहीत असूनही

TuShAr PaChOrKaR

read more
मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो गुंतलेल्या

मनाला आवरायला
आणी तुटलेल्या मनाला सावरायला..

काव्य मुसाफिर दिनेश

read more
लालसा 

माझिये मनाला । लागली लालसा । 
नीच अवदसा । छळतसे ॥ १॥

अजाण बालक । काल होतो जेंव्हा  । 
मनी नसे हेवा  । कुणाप्रती ॥ २॥

नसे मुखी माझ्या । कधीच कुवाचा  । 
कामना सर्वांच्या  । शुभ होत्या॥ ३॥

वय हे वाढले  । वाढली मनिषा । 
अवगत भाषा । स्वार्थासाठी ॥ ४॥

डावपेच सारे  । कट कारस्थाने । 
शिकलो नेमाने । तरबेज ॥ ५॥

आप्तजणं सारे  । लुटत सुटलो । 
कधी मी लुटलो । कळले ना ॥ ६॥

घट्ट चिटकली । मनाला लालसा । 
सोडवू मी कसा । सांगा मला ॥७॥


दिनेश अ .कांबळे 
औरंगाबाद

Pratiksha Sanap

Reality 🙏 🙏

read more
घे रे शपथ रक्षाबंधन ची .....

तोडू नकोस तु कोवळ्या कळ्या ना 
मारू नकोस तु कोवळया स्वप्नांना खुप आहेत़ रे स्वप्न आमची 
पण मदत द्या तुमची ....

तुज्या बावळट मनाला बाजूला सार रे 
आणि एका बहिण भावाचे नाते जोड रे 
तुज्या मनाला एकदा तरी समजावं रे 
तुज्या संवेदनशील ता एकदा तरी जगावं रे ......

तूच आहेस रे आमचा पाठी राखा 
तूच आहेस रे आमचा रक्षण कर्ता 
जागव तुज्यतील विचार व 
विचार तुज्या मनाला प्रश्न .....

तुज्यतही आहे अनेक गुण 
पण बाजूला सार दुर्गुण 
विचार कर एकदा या बण्धण चा 
हे बंधन आहे रे बहीण भावाच्या रक्षेचे ....

कर असेच रे रक्षण आमचे 
तरच साजरे होईल रक्षाबंधन तुमचे 
मग घे तर शपथ रक्षाबंधन ची 
की रक्षा करशील आमच्या सगळ्यांची ....

 कितीही धैर्य एकट्वुण भीती येते रे मनात 
आम्ही का घेतला जन्म या जगात मीच आहे रे ती मातृ भूमि साठी लढ्णरि ti
मीच आहे रे ती हुंदके देऊन रड्णरि ती ...

विचार कर रे आम्ही कोठे कोठे लपनर 
एकदा तरी घरा बाहेर पडावे च लागणार 
तुज्या या कलण्कित मनाला एकदाच लपव
चांगल्या मनाला आयुष्य साठी बाहेर काढ ......

तु असेल तर भाऊ कर आमचे रक्षण 
मगच घे बांधून पवित्र रखीचे बंधन ....

                
           प्रतीक्षा सानप . Reality 🙏 🙏

akash tayde

love #OpenPoetry

read more
#OpenPoetry मनाला वाटेल ते करा 
पन मनाला लागेल अस कहीं करू नका😘😘 love

Deelip{दि'स्पंदन}

#OpenPoetry Meena Tasleem बरेलवी vishnu thore Govind Dubey pariniti@..... #मराठी_कविता #marathikavi #poem #येना

read more
#OpenPoetry 
       #येना परतून 
हो माझ प्रेम होत तुझ्यावर,
खरच खूप प्रेम होत तुझ्यावर.
सांग ना का गेलीस अशी अर्धावर सोडून, 
भातुकलीच्या खेळावाणी डाव असा मोडून. 
जगतोय गं मी तुझ्या आठवणी घेऊन, 
कदाचित तुझ्या आठवणीत रमून. 
न कळत तु जीवनात आलीस बावर होत मन माझ,
वेड्या माझ्या मनाला पिस् करून गेलीस. 
सुरूच आहेत प्रयत्न जाण्यासाठी तुझ्या आठवणीतुन दुर,
नको वाटते आता मनाला तुझी हुरहुर. 
ठाऊक होत मला करतात प्रेम सर्व, 
का कुणास ठाऊक मलाच का होता माझ्या  प्रेमावर गर्व.
विसरलोच तेव्हा रूतू येत जात राहतात, 
मिसळलेले मन वेगळे करून जातात. #OpenPoetry  Meena  Tasleem बरेलवी vishnu thore Govind Dubey pariniti@..... #मराठी_कविता #marathikavi

दिपक किरणबाई दत्तात्रय बैसाणे

read more
ठेच आज मनाला लागली आहे 
तो सूर्यही मला पाहता जळतं आहे 
आयुष्याच्या नेमक्या कठीण वळणार 
आज तू ही असा लांब लांब जात आहे 

मनाचा टाहो तुझ्या खोल पाण्यात फोडत आहे 
तो सूर्यही मला माझ्या आसवांना सुखवत आहे 
दुःखाच्या या कठीण परिस्थितीत 
आज ते पाणी ही लांब लांब जात आहे 

आयुष्याच्या ह्या खोल समुद्रात मी वाहत आहे 
तो सूर्यही माझ्या स्वप्नांना पाण्यात जाळत आहे 
साथ अशी अर्ध्यावर सोडत 
आज ते स्वप्नं ही माझ्या सोबत पाण्यात वाहत आहे 

एकांतात तुला पाहता मी बुध्द आठवत आहे
मनाला शांत करत मी तुलाच त्यात पाहत आहे 
मेहनतीच्या कठीण काळात 
आज तो आधारही लांब लांब जात आहे 
उद्याच स्वप्नं मी य़ा गडूळ पाण्यात शोधत आहे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile