Nojoto: Largest Storytelling Platform

Best बहीण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बहीण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutचुलत बहीण meaning in english, मानलेली बहीण quotes, बहीण भाऊ शायरी, बहीण शायरी, मानलेली बहीण english word,

  • 10 Followers
  • 9 Stories

Asha...#anu

हो! थोडा नाकावर राग आहे...
पण खरंच फार प्रेमळ आहे...
ममतेचा सागर आहे....
होटावर हास्य....
ही तर तिची... शान आहे...
थोडी भोळी..थोडी खोडकर...
थोडी कंजूस..थोडी नटखट...
काॅमेडी क्वीन...सेल्फी क्वीन...
स्टाईलबाज... ड्रामेबाज...
माझी सखी खासमखास...
कधी अश्रु पुसते..
कधी अश्रु बनते...
खंबीर पाठीशी सदैव असते...
आजवर जिची होती चिंता...
आज चिंतेचे माझ्या चिंतन करते...
खरंच! आशा नाही कोणाची...
बहीण आहे सखी माझी...
आहे माझी सोनपरी ...
धावत येते...
माझ्या प्रत्येक सुख-दुःखा च्या वेळी...

©Asha...#anu #बहीण 
#जन्मदिवस 
#nojotowriters

suresh pawar

#बहीण

read more
टॉम अँड जेरी
(प्रिय बहिणीस समर्पित)

मीच हुशार तू ढगोळी
मी साजूक तूप तू पुरणाची पोळी
दप्तर तुझं पण पाठीवर माझ्या
चल म्हणतेस लवकर गाढवा माझ्या

सांडलीस ना भाजी थांब आईलाच सांगते
हाथा पाया पडतो मग ती उगाच भाव खाते
ती टपली मारायची रोज पण रडायला जमायचं नाही
माझ्या साध्या खोडीनेही तिचा भोंगा कधी थांबायचं नाही

एका पानाला २ चॉकलेट असा भाव ती ठरवायची
पण काहीच न घेता बिचारी निबंध लिहून द्यायची
क्लास,धुनी भांडी अन त्यात अभ्यास सारं मी पाहायचो
त्या पूर्णत्वाकडून मी अपूर्ण असलेला 'धैर्य' शिकायचो

अगदी बाप आजारी असताना तिनं सोसलेलं आठवतं
माझ्या शिक्षणापायी तिनं माघार घेतलेलंही आठवतं
हळू हळू संसार नावाच्या जीवनात तू सुखाने नांदतेस
आपल्या गोड कडू अनुभवाच्या गाठोड्यातही तू असतेस

जगात सुंदर नातं आपलं जसं बिस्कीट अन खारी
होय मी आहे टॉम आणि बहीण माझी जेरी
रचनाकार,
सुरेश गोविंद पवार #बहीण

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile