Nojoto: Largest Storytelling Platform

Best पावसाची Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पावसाची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about पावसाची कविता, पावसाची गाणी हिंदी, पावसाची गाणी lyrics, पावसाची माहिती सांगा, पावसाची सुरुवात,

  • 7 Followers
  • 9 Stories
    PopularLatestVideo

Manisha Dongre Kulkarni

      #पावसाची सर
#भावना 
#manimau
#manishadongrekulkarni #yqtaai

Prasaad Shendage

mute video

Prasaad Shendage

mute video

Yogesh Hiwrale

कवितेचं नाव:#गारपीट 2014

read more
"नको देवा मला ही पावसाची सरं...
येता पावसाची सर माझी होई तारांबळ
घरावर छप्पर असून नसलेले आहे
घरामंदी पाणी साचून भांडे घराबाहेर  वाहे
एगळाच हाय देवा तुझा न्यावं 
आरं जित्या परी मेल्या धडाला ज्यादा भाव
आता व्हत नही, सहीनं सोसू कुठवरं
नको देवा मला ही पावसाची सरं...

या या पावसानं पोरीचं लगीन मोडलं
मह्या सर्जा राजाला बजारात धाडलं
आरं  'गारा' नही त्वा अंगार बरशिवली
व्वा रं तुही किमया पाण्यानं चिंता पेटवली
लोकाह्यचं सोड, तूच नही आमच्या भल्यावरं
नको देवा मला ही पावसाची सर...

मागचाच दुसकाळ फिटता, फिटना
आन, 'गारपीटीनं' आणला तेरावा महीना
आम्हा शेतकऱ्यांवरच नजर तुही तिरकी
चुकून माकून एखादा सावकार ही धर की
डोंगर 'खडा' वाटतो ह्यांच्या कर्जा म्होरं
नको देवा मला ही पावसाची सरं...

भाकरीतला शेतकरी दिसतो का कोणाला
पण शेतकऱ्याची भाकर दिसती देवाला
शेतकरी म्हणून जलमलो हाच  माझा गुन्हा
साकडं घालतो तुला, जलमा घालू नको पुन्हा
आमच्या मारणाचं उगा खापर फुटल तुझ्यावरं
नको देवा मला ही पावसाची सरं"... कवितेचं नाव:#गारपीट #2014

Kailas Tidke

#OpenPoetry पुन्हा एकदा पावसाची सर तुझी आठवण देऊन जाईल..
कुणीच कुणाचं नसता
हे सत्य शिकवून जाईल..
®कैलास #पावसाची सर

Kailas Tidke

#OpenPoetry पुन्हा एकदा पावसाची सर तुझी आठवण घेऊन येईल..
कुणीच कुणाचं नसत 
हे सत्य शिकवून जाईल..
®कैलास #पावसाची सर

कवी अनिकेत मशिदकर

// सर पावसाची //

read more
// सर पावसाची //

ओल्या पावसाची सर
देह चिंब ओलावून गेली
विसरावे कसे प्रेमाला तुझ्या
प्रितीची‌ आठवण करून गेली...// // सर पावसाची //

Rahul Mohite

read more
आजच्या पावसाची
गोष्टच वेगळी होती
कडक चहाला 
कांदाभजीची सोबत होती

उनाड वारा नुसताच
वाहत होता
आभाळ आपल्या 
जमिनीकडे ओल्या डोळ्यांनी
पाहत होता 

त्या दोघांची प्रेमकहाणी 
थोडी आगळी होती
आजच्या पावसाची गोष्टच 
वेगळी होती

समोरच एखादी वीज 
कडकडत होती
ढगांसोबत जणू ती बडबडत होती

उन्हाळ्याची उष्णता आता 
संपणार सगळी होती
आजच्या पावसाची 
गोष्टच वेगळी होती

आजचा पाऊस 
नुसताच बरसत होता
जमिनीला भेटणयासाठी 
खुप तरसत होता
मातीचा सुगंध चोहीकडे
पसरत होता

मातीच्या त्या सुगंधाची 
चवच वेगळी होती
आजच्या पावसाची 
गोष्टच वेगळी होती
✍🏻राहुल साहेबराव मोहिते 
prince🤴🏻
At. वडनेर तालुका मालेगाव जिल्हा नासिक

Pratik Rani Raju

Aakash... #poem #पावसाची

read more
मी आकाश शेलार पण नावा सारखं माझ्यात काहीच नाही. म्हणजे आकाशात तारे असतात आणि त्यात एक चंद्र देखील दिसतो. असो ताऱ्यांची संख्या ही जास्त असते. पण एखादा चंद्र तरी या आकाशाच्या मिठीत असावा अस वाटतं...

#पावसाची भुरभुर, जीवाची हुरहूर Aakash...


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile