Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझ्याविना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझ्याविना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तुझ्याविना एक क्षण करमेना, तुझ्याविना मर जावा, जगू कसा तुझ्याविना मी राणी ग, जगू कसा तुझ्याविना मी राणी, तुझ्याविना जाऊ शरण कुणा,

  • 7 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

तुझ्या आठवणीत... #yqtaai #आठवण #तुझ्याविना #yqmarathi #मराठीलेखणी #yqmarathiquotes काहीच त्रास नसतो तेव्हा, जेव्हा मी एकटाच चालतो. खूप त्रास होतो मात्र तेव्हा, जेव्हा तुझ्या आठवणीं सोबत चालतो. Pic credit : yogesh ambawale

read more
तुझ्या आठवणीत... तुझ्या आठवणीत...
#yqtaai #आठवण #तुझ्याविना #yqmarathi #मराठीलेखणी #yqmarathiquotes 
काहीच त्रास नसतो तेव्हा,
जेव्हा मी एकटाच चालतो.
खूप त्रास होतो मात्र तेव्हा,
जेव्हा तुझ्या आठवणीं सोबत चालतो.
Pic credit : yogesh ambawale

उमा जोशी

रंग केशरी सांज ल्यायली कातरवेळी
तुझी आठवण येते मजला संध्याकाळी
दिली घेतली कितीक वचने दोघांनीही
कसे संपले सारे काही असे अवेळी

तुटले नाते कसे अचानक कळले नाही
जाता जाता निघून कोणी वळले नाही
कसला रुसवा राग कोणता होता तेव्हा
परंतु ओठी शब्द आपल्या आले नाही

असे जरी हा करार झाला न लिहीलेला
ऐक सांगते प्रसंग मजला आठवलेला
निरोप घेता डोळा पाणी दोघांच्याही
रुतून बसला मनात तो क्षण अवघडलेला

काय असे हे झाले आहे मला कळेना
अडकुन राही मनी हुंदका प्रश्न सुटेना
हाक दे मला सख्या कधीही मनापासुनी
तुझ्याविना रे माझा सखया जीव रमेना

©उमा जोशी १७/०३/२०२१

©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #अनलज्वाला #तुझ्याविना

SUMEET

#एक अश्रू..
#तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
#एक पाऊल..
#तुझ्यासाठीच अडखळणारं,
#तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..तुझी पाऊलखूण शोधणारं..
#एक नजर..प्रत्येकाच्या डोळ्यात..#तुझीच छबी शोधते..
मागे वळून ..पुन्हा पुन्हा..#तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..
#एक मिठी..#तुझ्याचसाठी रिकामी..
#तुझ्याशिवाय मोकळी..
एक जीव..तडफडणारा..
असहाय्य..#तुझ्याविना..
#तुझ्याचसाठी....

SUMEET

Yogesh Ambawale

तुझ्याविना

कसे समजावे मी ह्या मनाला,
तुझ्याविना अजिबात करमत नाही ह्याला.
माझा प्रत्येक श्वास हा तुझ्या आठवणीचाच असतो,
तू जवळ नसताना मात्र जीव गुदमरत असतो.
तूच सांग वातीविना दिवा येतो का कधी कामी,
मग असेच दिवा मी तू वाती,कसा जगू तुझ्याविना मी.
सोबत मला सतत तुझी पाहिजे आहे,
तुझ्याविना एकटे राहणे मला शक्य नाही.
समुद्राचे आणि किनाऱ्याचे जसे नाते असते,
आपले ही तसेच असावे,
जरा जरी दूर झाले तरी लगेच परत जवळ यावे. #तुझ्याविना#प्रेम

Krushnarnav

आज तू नाहीस म्हणून...
मला जाता येत नाही... आपलं घर सोडून...
तू गेलीस तशी...
म्हणजे... माझं मन रमते असं मुळीच नाही...

पण मला थांबायला हवं...
तुला भेटायला च हवं...
कारण तुला सांगायला हवं...
तुझ्याविना किती कठीण होऊन बसलं आहे..
दिवसाचं सरण... रात्रीचं झुरण...

कदाचित... तू तुझी रमली असशील...
देव करो सुखात असशील...
माझी आठवण ही काढत नसशील...
पण सारे दिवस सारखे नसतात...

कधी आठवणींच वादळ येतं...
मनाचं तळ घुसळवून जातं...
तसंच काही तुझ्यासोबत होईल...
कदाचित तुला माझी आठवण येईल...
म्हणून तू मला शोधत येशील ...
पण एखादीच हाक देशील...
माझी साद आली नाही...
तर लगेच माघारी निघून जाशील...

तू  माझी वाट बघत थांबणार नाहीस...
कारण तुला ते कधीच जमणार नाही...
हे असं मात्र व्हायला नको...
अबोलच मरण यायला नको...
म्हणून मला थांबायलाच हवं...
तुझी वाट पाहायलाच हवं...

यात किती काळ जाईल कुणास ठाऊक...
#अबोल_प्रेम
@कृष्णार्णव #तुझ्याविना #अबोल_प्रेम #दुरावा #आठवण

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
1)नव्हती कसलीच भीती मला
आई तू सोबत असताना, 
मृत्यू ला ही हसत कवटाळेन 
तुझा हात हातात असताना.. 

2)पूर्वजन्माचे असेल पुण्य 
तुझ्यासोबत मरण मला झालो मी धन्य 
कोण इथे तुझ्याविना अन्य? 
'आई 'तुझ्याविना जग हे शून्य.. (प्रीत )

अश्लेष माडे प्रीत

Mohan Palve

mute video


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile