Nojoto: Largest Storytelling Platform

Best आहे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आहे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआहे का meaning in english, कुठे आहेस तू in english, जगामध्ये देव आहे का, आहे भरना का अर्थ, तुमच्याकडे आहे का नाही,

  • 418 Followers
  • 1664 Stories

P͢r͢a͢n͢a͢l͢i͢ k͢a͢w͢a͢l͢e͢

#Sad_Status गुड मॉर्निंग

read more
White शुभ सकाळ सर्वांना 🌹 
☕☕☕☕☕☕
नका करू खराब
आयुष्य हे मोलाचे...
होऊनी व्यनाधीन
भागीदार दुःखाचे...

कित्येकांचे उठले घर
लेकर-बाळं रास्त्यावर...
बाबा करीतो व्यसन
व्यसनाधीन झाला आधार ...

#आहे #तुमच्या #हाती
#बळ #मोठे #आमृताचे...
#नका #करू #नासाडी
#आपल्याच #या #देहाची....

नका पिऊ दारू,शिगारेट
मद्यपान हाती नका घेऊ...
सोडून ही वाईट सवय
              चला व्यसन मुक्त होऊ...

ही खुपच आहे वाईट शान
सेवन करणे सोडून देऊ...
चरस,गांजा,शिजारेट,दारू
               चला व्यसन मुक्त होऊ...

#व्यसन #नाही #सुटत #तुमचे
#व्यसन #मुक्ती #केंद्रा #जाऊ...
व्यसनाधीन आहात तुम्ही
               चला व्यसन मुक्त होऊ...

व्यसनाचा सोडूनी आधार
शिक्षण तेथील आपण घेऊ...
होईल या जीवनाचा उदार
                चला व्यसन मुक्त होऊ...

#अनेकांचे #जीवन #आपण
#शापीत #सावलीत #नेऊ...
#प्रत्येकांचा #ध्यास #ठेवा
                      चला व्यसन मुक्त होऊ...

थीम पोस्ट.__.#दारुचेदुष्परिणाम __

👉मित्र हो...हे सर्व काही मी तुम्हाला नविन सांगत नाही .
आपल्या आजुबाजुच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतेच.
          माझे सांगणे एवढेच आहे 
_चैन/_मौज _मजा __करा __पण __कोणत्याही __गोष्टीला __आहारी __जाऊ __नका. 
👉आपल्या परिवाराला आपल्याबरोबर असताना किंवा आपल्या नंतर त्रास होईल असं वागू नका..🙏🙏

©pranali kawale #Sad_Status  गुड मॉर्निंग

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
आपण एखाद्यावर एकतर्फी प्रेम करत असतो, आणि ती व्यक्ती आपल्याकडे सारखी दुर्लक्ष करत असते, तेव्हा आपल्याला फक्त वेदना च मिळत असतात. त्या व्यक्ती व्यतिरिक्त आपल्यावर प्रेम करणारे बरेच असतात. पण, आपण त्या व्यक्ती मुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि स्वतःला वेदनेच्या बाजारात मांडतो. 
म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो, त्याला महत्व देणे केव्हाही उत्तमच, एक तर आपल्याला कुणीतरी प्रेम करणारं भेटतं आणि आपल्या वेदना पण कमी होतात. 
सारखं-सारखं एखाद्याच्या मागे लागून नेहमी अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, आपल्या मागे जि व्यक्ती आहे किंवा आपल्यावर जी व्यक्ती  प्रेम करते, तिच्यावर प्रेम करा. कारण, हे खरं आहे, ज्याला आपण प्रमाणापेक्षा प्रेम देतो त्याला त्या प्रेमाची कदर राहात नाही.. 
प्रीत प्रीत

Sachin Zanje

शेतकरी

read more
जग पोशिंदा..

ठाऊक नाही जगास 
आम्ही काय करतो.
शेतकरी आहे असं म्हटलं कि,
गरीब, लहान वर्गीय,हया नजरेने समाज आम्हास पाहतो.

ज्या शेतात आम्ही राबतो
त्यावर भारत देश माझा जगतो.
सरकारी नोकरीचा नादी न लागता
त्याचा मुलगा देशासाठी ताठ मानेनं सिमेवर लढतो.

अभिमान गर्व करू नका 
तुमच्या नोकरीतील भरमसाठ पैशाचा.
घरच्या जेवणाशिवाय पोट भरत नाही
ते कुठून येते विचार कर त्या अन्नाचा.

कंपनी ,उद्योगांमुळे
झालो आम्ही मालोमाल.
त्याच कंपनीला कच्चा माल तयार करण्यासाठी
किती होतात माहीत आहे आमच हाल.

अशा अनेक लिहायच्या आहेत कथा.
त्यात कळेल माझ्या शेतकरी राजाची व्यथा.

  धन्यवाद कवी - कु सचिन सदाशिव झंजे. शेतकरी

Kishor Rokade

जय शिवराय

read more
महाराष्ट्राचे लचके तोडण्या..
गिधाडे जमाव धरीत आहे!

बहुतेक विसरलेत ...सारे
शिवशंभु विचार अजुनही
जिवंत आहे.!

"जय शिवराय" जय शिवराय

Keshav Suryavanshi

read more
माझे मत-- माझे विचार                                                                                                           मित्रांनो, आपण इंद्रियाद्वारे जे जे शुध्द या अशुध्द स्वरूपात                                                                                                          ग्रहण करतो, ते आपल्या अंतरमनात आत्मसात होते. त्यात                                                                                                          जे शाश्वत आहे ते शाश्वत म्हणून आणि जे मिथ्य आहे ते मिथ्य                                                                                                         म्हणूनच जाणवत. जेव्हा आपली दृष्टी स्वच्छ/ शुध्द नसते ,                                                                                                          तेव्हा जे अशाश्वत / मिथ्या आहे तेच शाश्वत वाटते  आणि                                                                                                           दृष्टी स्वच्छ झाली तर प्रत्येक गोष्टीचे खरे मुल्य उमगू लागते.                                                                                                         तेव्हा जगण्यातल जे जे अशाश्वतहोत ते ते ओसरू लागत                                                                                                                                        ‌आणि निसर्गरूपी शाश्वताकडे आपल्या मनाची ओढ वाढून                                                                                                         आपल्यात परमपूर्ण, अतुलनीय शांती उपजते. अॅड. सूर्यवंशी

Vrishali G

..

read more
Trust me अपार विश्वास आहे माझा 
तुझ्यावर
 तुझाही असाच विश्वास 
असु दे माझ्यावर 
राणी आपल्या प्रीतीच हे 
नाजुक नाते 
भविष्यात फुलणार आहे
याच तर विश्वासावर ❤ ..

Prakash Gore ( Raj )

read more
यारी आहे तर जिंदगी प्यारी आहे....... राज

sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3

हौस

read more
लाज शिवून घॆ सखे पहिला पाऊस आहे...
मी ही माणूस, तो ही खरंच माणूस अाहे..।

विरहाने आज कशी जिवाची लाही- लाही...
आपल्या मिलनाची सर्वांनाच हौस आहे.॥ हौस

Manish Kanade

आता सगळ्यांनाच ठाऊक आहे
महागडा टिव्ही बंद असतो दिवसभर 
सुंदर फर्निचर, नसतं कोणी त्यावर 
सगळे पाहुणे,  स्मार्ट झालेत 
मी नको तुझ्याकडे आणि तू नको माझ्याकडे 
सगळ्यांनाच ठाऊक आहे...

मायेची नाती कोरडी होऊ लागली 
ऑनलाइन मैत्रिपुरात वाहू लागली 
डोळ्यातील अश्रू गालावरच सुकू लागले
टिपणार कोणी नाही ..... 
सगळ्यांनाच ठाऊक आहे

एकटेपणा घालवण्यासाठी आम्ही 
ट्रॅफिकमध्ये फिरतो 
अचानक एखादी गाडी आलीच समोर 
तर घट्ट हात धरून मागे ओढणारं कोणी नाही 
सगळ्यांनाच ठाऊक आहे

महागातला महाग पदार्थ आम्ही
ए सी रेस्टोरंट मध्ये बसून खातो
पण घराबाहेरील ओट्यावर बसून
आईने चारले.ला चिऊ काऊंचा घास 
गोष्टींपुरताच राहिला आहे...
हेही सगळ्यांनाच ठाऊक आहे

आता सगळ्यांनाच सगळं ठाऊक असतं
त्यामुळे कुठलीही गोष्ट उलगडणे
म्हणजे काय असतं
हे कुणालाच ठाऊक नाही....
                - मनिष ज्ञानदेव कानडे #संभ्रम#

Yogesh Hiwrale

"होय तर तुला, म्हणावंच लागेल
नाही म्हणून, कसं चालेल
रोजची 'ती' सकाळ आजही आठवते
पुढे तू ,पाठी मागे मी,असेच दिवस जात होते
त्यावेळेस का नाहीस, मला थांबवलं
गालात हसून, चार वर्षे सतत फसवलं 
इतक्या वेळा,प्रेमवेडाच कुणी  फसेल
म्हणून.. होय तर तुला म्हणावंच लागेल
नाही म्हणून कसं चालेल

आहे का काही उपाय सुचव तूच जरा
एखाद्या अनोळखी पेक्षा मीच नाही का बरा
तुझ्या ,पाषाण हृदयाला आता पाझर फुटू दे,
तुझ्या प्रेमाची गाडी, माझ्या दिशेने सुटू दे
या रस्त्यानं तुला  स्वर्गसुख लाभेल
त्यासाठी...होय तर तुला म्हणावंच लागेल
नाही म्हणून कसं चालेल

तुलाही कळते आहे प्रेम माझे
तुझ्याच प्रेमाचे आहे काळजावर ओझे
नाही म्हणून, अशी छळू नकोस
विरहाच्या अग्नीत, अशी पोळू नकोस
 एवढ प्रेम तुला कोण गं करेल
शेवटी.. होय तर तुला म्हणावंच लागेल
नाही म्हणून कसं चालेल... #nahi#kasa#chalel#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile