Nojoto: Largest Storytelling Platform

Best staypatient Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best staypatient Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 1 Stories

rayansh

Mind and Battle  रोज मनाला सांगावं लागतं
अरे थांब बाबा
तू श्वासाच्या पुढे चाललाय
श्वास आहे जगवायला त्याच्या गतीत सदगती घे 
अंतर वाढत जाऊन खोल दरीत क्षती होण्याआधी यती घे
कुणास ठाऊक कुठल्या शर्यतीत धावायला लागलाय
अरे थांब बाबा
तू श्वासाच्या पुढे चाललाय

श्वासानं सांभाळलाय आजवर देह
तुही त्याच्याशी एकसंध होऊन आजमाव ऊहापोह
तुझ्या थकव्यापायी देह ही भांबावलाय
अरे थांब बाबा
तू श्वासाच्या पुढे चाललाय

असशील तू धनी ह्या देहाचा 
शिरजोर तुझा कुठवर सह्य होईल
देहाचं ठीके पण धडपडण्याच्या जखमांना तुझ्या 
काय ईलाज ग्राह्य राहील
तुझी मनमानी तुझीच कहाणी अर्ध्यावर सोडायला लागलाय
अरे थांब बाबा
तू श्वासाच्या पुढे चाललाय

पुरे आता अडखळणं देहाचं अन तुझं, पुरे डामडौल
श्वासाची अन मनाची गट्टी होऊदे येऊदे समतोल
सावरणार मन तू, आवारणारा श्वास वेठीस धरलाय
अरे थांब बाबा
तू श्वासाच्या पुढे चाललाय

#rayofhope
 let's hold our restless wishful mind to uphold our breath.

©rayansh #rayofhope #shwas #staypatient #staysafe #IndiaFightsCorona #Life 

#Mind


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile