Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझे_विचार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझे_विचार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

माझे लेखन.. #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझे_विचार #yqmarathiquotes #माझीआवड #माझेहरवलेलेशब्द भले ही काव्यात्मक शब्द नसतात नेहमीच माझ्या लिखाणात तरीही ते मांडण्याचा प्रयत्न करतो मी, जे असते कित्येकांच्या मनात. भावना महत्वाच्या असतात ज्या शब्दातून दिसतात, रोजच्या वापरातील शब्दांशिवाय दुसरे शब्दच मला सुचत नसतात.

read more
भले ही काव्यात्मक शब्द नसतात नेहमीच माझ्या लिखाणात
तरीही ते मांडण्याचा प्रयत्न करतो मी,
जे असते कित्येकांच्या मनात.
भावना महत्वाच्या असतात ज्या शब्दातून दिसतात,
रोजच्या वापरातील शब्दांशिवाय 
दुसरे शब्दच मला सुचत नसतात.
मी फक्त प्रयत्न करतो आपल्या भावना मांडण्याचा
साध्या सोप्या पद्धतीत आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा.
चुकलो असता कुठे आपण सहकार्य करावे
लेखक,कवी जरी नसलो मी माझ्या प्रयत्नात मला मदत करावी.
आवड होती लिहिण्याची म्हणूनच हे प्रयत्न करतो,
युअर कोट मिळाला नसता तर कदाचित मी ही दिसलो नसतो. माझे लेखन..
#collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझे_विचार #yqmarathiquotes #माझीआवड #माझेहरवलेलेशब्द 
भले ही काव्यात्मक शब्द नसतात नेहमीच माझ्या लिखाणात
तरीही ते मांडण्याचा प्रयत्न करतो मी,
जे असते कित्येकांच्या मनात.
भावना महत्वाच्या असतात ज्या शब्दातून दिसतात,
रोजच्या वापरातील शब्दांशिवाय 
दुसरे शब्दच मला सुचत नसतात.

yogesh atmaram ambawale

कान भरणे #collabrating #withcollabratingYourQuoteAndMine #मराठी_quote #माझे_विचार #कानाफूसी #yqtaai #yqmarathi जी व्यक्ती आपल्याजवळ ईतर व्यक्तींबद्दल वाईट बोलत असेल, तर ती व्यक्ती त्या ईतर व्यक्तींजवळ आपल्याबद्दल ही वाईट बोलत असेल. हे जाणावे आणि शक्यतो अशा व्यक्तींपासून दूरच रहावे.

read more
जी व्यक्ती आपल्याजवळ ईतर व्यक्तींबद्दल वाईट बोलत असेल,
तर ती व्यक्ती त्या ईतर व्यक्तींजवळ आपल्याबद्दल ही वाईट बोलत असेल.
हे जाणावे आणि शक्यतो अशा व्यक्तींपासून दूरच रहावे. कान भरणे
#collabrating #withcollabratingyourquoteandmine #मराठी_quote #माझे_विचार #कानाफूसी #yqtaai #yqmarathi 
जी व्यक्ती आपल्याजवळ ईतर व्यक्तींबद्दल वाईट बोलत असेल,
तर ती व्यक्ती त्या ईतर व्यक्तींजवळ आपल्याबद्दल ही वाईट बोलत असेल.
हे जाणावे आणि शक्यतो अशा व्यक्तींपासून दूरच रहावे.

yogesh atmaram ambawale

#yqtales #yqwriters #yqtai #yqquotes #माझे_विचार #प्रयत्न कुणी व्याकरण समजून सांगितलं तरी चालेल.

read more
प्रयत्न !!
खूप गोंधळ असतो माझ्या लेखनात,
हे चांगलेच जाणतो मी.
पण कुणीतरी समजवेल मला ह्याच आशेवर राहतो मी.
छान-छान लेखक इथे खूप
सुरेख लिहितात,
त्यांचेच लेखन वाचून मलाही काही
शब्द सुचतात.
 #yqtales #yqwriters #yqtai #yqquotes #माझे_विचार #प्रयत्न 
कुणी व्याकरण समजून सांगितलं तरी चालेल.

Nishigandha Kakade

जन्म दिवसाची आतुरतेने वाट बघणारे 
आपण कायमच खूप आनंदात असतो,यात नवल ते काय मित्रांनो?
सर्व गोष्टी मनापासून सुखावणाऱ्या असतात,आपल्याला मोठे पंख मिळणार आहेत,
आपण आता जबाबदार होणार आहोत,याची जाणीव ते प्रत्येक वाढते वर्ष करून देते.
पण मला जन्म देणारे आई वडील मात्र माझ्या जन्माच्या वाढत्या वयासोबत 
एका एका वर्षाने वयस्क होत चालले आहे,याची जाणीव देखील सलत राहते.
काय आणि कसे थांबवावे आपण आपल्या आई वडिलांना म्हातारे होण्यापासून??
आपण मोठे होतो,अनुभवी होतो पणआपले आधारस्तंभ आपले वटवृक्ष मात्र 
सुरकुत्या आलेले दिसू लागतात, त्यांच्यातली ऊर्जा कमी झालेली दिसते,
वयोमानानुसार ते थकलेले दिसू लागतात! मुलांचे बरे असते कायम आई वडील 
सोबत असतात त्यांच्या हर एक सुख दुःखात! पण आम्हा मुलींच्या जीवनाला 
जसा शापच लागला आहे पूर्वापार परंपरा आणि रूढींचा.
आपल्या आई वडिलां पासून दूर राहून त्यांच्या म्हातारपणात 
आधार ही त्या होऊ शकत नाहीत.
बोलण्याच्या बाता वेगळ्या असतात पण चालू संसार सोडून त्यांच्याकडे
सासू सासऱ्यांसारखे लक्ष नाही देता येत,यापेक्षा वाईट प्रकारचा हतबल पना 
तो दुसरा काय आहे एका मुलीसाठी??
फक्त पैसे पुरविणे म्हणजे आधार नसतो,मला मायेने त्यांना खाऊ घालायचं आहे
अगदी मनापासून त्यांना घड्याळाच्या प्रत्येक काट्यावर साथ द्यायची आहे.
त्यांना हर एक देवालयात सोबत दर्शनासाठी न्यायचे आहे,
त्यांच्या सोबत त्यांच्या भोवतालच्या वर्तुळात 
माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे  "गणपती बाप्पा सारखी"!
एक न विरणार हसू व्हायचं आहे त्यांच्या चेहऱ्यावरील!! - निशिगंधा✍️🌼

©Nishigandha Kakade #मनातलं_पानात #माझे_विचार

Nishigandha Kakade

जन्मदाते असो वा पालनकर्ते पण आई - वडील गुरूंच्या यादीत कायम अग्रस्थानी असतात,संतवाणी, उपदेशपर साहित्य देऊन जीवन उजळण्यास हे धर्मगुरू किंवा भक्तिगुरू मदत करतात , शिक्षकवर्ग भविष्यकाळातील  उदरनिर्वाह स्वरूप डोक्यात ठेवून शिक्षण देतात,मित्रपरिवार जगणे आणि वागणे दोन्ही मद्ये साथ देतात, सगेसोयरे आपल्या जगण्यावर लक्ष ठेवतात आणि अप्रत्यक्षपणे कलाटणी देतात !! पण माझ्या मते हे सर्व गुरू सर्वांचे आहेत आणि असतील देखील किंवा नसतील देखील.
        पण एक गुरू सर्वांच्या जीवनातील अटळ सत्य आहे तो म्हणजे *परिस्थिती*. जी कायम आपल्याला आपल्यातील *best varsion* शोधण्यास मदत करते कधी अनुकूल राहून तर कधी प्रतिकूल राहून!! ह्या निसर्गाने आणि आपल्या नशिबाने तिच्या सोबत हातमिळवणी केली आहे तेव्हा मित्रांनो घाबरु नका   तीला कधीच. सामोरे जा !! लढा आणि जिंका!? ज्याने परिस्थितीवर विजय मिळवला तो खरा शिष्य आहे या जगात!!!

©Nishigandha Kakade #माझे_विचार 

#achievement

Narayan Ram Jadhav

mute video

Yogesh Ambawale

न्याय झाला
हे महत्त्वाचं,
खरे की खोटे
का तपासायच.
नेहमी असंच व्हावं,
नराधमान असंच मरावं.
कायद्यानं ही हेच करावं
ताबडतोब निकाल द्यावं.
आनंद कुणाच्या तरी मरण्याचं,
असंच उत्तर रहावं कायद्याचं.
कडक कायदा असावाच स्त्रियांच्या पाठीशी,
पाचावर बसेल दुष्कृत्य करताना ह्या नराधमांची. #nojoto_marathi#असेच_घडावे#न्याय#माझे_विचार


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile