Find the Best ऋतुwrites Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rutuja kalkate
सांग ना देशील का साथ मला चांदण्या राती फिरताना शुभ्र त्या चांदण्या अन् चंद्र दुरून न्याहाळताना देशील का साथ मला? सुरेल गीत गाताना बेधुंद होऊन नाचताना हलकेच शब्द गुंफून कविता तुझसाठी रचताना देशील का साथ मला धुवाधार पावसात चिंब चिंब भिजताना बरसणाऱ्या त्या पर्जन्यसरी अलगद ओंजळीत वेचताना अडखळले जर कुठल्या वाटेवर हात घट्ट धरशील का पावलोपावली सोबत असल्याची जाणीव करून देशील का सोबतीने एकमेकांच्या ध्येयाचा पर्वत चढशील का समजूतिच्या वाटेवर डोळ्यांनीच सावरशील का कधी वाळवंटाच्या निखाऱ्यावर तर कधी मिलनाच्या सुंदर बेटावर कायम हात हातात घेऊन काही पावलं चालशील का संवेदनांच्या मिटल्या पाकळ्यांना अन् उमलू पाहणाऱ्या ज्योतींना चिरंतन प्रकाशमन करशील का सत्यात अशक्य असलं तरी स्वप्नात वचन देशील का जास्त काहीच नकोय मला फक्त कायम साथ दे मला अख्या जगाला हेवा वाटेल एवढ प्रेम देईल तुला #ऋतुwrites देशील का साथ मला?
देशील का साथ मला? #ऋतुwrites
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited