Nojoto: Largest Storytelling Platform

Best ऋतू_writes❤️ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ऋतू_writes❤️ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Rutuja kalkate

आदर्शप्रेम❤️ #ऋतू_writes❤️

read more
खरं प्रेम करणार्यांच्या नशिबी कधी 
विनाकारण झुरण नसावं
एकाच्या विश्वासघातामुळे 
दुसऱ्याच्या नशीबी जीवन्तपणी मरण नसावं 
प्रेमाची कदर दोघांनाहीं  सारखीच असावी 
त्याने कायम सोबत रहाण्याच वचन द्यावं 
तर तिने सोबतीने आयुष्य सजवायच स्वप्न पाहाव
दूर असूनही कायम एकमेकांचं च असावं
तिने कायम त्याच्याच आठवणीत जगावं
अन त्यानेही फक्त तिच्याशीच एकनिष्ठ राहावं
gifts..surprizes नाही 
म्हणून तिने का  रुसून बसावं
प्रेमाची श्रीमंती सर्वात मोठी
अस म्हणून अभिमानाने मिरवावं
ती इतर मुलींसारखी नाही म्हणून
 त्याने का तिला दुखवावं?
जगात माझीच shonoli सर्वात सुंदर
असचं त्याला मनापासून वाटावं

पुढे जे होईल ते होईल 
आता घेऊ मजा करून
अस दोघांना कधीच न वाटावं
तर अस काही करू कि 
सोबतीने सारं जग जिंकू
हेच वचनं मोठ्या विश्वासाने पूर्ण करावं
त्याने धोका दिला किंवा तिने गद्दारी केली
असं कोणाच्या मनी न यावं
प्रेमाच्या खऱ्या व्याख्येच महत्त्व
दोघांनाही पटाव
प्रेमात एकत्र येऊन एकमेकांचं होऊन जावं
  किंवा ....
एकमेकांना कधी दोष न देता 
विरहयातना शमवावं
प्रेमात सर्वच सुंदर! हे...
अगदी हसत हसत स्वीकारावं


तिनेहि थोडं समजून घ्याव
त्यालाही कधीतरी समजावं
विराटापासून जे दूर नेत...
 त्या प्रलोभनांना दूर ठेवण्याची 
धिटाई असलेलं... प्रेम असावं
इतरांसारख फालतूपण त्यात नसावं...
कोणामुळे कधीही तुटेल एवढं कमकुवत  नातं नक्कीच नसावं...

 जीवापाड प्रेम दोघांनीहीं कराव
अन आयुष्यभर ते निभवावं....
एकमेकांसोबत ...अन वेळ आलीच तर
एकमेकांशिवाय...
 एकमेकांच्या गोड आठवणीत
अगदी आनंदाने आयुष्य सरावं...
खरंच अस आदर्श प्रेम असावं...
कीं प्रेमालाच  काही न उलगडावं
या खोट्या मतलबी दुनियेतल्या प्रेमानेचं
या दोघांच्या प्रेमात पडावं.....
खरंच जर प्रेम असावं तर ते अस असावं....
नाहीतर तात्पुरत्या खोट्या वचनांत उगाच कशाला अडकावं? 
#ऋतू_writes❤️ आदर्शप्रेम❤️

Rutuja kalkate

आज माझी कविता मला हसून म्हणाली... #ऋतू_writes❤️

read more
आज माझी कविता मला हसून म्हणाली
 तू पुन्हा तुझ्या स्वप्नावरच कविता केली
स्वप्नाला कधी सत्यात तर आण...
शब्दात व्यक्त करते ते प्रत्यक्षात जाण...
तिची केविलता ऐकून मी  उत्तरले
कवितेतले प्रेम कवितेतच राहू दे...
मला साजेसा जोडीदार आधी  समोर  तर येऊ  दे....
#ऋतू_writes❤️ आज माझी कविता मला हसून म्हणाली...


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile