Nojoto: Largest Storytelling Platform

Best मराठी_राजभाषा_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मराठी_राजभाषा_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

पूर्वार्थ

जगण्यासाठी जिंकण्यासाठी,इतर भाषांची गरज असेलही जरी
पण ठेच लागल्यावर ‘आई गं’,म्हणतो तीच असते आपली भाषा खरी
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!भाषेचा गोडवा साखरेहूनी फार,
मऊ मखमली असली तरी,शब्दांना तिच्या धार,
वळवावी तशी वळते,सहज सगळ्यांना कळते.
भाषेची आमच्या श्रीमंती अपरंपार
माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्र्यात आहे, भविष्याचे वरदान
महाराष्ट्रातील तमाम जनतेला,मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

©purvarth #मराठी_राजभाषा_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा

Jayu

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य एकतो मराठी.
 धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी...

आमुच्या मनामानात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी....

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमुच्या लहानग्यात रांगते मराठी, आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी...

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी, येथल्या फुलाफुलात हासते मराठी, येथल्या दिशादिशात दाटते मराठी. येथल्या दरीदरीत हिंडते मराठी येथल्या नगानगात गति मराठी... येथल्या वनावनात गुंजते मराठी, येथल्या तरुलतात साजते मराठी, येथल्या कळीकळीत लाजते मराठी... वेथल्या नभामधून वर्षत मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी, येथल्या नद्यामधून वाहते मराठी पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी... आपल्या घरात हाल सोसते मराठी,

हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी...

-सुरेश भट #मराठी_राजभाषा_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा..
#मराठी #कविता #सुरेश_भट


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile