Nojoto: Largest Storytelling Platform

Best 14एप्रिल Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best 14एप्रिल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Raju Gaikwad

उनकी याद  
            #14एप्रिल
वर्षभर धूळ बसलेला भीमाचा फोटो
14 एप्रिल ला पुसला जाईल
हार फुल घालून,मेणबत्ती पेटवून
चौका चौकात मांडला जाईल

तोंडात मावा टाकून,दारू पिऊन
जय भीम,जय भीम करत
भीमाला डोक्यावर घेऊन नाचत जाईल
वर्षभर धूळ बसलेला भीमाचा फोटो
14 एप्रिल ला पुसला जाईल

गाणं भीमाच डीजे वर लावून
दिवसभर नाचत बसतील
निळा झेंडा हातात घेऊन
गावभर फिरत बसतील
घसा कोरडा होईपर्यंत,घोषणा देतील
वर्षभर धूळ बसलेला भीमाचा फोटो
14 एप्रिल ला पुसला जाईल

भीमाचा कार्याचा इतिहास सांगतील
रमाईचा त्यागाच गुणगान गातील
निळा रंग कपाळी लावून
निळ्या रंगात रंगून जातील
वर्षभर धूळ बसलेला भीमाचा फोटो
14 एप्रिल ला पुसला जाईल

14 एप्रिल पुरता माझा भीम नाही
आजन्म भीमाला पूजत चला
भिमाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
भीमाला रोज वाचत चला...
नाहीतर तुमचा सत्यानाश होईल
वर्षभर धूळ बसलेला भीमाचा फोटो
14 एप्रिल ला पुसला जाईल

✍️राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©कविराज the king of hearts

Amit Pawar . 9773822796

mute video


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile