Nojoto: Largest Storytelling Platform

Best व्यथा_वृद्धाश्रमातल्या_आईची Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best व्यथा_वृद्धाश्रमातल्या_आईची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

VISHAL PANDIT

ताण कामाचा बाळ,जरा कमीच घेत जा
मी राहील कशीही रे पण,तू मात्र वेळेवर जेवत जा ||धृ||

पोटात होतास माझ्या,तेव्हा पडला होता दुष्काळ 
खुप मेली माणसं,काही जगत होती खाऊन भातडाळ
भरघोस धान्य असुनही घरात,आता का केलास मला वजा
मी राहील रे इकडे कशीही,तू मात्र वेळेवर जेवत जा||१||

शाळेत जायला लागलास,तेव्हा वाटलं मोठा माणूस होशील 
संपतील गरिबीचे दिवस,सुखशांती घरात येईल
मोठा तर झालास पण,समजू शकला नाही माझी इजा
कसही काढीन राहिलेले दिवस इथं,पण तू वेळेवर जेवत जा||२||

हल्ली मला तुझ्या बापाची,आठवण खुप येतेय
म्हणायचा बघ आपलं पोर,आपल्याला कसं सुखात ठेवतयं
हेच सुख पाहण्यापेक्षा,बरं झालं घेतली त्यानं रजा
मी राहील कशीही रे पण,तू मात्र वेळेवर जेवत जा||३||

इच्छा होती माझी,नातवंडांसोबत खेळावं
खेळ भातुकलीचा,पुन्हा एकदा मांडावं
असा कसा माझाच खेळ भातुकलीचा,मांडलास रे राजा
सावरेल मी स्वत:ला पण,तू मात्र वेळेवर जेवत जा||४||

थकलेय आता मी,कंटाळा आलाय जीवनाचा
हातपाय पण चालत नाहीत,श्वासही गुदमरतोय माझा
भगवंता उचलत का नाहीस, सोसत नाही असली सजा
 मी आहे व्यवस्थित बाळा,तू मात्र तुझी काळजी घेत जा||४||

                                                                     -विशाल पंडित © #व्यथा_वृद्धाश्रमातल्या_आईची....


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile