Nojoto: Largest Storytelling Platform

Best नको Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नको Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपाहू की नको, का नको, नको का, जवळ ये लाजू नको, नको नको ना रे,

  • 70 Followers
  • 151 Stories

Dr. BHAGYASHRI

menstrul hygiene

read more
मासिक पाळी....
आज नेहाची आई , तिला ओरडताना  दिसली ,
इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ 
देवाला तर नकोच शिवू ....
तशी नेहाही वेगळीच वागत होती ...कधी रडत होती तर कधी चिडत  होती......
खूप वेळच्या अबोल्यानंतर बोलली नेहा शेवटी 
आता झाली मी मोठी ....नाही खेळणार आळी- मिळी गुपचिळी 
मला आली मासिक पाळी ....
मग माझ्याच मनात चालू झालं विचारांचं युद्ध 
शुद्ध असलेलं रक्त कस होत अशुद्ध 
जर रक्तच असेल अशुद्ध तर कसे जन्मले फुले ,गांधी,आंबेडकर 
गौतम बुद्ध 
विचारच असतील अशुद्ध तर काय करणार 
ही तर निसर्गाची देणगी रक्त तर वाहणार ....

_sensitive_ink_of bhagyashree
with kajal menstrul hygiene

Manish Kanade

आता सगळ्यांनाच ठाऊक आहे
महागडा टिव्ही बंद असतो दिवसभर 
सुंदर फर्निचर, नसतं कोणी त्यावर 
सगळे पाहुणे,  स्मार्ट झालेत 
मी नको तुझ्याकडे आणि तू नको माझ्याकडे 
सगळ्यांनाच ठाऊक आहे...

मायेची नाती कोरडी होऊ लागली 
ऑनलाइन मैत्रिपुरात वाहू लागली 
डोळ्यातील अश्रू गालावरच सुकू लागले
टिपणार कोणी नाही ..... 
सगळ्यांनाच ठाऊक आहे

एकटेपणा घालवण्यासाठी आम्ही 
ट्रॅफिकमध्ये फिरतो 
अचानक एखादी गाडी आलीच समोर 
तर घट्ट हात धरून मागे ओढणारं कोणी नाही 
सगळ्यांनाच ठाऊक आहे

महागातला महाग पदार्थ आम्ही
ए सी रेस्टोरंट मध्ये बसून खातो
पण घराबाहेरील ओट्यावर बसून
आईने चारले.ला चिऊ काऊंचा घास 
गोष्टींपुरताच राहिला आहे...
हेही सगळ्यांनाच ठाऊक आहे

आता सगळ्यांनाच सगळं ठाऊक असतं
त्यामुळे कुठलीही गोष्ट उलगडणे
म्हणजे काय असतं
हे कुणालाच ठाऊक नाही....
                - मनिष ज्ञानदेव कानडे #संभ्रम#

अश्लेष माडे (प्रीत कवी )

कदर

read more
ह्यांना विचारा जेवणाची किंमत, 
ज्यांना पोट भरण्यासाठी स्मशान सुद्धा हॉटेल वाटते.
कारण, ज्यांना सहज अन्न मिळते त्यांना त्याची कदर राहात नाही, 
हे नको -ते नको, इथं नको -तिथं नको, 
तेराव्याचं जमत नाही, बारश्याचं जमत नाही, 
ह्याच्या हाथाचं नको, त्याच्या हातचे नको, 
असे बहाणे करून, अन्नाची फेकाफेकी करतात. 
ज्याला एकवेळचे अन्न सुद्धा नशीब होत नाही 
त्याला जेवणासाठी स्मशान काय नि हॉटेल काय? 
भुकेपुढे महालातली चव सुद्धा स्मशानातल्या चवीपुढे फिकी पडते.. 
म्हणून कदर करा.. कदर

Yogesh Hiwrale

कवितेचं नाव:#गारपीट 2014

read more
"नको देवा मला ही पावसाची सरं...
येता पावसाची सर माझी होई तारांबळ
घरावर छप्पर असून नसलेले आहे
घरामंदी पाणी साचून भांडे घराबाहेर  वाहे
एगळाच हाय देवा तुझा न्यावं 
आरं जित्या परी मेल्या धडाला ज्यादा भाव
आता व्हत नही, सहीनं सोसू कुठवरं
नको देवा मला ही पावसाची सरं...

या या पावसानं पोरीचं लगीन मोडलं
मह्या सर्जा राजाला बजारात धाडलं
आरं  'गारा' नही त्वा अंगार बरशिवली
व्वा रं तुही किमया पाण्यानं चिंता पेटवली
लोकाह्यचं सोड, तूच नही आमच्या भल्यावरं
नको देवा मला ही पावसाची सर...

मागचाच दुसकाळ फिटता, फिटना
आन, 'गारपीटीनं' आणला तेरावा महीना
आम्हा शेतकऱ्यांवरच नजर तुही तिरकी
चुकून माकून एखादा सावकार ही धर की
डोंगर 'खडा' वाटतो ह्यांच्या कर्जा म्होरं
नको देवा मला ही पावसाची सरं...

भाकरीतला शेतकरी दिसतो का कोणाला
पण शेतकऱ्याची भाकर दिसती देवाला
शेतकरी म्हणून जलमलो हाच  माझा गुन्हा
साकडं घालतो तुला, जलमा घालू नको पुन्हा
आमच्या मारणाचं उगा खापर फुटल तुझ्यावरं
नको देवा मला ही पावसाची सरं"... कवितेचं नाव:#गारपीट #2014

Yogesh Hiwrale

"लोकांच्या नजरा"###

read more
"लोकांच्या नजरा मला छळतात गं
 जेंव्हा ,जेंव्हा, त्या तुझ्याकडे वळतात गं
 बघून तुला ना, येई पाठी.
  शक्य नसे ते ,कुणाही साठी.
  रीत जुणी ही सांगू किती.
 सौंदर्य जेथे ,जडते प्रीती
 अलगद, माझ्याकडे पाहू नको गं
 भाव मनाचे ते कळतात गं....
लोकांच्या नजरा मला छळतात गं.... 

श्रुंगार कशाला ,या रुपाला
देह लाजवील, रती यौवनाला
मृग नयनी तू ,स्वैर बाला
अग्नी काठी, मद्य प्याला
काळोख्या राती फिरू नको गं
ताऱ्यांची मनेही जळतात गं
लोकांच्या नजरा मला छळतात गं....

कुठे ठेवू हा चंद्र झाकून
राहील कसा तो नभा वाचून
सुरेल जणू तू एक मैफील
राहील कोण कसा मग गाफील
आल्हाद अशी हसू नको गं
संदर्भ फुलांचे जुळतात गं
लोकांच्या नजरा मला छळतात गं "लोकांच्या नजरा"###

Prakash Gore ( Raj )

राज......

read more
नको नको पावसा 
राग असा धरु
ये ना रे धावून
वेळ नको करू   .... राज राज......

Kishor Rokade

मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान, दर वर्षी, भरभरून पिकु दे, माझ्या, शेतक-यांचे रान .! "जय शिवराय"

read more
"हरामखोर"
                          
मानव नावाचा हरामखोर प्राणि पृथ्वीवर राहत होता..!
झाडा झुडपाची होणारी दशा मुकाट्यानं पाहत होता.
त्यांच्या कापणीला,जळणीला हाच जवाबदार होता.
पाखरांचा थवा कमी करण्यात याचाच हात होता.
मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता.!

नदी,विहिरी अन तलावे आटण्याला..पाण्याचा थेंब थेंबही
संपण्याला हाच कारणीभुत होता.
उपसा वाळूचा करुन..झाडझुडपं तोडुन..सिमेंटची जंगलं
वाढवुन..नंदनवन संपविण्यात याचाच हात होता.
मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..!

औद्योगिकरणाला,शहरिकणाला लोभ स्वार्थाचा होता.
प्रगतीच्या नावाखाली अधोगतिकडे जाणाराही हाच होता.
वर्तमानातील स्व सुखात भविष्य यांनी जाळला होता..
मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..!

आगीत त्या एकटाच हा होरपळला नव्हता..झाडं झुडपं
पक्षी, प्राणी ,नदी नाले, विहिरी अन तलावे साऱ्यांचाच
घात याने केला होता..पृथ्वीवरील जीवसृष्टी नाहीशी करण्यात याचाच हात होता..!
कारण मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..!

श्री:-किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान,
दर वर्षी, भरभरून पिकु दे,
माझ्या, शेतक-यांचे रान .!
"जय शिवराय"

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
तू काहीही कर, नको कळु देऊ तुझ्या मनातलं, नको सांगू काहीच, 
पण मला माहिती, म्हणून मीच सांगतो माझ्या मनातलं.. 
मला तुझ्यासोबत जगायचंय, 
तुझ्यासोबत मुलांना खेळवत म्हातारं व्हायचंय, 
तुला भरभरून प्रेम देऊन, पूर्ण आयुष्य काढायचंय, 
मला तुझ्या दुःखांना दूर पळवायचंय, 
तुला हसवायचंय, थोडं रडवायचंय, थोडं भांडायचंय, 
पण तुला दूर नाही जाऊ द्यायचंय.. 
इतकं प्रेम द्यायचंय की, जगाला विसरशील 
पण शक्य नाही तू मला विसरायचंय, 
तू रुसणार तर मी मानवायचं, मी रुसलो तर तू मानवायचं, आणि 
हे छोटंसं आयुष्य आपण दोघेही मिळून असंच जगायचं, 
पण काहीही झालं तरी एकमेकांना नाही सोडायचं, 
आणि असं मला फक्त तुझ्यासोबतच जगायचंय... (प्रीत )

Vrishali G

इशारा

read more
नको करुस व्यसन असे
नको काढू सिगारेट चा धूर.
जीवन तुझे असेच असेल.
तर मरण कसे बरे
राहील दूर? इशारा

Meena

काही तरी वाईट झाले आहे असे जाणवते
परत एकदा नको त्या वाटेवर चालताना

समजून ही, नको ती वाट  बघताना
आजही झालेली जखम मनात सलते
जावे का विसरून भविष्य,भुत बघताना

छळताना आयुष्य, विचारतो मी का जगत आहे 
परिपूर्ण असा मी,तरी निरंतर कमी पडत आहे

निराशा चे ढग दाटून येताच, शब्द चिंब भिजून जातात
दमलेल्या आवाजातील  नको ती खोटी आशा, दिवस रात्र विचार घेउन, कृती शून्य बनवतात

अति विचारात गुरफटून टाकले, भाबड्या मनास, चंचल मुक्त त्या विहंगास... #मनविचार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile