Nojoto: Largest Storytelling Platform

Best मित्रांनो Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मित्रांनो Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मित्रांनो सुप्रभात, धन्यवाद मित्रांनो, पुरुष मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, मित्रांनो तुम्हाला,

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

somnath gawade

#मित्रांनो धीर सोडू नका!

read more
मित्रांनो धीर सोडू नका!
परिस्थिती कितीही गंभीर असली तरी
जगण्याची उमेद हारू नका.
स्वकीयांच्या जाण्याने भयभीत झाला तरी
 मित्रांनो धीर सोडू नका!
               कठीण काळात तग धरून राहण्यासाठी
               नकारात्मक विचारांना थारा नको.
              आजची काळरात्र उद्या नक्कीच नसेल म्हणून
              मित्रांनो धीर सोडू नका!
समोर कितीही काळोख असला तरी
माघार घेऊ नका.
प्रकाशाची आस धरून शेवटपर्यंत
लढायचे आहे हे ही विसरू नका.
               परिस्थिती तुमचा कस पाहीन;
                तिला शरण जाऊ नका.
                लढण्यासाठी जन्म आपुला
                 मित्रांनो धीर सोडू नका.
वेढले जरी संकटांनी
भयभीत होऊ नका.
नक्कीच निघेल मार्ग यातून
मित्रांनो धीर सोडू नका.
                 आपल्याबरोबर कुटुंबाचीही काळजी घेऊन
                 शत्रुला संक्रमणाची संधी देऊ नका.
                 शरीराने खचला तरी मनाने उभारी घ्या.
                हीच विनंती, मित्रांनो धीर सोडू नका!
 #मित्रांनो धीर सोडू नका!


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile