Nojoto: Largest Storytelling Platform

Best आतातरी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आतातरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआता तरी फोटो, आता तरी पिक्चर, आता तरी ग येडामाय, आता तरी पुढे, आतातरी देणारे,

  • 1 Followers
  • 1 Stories

शब्दवेडा किशोर

White #आतातरी देवा माझ्या देवावानी वाग रं....
शब्दवेडा किशोर
देवा कधी देवळाच्या पायरीला येऊन बघ
लोकांना कसे सहज चढवले जाते
कागद शेवटी कागदच आहे
उत्तरांना कसे इथे सहज उडवले जाते......
शोधू नको काही इतिहासजमा झालेल्या खुणा
पुराव्यांना टेबलाखाली सहज दडवले जाते
चोर कोणता अन् कोणता साव हे आता चेहऱ्यावर नाही
आता जो कैद त्यालाच सहज तुडवले जाते......
कसा पुन्हा उभा राहिला माणूस हे ही समजेल
आहे त्या तत्वात कसे सहज घडवले जाते
आधीच महाल उभा त्याला पावलात आहे
कायम असेच फक्त दाखवले जाते 
पुन्हा तो खोटा सोनेरी मुकुट
फक्त त्याला नव्याने सहज मढवले जाते
असे काय वेगळे होईल आता
क्रांतीत इथे आजघडीला 
जुने काही कालबाह्य तसे अगदी
सहज सडवले जाते......

©शब्दवेडा किशोर #देवाअंतनकोपाहू

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile