Nojoto: Largest Storytelling Platform

केसांना भांग पाडून खिशाला रुमाल लावून आठवणीचं दफ्

केसांना भांग पाडून
खिशाला रुमाल लावून 
आठवणीचं दफ्तर उघडून 
ओळखीचा चेहरा शोधुया
बाकावरची जागा अडवुया
नव्याने मैत्रीची सुरुवात करुया...

आठवणीच्या वाटेत
आनंदाचे क्षण असतील
गालातल्या गालात हसताना  
तुलाही कविता सुचतील...
शब्दांची जुळवाजुळव करताना..
पहिलीतील बाराखडी आठवेल....
सुखाची अंकगणित मांडताना
शाळा नेहमीच मनात उरेल....

©Pravin Pawade
  School days

School days #मराठीकविता

117 Views